Wednesday, June 3, 2026

Day: October 25, 2025

BusinessLatest News

टाटा एआयएची नवी योजना – ‘शुभ फॅमिली प्रोटेक्ट’ 

मुंबई :  भारतातील एक प्रमुख जीवन विमा कंपनी टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडने आणली आहे नवी टाटा एआयए शुभ फॅमिली प्रोटेक्ट योजना. हा टर्म प्लॅन इतर पारंपरिक टर्म प्लॅनपेक्षा वेगळा आणि क्रांतिकारी आहे. यामध्ये तुम्हाला तात्काळ एकरकमी पेआऊट आणि ३० वर्षांपर्यंत लवचिक मासिक उत्पन्न हे दोन्ही मिळते. कुटुंबांना सर्वसमावेशक आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी डिझाईन केलेला हा अशाप्रकारचा पहिला प्लॅन आहे आणि अशा लोकांसाठी तयार करण्यात आला आहे ज्यांना जीवनातील अस्थिरतेमध्ये देखील मनःशांती ढळू नये असे वाटत असते. जीवनातील वास्तविक गरजांसाठी तयार करण्यात आलेली योजना प्रिय व्यक्तीचा अचानक मृत्यू गंभीर मानसिक आघात ठरू शकतो आणि अशा काळात जर आर्थिक समस्यांचे ओझे देखील उचलावे लागणार असले तर आयुष्यावर गंभीर विपरीत परिणाम पडू शकतो. अशा काळात स्पष्ट आणि स्थिर विचारांची सर्वात जास्त आवश्यकता असते पण नेमक्या त्याचवेळी एकरकमी खर्चाचे मोठे ओझे पडते आणि काहीही सांभाळणे खूप जास्त कठीण होऊन बसते. टाटा एआयएका शुभ फॅमिली प्रोटेक्ट प्लॅनमध्ये या आव्हानांचा सर्वंकष विचार करून अशी योजना प्रदान करण्यात आली आहे, ज्यामध्ये एकरकमी पेआऊट आणि स्थिर मासिक उत्पन्नाची सुरक्षा या दोन्ही लाभांना एकत्र आणले गेले आहे. मागे राहिलेल्यांसाठी ही योजना जीवनरेखा बनते. नवीन योजनेबद्दल टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सचे प्रॉडक्ट्स, मार्केटिंग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स आणि बिझनेस मिड ऑफिसचे चीफ श्री सुजीत कोठारे यांनी सांगितले, “टाटा एआयएमध्ये आम्ही मानतो की, फक्त आर्थिक सुरक्षा प्रदान करणे पुरेसे नसते, कुटुंबांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मदत पुरवणे गरजेचे असते. शुभ फॅमिली प्रोटेक्टमध्ये आम्ही सुनिश्चित करत आहोत की, कुटुंबाला ज्या आर्थिक सुरक्षेची गरज असते ती मिळावी, त्यासोबतच लवचिकता देखील मिळावी जी त्यांची हक्काची असते. ०% जीएसटीने तर ही योजना अजूनच सोपी केली आहे. ज्यांना आपल्या कुटुंबियांचे भविष्य कोणताही अतिरिक्त खर्च न करता सुरक्षित करायचे आहे त्यांच्यासाठी तर हे एक शक्तिशाली साधन आहे.” हा दृष्टिकोन सुनिश्चित करतो की, कुटुंबांच्या तात्काळ आर्थिक गरजा कव्हर केल्या जातील, त्यासोबतच त्यांना त्यांची बचत संपण्याची चिंता देखील करावी लागणार नाही. अंतिम संस्कारांचा खर्च, कर्जाची परतफेड किंवा इतर कोणतेही अत्यावश्यक खर्च असे आर्थिक ओझे तात्काळ हटवणे गरजेचे असते, त्यासाठी एकरकमी पेआऊट देण्यात आले आहे. शुभ फॅमिली प्रोटेक्टची खरी शक्ती आहे मासिक उत्पन्न, हे एक दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा कवच आहे, जे सतत तुमच्यासोबत राहते आणि कुटुंबाला आत्मविश्वासाने पुढे जाण्यात मदत करते. उदाहरणार्थ, वृद्ध आईवडील जर आर्थिक मदतीसाठी आपल्या मुलांवर अवलंबून असतील तर त्यांच्यासाठी एकरकमी पेआऊट त्यांच्या मेडिकल खर्चासाठी उपयोगी पडेल, त्यांना जी देखभाल आवश्यक आहे ती गंभीर नुकसानीच्या काळात देखील मिळत राहील. मासिक उत्पन्न त्यांना आर्थिक अस्थिरतेच्या ओझ्यापासून वाचवेल आणि नवीन वास्तविकतेशी जुळवून घेण्यात मदत करेल. गंभीर नुकसानीच्या काळात बऱ्याचदा दैनंदिन गरजांकडे दुर्लक्ष होते, पण मासिक उत्पन्न त्या गरजा पूर्ण करेल आणि त्यांचे मानसिक आरोग्य अजून जास्त बिघडण्यापासून वाचवेल. एखादी पत्नी जी आता एकटी मागे उरली आहे, तिच्यासाठी गंभीर नुकसानाचा आर्थिक भार अनेक प्रकारे विनाशकारी असू शकतो. शुभ फॅमिली प्रोटेक्टसह, ती मासिक उत्पन्न मिळवून तिचे सामान्य जीवन व्यत्यय न येता पुढे चालू ठेवू शकते. घरातील विविध बिलांपासून ते दैनंदिन गरजांपर्यंत, ती तिच्या जीवनाची गुणवत्ता बिघडू न देता नियमित पेमेंटच्या पायावर तिचे भविष्य घडवू शकते. ती पूर्वीसारखीच घर सांभाळू शकते, तिच्या मुलांची काळजी घेऊ शकते आणि आयुष्यातील इतर सर्वात महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकते. पालकांना कायमचे गमावण्याचे भयंकर दुःख अनुभवणाऱ्या मुलांना त्यांचे शिक्षण, त्यांची स्वप्ने आणि त्यांचे भविष्य गमावावे लागू नये. शुभ फॅमिली प्रोटेक्टमधून मिळणारे मासिक उत्पन्न त्यांना त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यास मदत करेल. शाळेची फी, शिकवणी आणि इतर उपक्रम सर्व पूर्वीसारखेच चालू राहू शकतात. भविष्याची चिंता न करता ते त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतात. शुभ फॅमिली प्रोटेक्टचे विचार करून ठरवण्यात आलेले वैशिष्ट्य म्हणजे अनेक लाभार्थींना नॉमिनेट करण्याची क्षमता. यामुळे प्रत्येकाला आवश्यक असलेला आर्थिक आधार मिळतो. तो जोडीदार असो, मुले असोत किंवा वृद्ध आईवडील असोत, तुमच्यावर अवलंबून असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी लाभ वाटा स्पष्टपणे ठरवला जाऊ शकतो, त्यामुळे मोठ्या दुःखाच्या वेळी वाद आणि गोंधळ टाळता येतो. लहान मुलापासून ते वृद्ध आईवडिलांपर्यंत सर्वांना आवश्यक असलेला आर्थिक पाठिंबा मिळतो. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या गरजा लक्षात घेऊन, शुभ फॅमिली प्रोटेक्ट विमा, मनाची शांती, स्थिरता आणि आर्थिक ओझ्याशिवाय पुढे जाण्याची क्षमता प्रदान करते. टाटा एआयएने संरक्षणाची नवी व्याख्या रचली आहे, ज्यामुळे मागे राहिलेल्यांना दीर्घकालीन सुरक्षितता आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळेल याची खात्री होते. टाटा एआयए शुभ फॅमिली प्रोटेक्टचे प्रमुख फायदे तात्काळ एकरकमी पेआउट: तात्काळ, तातडीच्या खर्चासाठी जलद आणि सोपे पेमेंट १०-३० वर्षांसाठी मासिक उत्पन्न: दैनंदिन खर्चासाठी सतत आधार लवचिक पेआउट पर्याय: महागाईशी जुळवून घेण्यासाठी निश्चित किंवा वाढणारे मासिक उत्पन्न मल्टिपल नॉमिनी पर्याय: तुमच्या सर्व प्रियजनांची काळजी घेतली जाईल ही निश्चिती तुम्हाला मनःशांती मिळते. टर्मिनल आजार संरक्षण: निदान झाल्यानंतर, विम्याच्या रकमेच्या ५०% रक्कम त्वरित दिली जातात आणि भविष्यातील सर्व प्रीमियम माफ केले जातात. ०% जीएसटी फायदा: वैयक्तिक जीवन विमा योजनांसाठी प्रीमियमवर कोणताही जीएसटी नाही, ज्यामुळे ते कुटुंबांसाठी अधिक परवडणारे बनते. शुभ फॅमिली प्रोटेक्टसह, टाटा एआयए कुटुंबांना जीवनातील कोणत्याही गोष्टीसाठी आर्थिकदृष्ट्या तयार राहण्यास मदत करत आहे – खरोखर ‘प्रत्येक वेळेसाठी तयार’.

Read More
BusinessLatest News

दि वेल्‍थ कंपनी म्‍युच्‍युअल फंडने चार सक्रिय एनएफओसह विक्रमी पदार्पण केले; जवळपास २००० कोटी रूपये निधी उभारला

मुंबई : दि वेल्‍थ कंपनी म्‍युच्‍युअल फंड या पॅन्‍टोमॅथ ग्रुपचा भाग असलेल्‍या फंड हाऊसने आज त्‍यांची पदार्पणीय सक्रिय श्रेणी एनएफओमध्‍ये जवळपास

Read More
BusinessLatest News

एक्वस लिमिटेड आयपीओ द्वारे 720 कोटी रु. चे फ्रेश कॅपिटल उभारणार

एरोस्पेस व कंझ्युमर सेगमेंटमध्ये पूर्णपणे व्हर्टिकली इंटिग्रेटेड उत्पादन क्षमता सादर करण्यासाठी भारतात एका सिंगल स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये कार्यरत एकमेव प्रिसिजन कॉम्पोनंट (अचूक घटक) उत्पादक एक्वस लिमिटेड (“एक्वस”) (स्रोत: F&S अहवाल) प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) द्वारे 720 कोटी रु. पर्यंत फ्रेश कॅपिटल उभारणार आहे. एक्वसने फ्रेश इश्यूसाठी अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (UDRHP1) दाखल केले असून त्यामध्ये 720 कोटी रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. याशिवाय, ऑफर फॉर सेल अंतर्गत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेले एकूण 31,772,368 पर्यंतचे इक्विटी शेअर्स विक्रीसाठी आहेत. एक्वसचे नेतृत्व स्वतंत्र प्रवर्तक, कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद शिवपुत्रप्पा मेलिगेरी करत असून ते कंपनीला धोरणात्मक दृष्टीकोन देत नेतृत्व करत आहेत. तसेच, कंपनीकडे अनुभवी व्यवस्थापन संघ असून त्यांना या उद्योग क्षेत्रातील कामाचा चांगला अनुभव आहे. याशिवाय, अमायकस कॅपिटल प्रायव्हेट इक्विटी I एलएलपी, अमायकस कॅपिटल पार्टनर्स, अमांसा इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड, स्टेडव्ह्यू कॅपिटल मॉरिशस लिमिटेड, कॅटामरान एकम् आणि स्पार्टा ग्रुप एलएलसी हे गुंतवणूकदार एकत्रितरीत्या ऑफरपूर्व इक्विटी शेअर भांडवलातील 25.54% हिस्सा धरून आहेत. जरी एक्वस प्रामुख्याने एरोस्पेस क्षेत्रात कार्यरत असले तरी गेल्या काही वर्षात कंपनीने कंझ्युमर क्लायंट साठी आपल्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करत कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, प्लॅस्टिक्स आणि कंझ्युमर ड्युरेबल्सचा समावेश केला आहे. यामध्ये कुकवेअर सारखी कंझ्युमर ड्युरेबल्स, प्लॅस्टिक्स (आउटडोअर टॉयज, फिगरिन्स), तसेच पोर्टेबल कॉम्प्युटर्स आणि स्मार्ट डिव्हाइसेस सारखी कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्ससाठी कॉम्पोनंट्स यांचा समावेश आहे. आयपीओ मधील फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा उपयोग कंपनी खालील उद्देशांसाठी करणार आहे: 1. कंपनी उपकंपन्यांमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून कंपनी आणि  तिच्या दोन संपूर्ण मालकीच्या उपकंपन्यांनी एरोस्ट्रक्चर्स मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि एक्वस कंझ्युमर प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी घेतलेल्या काही प्रलंबित कर्जाची संपूर्ण/अंशतः परतफेड किंवा प्रीपेमेण्ट (जिथे लागू असेल तिथे प्रीपेमेण्ट पेनल्टीसह) करण्यासाठी; 2.कंपनीआणि तिची एक उपकंपनी एरोस्ट्रक्चर्स मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारे यंत्रसामग्री आणि उपकरणे खरेदीसाठी भांडवल खर्चाला निधी पुरवण्यासाठी आणि  अजून काही अधिग्रहणांद्वारे, इतर धोरणात्मक उपक्रमांद्वारे इनओर्गानिक विकासाला निधी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापर करणार आहे. एक्वसने 2009 मध्ये एरोस्पेस ग्राहकांसाठी बेलगावी मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरमधील युनिट्समध्ये एरो-स्ट्रक्चर कॉम्पोनंट्स आणि एरो-इंजिन कॉम्पोनंट्सचे उत्पादन सुरू केले. मागील 15 वर्षांमध्ये, कंपनीने सातत्याने नवीन उत्पादन क्षमता विकसित करून आणि त्यांचे  अधिग्रहण करून विकास साधला आहे. यामुळे एरोस्पेस आणि कंझ्युमर सेगमेंटमध्ये पोर्टफोलिओ आणि ग्राहकवर्ग दोन्ही वाढले आहेत. कंपनीने 2015 आणि 2016 मध्ये अनुक्रमे उत्तर अमेरिका आणि फ्रान्समध्ये अधिग्रहणाच्या माध्यमातून धोरणात्मकदृष्ट्या उत्पादन कामकाजाचा विस्तार केला. त्यामुळे एरोस्पेस क्षेत्रातील नवीन क्षमता कंपनीला मिळाली, उत्तर अमेरिका व युरोपमध्ये कंपनीने आपले स्थान विस्तारले आणि उत्पादन पोर्टफोलिओ वाढविला. गेल्या काही वर्षात एक्वसने स्वतःला ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण जागतिक पुरवठादार म्हणून प्रस्थापित केले आहे. कंपनीच्या मुख्य ग्राहक/क्लायंट्स मध्ये एरोस्पेस विभागात—एअरबस, बोइंग, बॉम्बार्डियर, कॉलिन्स एरोस्पेस, स्पिरिट एरोसिस्टम्स इंक, सफ्रान, GKN एरोस्पेस, म्यूबेया एरोस्ट्रक्चर्स, हनीवेल, ईटन आणि साब्का; तर कंझ्युमर विभागात—हासब्रो, स्पिनमास्टर, वंडरचेफ आणि ट्रॅमोंटिना यांचा समावेश आहे. एक्वसने ग्राहकांना आवश्यक असलेल्या जटिल आणि विशेष उत्पादनांच्या उत्पादनासाठी संयुक्त कंपन्यांच्या परस्पर पूरक तज्ज्ञतेचा लाभ घेत नवीन उत्पादने विकसित करण्याच्या आणि अभियांत्रिकी उपायसुविधा सादर करण्याच्या क्षमता विस्तारासाठी संयुक्त कंपन्यांमध्ये प्रवेश केला. कंपनीचा संयुक्त उपक्रम SQuAD फॉर्जिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (“SQuAD”) ने कंपनीला इंजिन्स, लँडिंग गियर आणि  ब्रेकिंग सिस्टम घटकांसाठी लहान ते मध्यम आकाराचे एरोस्ट्रक्चरल भाग अल्युमिनियम, स्टील, टायटॅनियम किंवा निकेल-आधारित मिश्रधातूंमध्ये तयार करणे यामध्ये सुधारित क्षमतांनी सुसज्ज केले आहे. जोडीला कंपनीची मॅगेलन एरोस्पेस लिमिटेड, कॅनडा च्या साथीने एरोस्पेस प्रोसेसिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (“API”) ही संयुक्त कंपनी 2007 मध्ये स्थापन झाली. तिने कंपनीला नाविन्यपूर्ण सरफेस ट्रीटमेंट उपायसुविधा  पुरविण्यास सक्षम केले आहे. कंपनीची ट्रॅमोंटिना सोबतची संयुक्त कंपनी एक्वस कुकवेअर प्रायव्हेट लिमिटेड नाविन्यपूर्ण ग्राहक उत्पादने विकसित करण्यासाठी तांत्रिक क्षमतांनी सुसज्ज आहे. एरोस्पेस आणि कंझ्युमर विभागांमध्ये दोन दशलक्ष चौ.फूटांहून अधिक उत्पादन जागांसह एक्वस भारतातील उत्तर कर्नाटक मधील तीन अद्वितीय, अभियांत्रिकी-आधारित व्हर्टिकली इंटिग्रेटेड व्हर्टिकली इंटिग्रेटेड अचूक उत्पादन क्षमता “इकोसिस्टिम्स” मध्ये कार्यरत आहे. याशिवाय, एक्वस एरोस्पेस विभागासाठी शोलेट  (फ्रान्स) आणि पॅरिस, टेक्सास (यू.एस.)मध्ये दोन समर्पित प्रिसिजन कॉम्पोनंट उत्पादन सुविधा केंद्रही चालवते. भारतामधील तीन उत्पादन इकोसिस्टिम्स आणि भारताबाहेरील दोन समर्पित एरोस्पेस सुविधा यांमध्ये, एक्वसकडे एरोस्पेस आणि कंझ्युमर विभागातील उत्पादनांसाठी 2,919,058 वार्षिक मशीनिंग/मोल्डिंग तास क्षमता असून, एरोस्पेस विभागासाठी 200 पेक्षा जास्त कंप्युटर न्यूमेरिकल कंट्रोल (“CNC”) मशीन आणि कंझ्युमर उत्पादनांसाठी 161 मोल्डिंग मशीन 31 मार्च, 2025 पर्यंत वापरात आहेत.

Read More
BusinessLatest News

आर अँड डीवर भर असलेली स्पेशॅलिटी केमिकल्स कंपनी प्रासोल केमिकल्सने ₹500 कोटींच्या आयपीओसाठी सेबीकडे कागदपत्रे केली दाखल

स्पेशॅलिटी केमिकल्सचे एकात्मिक उत्पादन करणारी कंपनी प्रासोल केमिकल्स लिमिटेडने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाकडे

Read More
BusinessLatest News

 ‘मेकिंग इंडिया डेंग्यू फ्री’ डेंग्यूपासून बचावासाठी जनजागृतीचा उपक्रम

  पुणे :  मच्छरजन्य आजारांपासून नागरिकांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने, डाबरची सर्वात लोकप्रिय वैयक्तिक वापराची मच्छरप्रतिबंधक ब्रँड ओडोमॉस ने पुण्यात ‘मेकिंग इंडिया डेंग्यू फ्री’ ही भव्य जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांना डेंग्यूबाबत माहिती देणे आणि मच्छरजन्य आजारांपासून स्वतःचे रक्षण कसे करावे हे समजावून सांगणे हे उद्दिष्ट आहे. या उपक्रमांतर्गत ओडोमॉसची टीम शहरातील विविध भागांत पोहोचून जनजागृती करणार असून, लोकांना विनामूल्य ओडोमॉस मच्छर प्रतिबंधक क्रीमचे वितरण केले जाईल. तसेच, बसस्थानके आणि रेल्वे स्थानकांसारख्या सार्वजनिक ठिकाणी डेंग्यू प्रतिबंधावर विशेष जनजागृती सत्रांचे आयोजन करण्यात येईल. पुण्यात आयोजित विशेष कार्यक्रमात १०० हून अधिक लोकांना मच्छरजन्य आजारांविषयी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला देश सेवा फाउंडेशनचे नरेंद्र पारखे , किशोर भाळके, सुनील चव्हाण, तसेच डाबर इंडिया लिमिटेडचे दिनेश कुमार उपस्थित होते. डाबर इंडिया लिमिटेडचे होम केअर विभागाचे मार्केटिंग प्रमुख वैभव राठी म्हणाले, “ब्रँड म्हणून ओडोमॉसचे ध्येय लोकांना डेंग्यू आणि इतर मच्छरजन्य आजारांपासून सुरक्षित ठेवणे आहे. हे ध्येय पुढे नेण्यासाठी आम्ही ही सामाजिक मोहीम सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांत डेंग्यूचे प्रमाण झपाट्याने वाढले असल्याने लोकांना योग्य प्रतिबंधक उपायांची माहिती देणे अत्यावश्यक आहे. या मोहिमेद्वारे आम्ही समाजात डेंग्यूबाबत जागरूकता निर्माण करू इच्छितो.” डाबर इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ व्यवस्थापक दिनेश कुमार म्हणाले, “डेंग्यूपासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर लक्ष केंद्रित करणे अत्यंत आवश्यक आहे. लोक स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करू शकतील यासाठी आम्ही जनजागृती करु इच्छितो. ‘मेकिंग इंडिया डेंग्यू फ्री’ हा उपक्रम त्या दिशेने एक पाऊल आहे.” डेंग्यू पसरवणारे मच्छर प्रामुख्याने दिवसा चावतात. त्यामुळे प्रौढांबरोबरच मुलांचेही रक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घरात असो वा बाहेर, ओडोमॉस पूर्ण मच्छरसंरक्षण प्रदान करते आणि जीवघेण्या आजारांपासून बचाव करते. डॉ. सचिन क्षीरसागर म्हणाले, “दिवस असो वा

Read More
Latest NewsPUNE

त्यागराज खाडिलकर आणि सहकलाकारांच्या गायनाने ‘सुरमयी दिवाळी पहाट’चा शानदार समारोप

पिंपरी :  पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित चार दिवसीय ‘सुरमयी दिवाळी पहाट’चा पार्श्वगायक त्यागराज खाडिलकर, व्हर्सेंटाईल सिंगर

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

देवेंद्र फडणवीस चाणाक्ष राजकारणी  – रवींद्र धंगेकर

पुणे: प्रतिनिधी मित्राला धरून काय बसता, जैन मुनीनी दिलेल्या शापातून मुक्त व्हायचे असेल तर त्यांची मालमत्ता त्यांना परत देऊन टाका,

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

बांगलादेशी घुसखोरांच्या नावाची काळी यादी तयार करण्याचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी आतापर्यंत उघडकीला आलेल्या बांगलादेशी घुसखोरांच्या नावाची काळी यादी तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महिला डॉक्टरने केलेल्या तक्रारींची पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर त्यांचा जीव वाचला असता – अंबादास दानवे

सातारा:   आपल्यावर येणारा दबाव आणि होणारा छळ याबाबत फलटण येथील महिला डॉक्टरने केलेल्या तक्रारींची पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

‘तुतारी’चे निष्ठावंत कार्यकर्ते पठारे विरोधात रणशिंग फुंकणार

सुरेंद्र पठारेंच्या भाजप प्रवेश चर्चेमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात खळबळ पुणे : वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘तू माझा किनारा’चा भावनिक प्रवास सुरू होणार ३१ ऑक्टोबरपासून!

गेल्या महिनाभरापासून प्रेक्षकांच्या उत्सुकतेच्या केंद्रस्थानी असलेला ‘तू माझा किनारा’ हा मराठी चित्रपट आता अखेर प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे. या

Read More