Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

हेक्सागॉन न्यूट्रिशन लिमिटेडतर्फे सेबीकडे डीआरएचपी सादर

डीआरएचपी लिंक: https://www.cumulativecapital.group/Admin/UploadedFiles/DRHP-Hexagon-Nutrition-Limited.pdf

 

हेक्सागॉन न्यूट्रिशन लिमिटेड (“कंपनी”) ने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्सेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे सादर केला आहे.

 

कंपनी ही एक सर्वसमावेशक न्यूट्रिशन क्षेत्रातील कंपनी असून तीन वर्टिकल्समध्ये विविध मायक्रोन्यूट्रिएंट्सची संपूर्ण श्रेणी सादर करते. ब्रँडेड न्यूट्रिशन (B2C), प्रीमिक्स फॉर्म्युलेशन्स (B2B2C) आणि थेरप्युटिक न्यूट्रिशन प्रॉडक्ट्स (ESG सेगमेंट) यामध्ये आहेत. गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करत कंपनी संशोधन आणि उत्पादन विकासापासून ते उत्पादन आणि मार्केटिंगपर्यंत संपूर्ण मूल्य साखळी मध्ये कार्यरत आहे.

 

कंपनी ही भारतातील सर्वात मोठ्या प्रीमिक्स कंपन्यांपैकी एक असून अग्रगण्य भारतीय आणि बहुराष्ट्रीय FMCG कंपन्यांना कस्टमाइज्ड व्हिटॅमिन आणि मिनरल प्रीमिक्स पुरवते. तसेच, जागतिक अन्न सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य उपक्रमांना पाठबळ देत UN कार्यक्रमांतर्गत मायक्रोन्यूट्रिएंट पावडर्स (MNPs) च्या सर्वात मोठ्या परवाना प्राप्त पुरवठादारांपैकी एक आहे.  (स्त्रोत: CARE अहवाल).

 

कंपनी प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) द्वारे निधी उभारण्याची योजना आखत आहे. एकूण ऑफर आकारात 3,08,59,704 पर्यतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचा समावेश आहे (“एकूण ऑफर साईज”). कंपनीला या ऑफरमधून कोणताही निधी प्राप्त होणार नाही (“Offer Proceeds”).

 

ऑफरचे उद्दिष्ट असे आहे की (i) विक्री समभागधारकांमार्फत साधारण [●] दशलक्ष रु. पर्यंत 1 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 3,08,59,704 पर्यतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल करणे आणि (ii) स्टॉक एक्सचेंजवर इक्विटी शेअर्सची लिस्टिंग होण्याचे फायदे मिळवणे (“Objects of the Offer”).

 

या ऑफर फॉर सेल मध्ये अरुण पुरुषोत्तम केळकर यांच्या तर्फे 15,36,477 पर्यंतचे शेअर्स आणि सुभाष पुरुषोत्तम केळकर (दोघेही प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स) यांच्या तर्फे 2,41,88,993 पर्यंतचे शेअर्स यांचा समावेश आहे. तसेच, नूतन सुभाष केळकर यांच्या तर्फे 36,08,142 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि आदित्य केळकर (दोघेही प्रमोटर ग्रुप सेलिंग शेअरहोल्डर्स) यांच्या तर्फे 15,26,092 पर्यंतचे इक्विटी शेअर्स हेसुद्धा विक्रीच्या ऑफरमध्ये समाविष्ट आहेत.

 

क्युम्युलेटिव्ह कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड आणि कॅटलिस्ट कॅपिटल पार्टनर्स प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading