Sunday, April 5, 2026
ENTERTAINMENTLatest News

बिग बॉस मराठी: नॉमिनेशन टास्कमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा; सोनालीने कापली रोशनची पतंग!

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या वादळ घोंघावत आहे. नुकत्याच पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये स्पर्धकांमधील मतभेद उघडपणे समोर आले आहेत. या टास्कमध्ये सोनालीने एक धाडसी निर्णय घेत रोशनची पतंग कापली आणि त्याला घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केले.

नेमकं काय घडलं? नॉमिनेशनसाठी ‘पतंग’ कापण्याचा टास्क देण्यात आला होता. यावेळी सोनालीने स्पष्टपणे सांगितले की, “इतर सदस्यांच्या तुलनेत रोशनचे घरातील योगदान अत्यंत कमी आहे.” सोनालीच्या या विधानामुळे रोशनच्या चेहऱ्यावरील हावभाव पूर्णपणे बदलले आणि घरात वादाची ठिणगी पडली.

‘शहराची माणसं’ आणि ‘पोटावर पाय’ सोनालीने केलेल्या या वारामुळे रोशन चांगलाच संतापलेला पाहायला मिळाला. संतापाच्या भरात त्याने सोनालीवर वैयक्तिक टीका करताना म्हटले की, “शहरातल्या माणसांचे हेच काम असते, दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊन वर जायचे. रोशनची गेममधील पकड कमी असल्याने त्याला नॉमिनेट करणे योग्य असल्याचे तिने म्हटले. तर रोशनचा टोला: “आता तुमच्याकडून ट्युशन घ्यावी लागेल,” असे म्हणत रोशनने सोनालीवर उपरोधिक टीका केली.

हा संपूर्ण राडा आणि नॉमिनेशनची ही थरारक प्रक्रिया पहा ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६, दररोज रात्री ८:०० वाजता फक्त कलर्स मराठी आणि JioHotstar वर!

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading