पुणे : क्रोमा या टाटा समूहातील ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर कंपनीने वार्षिक ‘फेस्टिव्हल ऑफ ड्रीम्स’ मोहिमेच्या माध्यमातून सणासुदीचा उत्सव सुरू केला आहे. या मोहिमेत ग्राहकांसाठी अत्यंत आकर्षक ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सणाच्या दिवसांतील आनंद आणि उत्साह वाढवण्यासाठी या ऑफर्स खास तयार केलेल्या आहेत. स्मार्टफोन, टीव्ही, वॉशिंग मशीन, लॅपटॉप आणि रेफ्रिजरेटर यांसह इतर उत्पादनांवर ग्राहक सवलत, कॅशबॅक, ईएमआय आणि एक्सचेंज यांचे उत्कृष्ट फायदे मिळवू शकतात. तसेच जीएसटी करामध्ये सुधारणा झाल्यामुळे टीव्ही आणि एसीवर अतिरिक्त १० टक्के बचत साधता येऊन आपली घरगुती उपकरणे अद्ययावत करणे त्यांना अधिक फायदेशीर होणार आहे. देशातील दोनशेहून अधिक शहरांमधील ‘क्रोमा’च्या ५६०हून अधिक स्टोअर्समध्ये, तसेच croma.com व Tata Neu या अॅपद्वारे ग्राहकांना ही खरेदी अगदी सहज करता येईल. स्वतःसाठी खरेदी करणे असो वा मित्र-परिवारासाठी सणासुदीचे गिफ्ट निवडणे असो, ग्राहकांना सर्वोत्तम योजनांचे लाभ निश्चित मिळतील. दसरा, धनत्रयोदशी, दिवाळी आणि भाऊबीज या येत्या दि. २३ ऑक्टोबरपर्यंत येणाऱ्या सणांच्या दिवशी ब्लॉकबस्टर डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, २० टक्क्यांपर्यंतचा कॅशबॅक आणि आकर्षक ईएमआय सुविधा मिळवून ग्राहक खास उत्सव साजरा करू शकतात. सर्वोत्तम विक्री होणाऱ्या उत्पादन श्रेणींवर थेट सणासुदीची सूट : टीव्ही — ३५ टक्के सूट* स्मार्टफोन — १५ टक्के सूट* रेफ्रिजरेटर — २५ टक्के
Read More