Monday, June 22, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पैसा आणि सत्तेचा गैरवापर करणाऱ्या पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – खासदार संजय जाधव

 

परभणी : पालकमंत्र्यांनी पैसा, सत्तेची मस्ती अधिकाऱ्यांचा गैरवापर करुनही त्यांना त्यांच्या प्रभागातील नगरसेवक निवडून आणता आला नाही. त्यामुळे मेघना बोर्डीकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी केली.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक तसेच काँग्रेसचे नगरसेवक यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार संजय जाधव (Sanjay jadhav) यांनी भाजपवर जोरदार शरसंधान साधले. भाजपने मताला 15 हजार रुपये वाटल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी फक्त आता सतरंज्या उचलायच्या. कारण, ज्यांच्याकडे पैसा आहे, जे गुन्हेगार आहेत अशा लोकांना घ्यायचं आणि निवडणुका लढवायच्या असा धंदा भाजपने सुरू केल्याचे संजय जाधव यांनी म्हटले.

महानगरपालिकेच्या 65 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये बाजी मारत सर्वात जास्त 25 जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या आल्या आहेत, त्यांच्यापाठोपाठ काँग्रेस 12, भाजप 12, अजित पवारांची राष्ट्रवादी 11, जनसुराज्य पक्ष 3 यशवंत सेना 1 आणि 1 अपक्ष अशा पद्धतीने निवडणुकीमध्ये संख्याबळ पाहायला मिळाला आहे.

यापूर्वी परभणी नगर परिषद असताना ही केवळ 2007 ला झालेल्या थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत गजानन डहाळे हे शिवसेनेचे नगराध्यक्ष झाले होते. त्यांनंतर आता 19 वर्षानंतर परभणी महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading