Wednesday, June 3, 2026
Latest NewsSports

‌‘स्कॉलरशिप प्रोजेक्ट ऑफ महादेवा‌’ योजनेअंतर्गत १३ वर्षाखालील मुले आणि मुलींच्या फुटबॉल पुणे जिल्हा निवड चाचणीचे आयोजन !!

पुणे :  महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र), सिडको आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (डब्ल्युआयएफए) यांच्या संयुक्त विद्यमाने ‌‘स्कॉलरशिप प्रोजेक्ट ऑफ महादेवा‌’ या महत्वाकांक्षी योजना राज्य शासनाच्यावतीने राबिवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत १३ वर्षाखालील मुले आणि मुलींच्या फुटबॉल पुणे जिल्हा निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही निवड चाचणी ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील फुटबॉल मैदानावर होणार आहे. या राज्यस्तरीय चाचणीमधून निवड झालेल्या अंतिम ३० मुले आणि मुलींना १४ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई येथे जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्यासोबत खेळण्याची एक अभूतपूर्व संधी मिळणार आहे.

निवड चाचणीच्या अधिक माहितीसाठी धीरज मिश्रा, शासकिय क्रीडा मार्गदर्शक (९२०९३३७७७०), अक्षय चौधरी, सीईओ, पीडीएफए (९४२१०७७५६१) आणि सिरील आशिर्वादम, पीडीएफए प्रतिनिधी (९८५०२३६७१७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निवड चाचणीसाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून यासाठी https://forms.gle/1mwckj3XokoRQbb98 लिंकवर नोंदणी करावी.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading