वसंतोत्सव विमर्श’ अंतर्गत उलगडणार ध्रुपद आणि आग्रा गायकीतील ‘राग आलाप
पुणे : वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या ‘वसंतोत्सव विमर्श’ या संवादात्मक कार्यक्रमांतर्गत यावर्षी येत्या बुधवार दि. १४ जानेवारी रोजी ‘राग-आलाप’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी कळविली आहे. सायं ६.३० वाजता एरंडवणे येथील दी बॉक्स २ येथे सदर कार्यक्रम संपन्न होणार असून त्यासाठी सर्वांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विनामूल्य प्रवेश देण्यात येईल.
यावर्षी वसंतोत्सव विमर्श अंतर्गत आयोजित ‘राग-आलाप’ कार्यक्रमात प्रसिद्ध ध्रुपद गायक पं. उदय भवाळकर हे ध्रुपद गायकी, आग्रा घराण्याच्या ख्यातनाम गायिका विदुषी शुभदा पराडकर या आग्रा घराण्याची गायकी यांवर तर प्रसिद्ध संवादिनी वादक, संगीतकार पं चैतन्य कुंटे हे ‘हिंदुस्तानी संगीतातील राग-विस्तार – एक ऐतिहासिक दृष्टिकोन’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधतील.
