Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

एचडी फायर प्रोटेक्ट लिमिटेडतर्फे सेबी कडे डीआरएचपी सादर

 

एचडी फायर प्रोटेक्ट लिमिटेड (कंपनी) ने सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया भारतीय भांडवली बाजार नियामक मंडळ (सेबीकडे आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपीसादर केला आहे.

कंपनी ही आग प्रतिबंधक उपकरणे आणि प्रणाली यांची निर्माता आणि पुरवठादार असून पाणीफोम आणि गॅस-आधारित फायर सप्रेशन सिस्टम्स (सामान्यतः फायरफायटिंग प्रॉडक्ट्स म्हणून ओळखले जाणारे) यांचा समावेश असलेला पोर्टफ़ोलिओ उपलब्ध करून देते. कंपनी आपल्या बहुतेक उत्पादनांची रचना स्वतःच्या डिझाईनद्वारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विकसित करते. त्यायोगे उच्च धोक्याच्या औद्योगिक क्षेत्रांपासून निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रांपर्यंत सेवा दिल्या जात आहेत.

कंपनी आर्थिक वर्ष 2024 मध्ये कामकाजातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या (Revenue from Operations) दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फायर प्रोटेक्शन (आग प्रतिबंधक) उपकरणे आणि प्रणाली यांची निर्माती होती आणि आर्थिक वर्ष 2024 मध्ये व्हॅल्यू (इक्विपमेंट) च्या दृष्टीने सर्वात मोठी निर्यातदार होती. कंपनी आर्थिक वर्ष 2025 पर्यंत 90 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात विक्री करत आहे.

एकूण ऑफर साईजमध्ये 26,284,500 पर्यतच्या इक्विटी शेअर्सपर्यंतच्या ऑफर फॉर सेलचा समावेश आहे (एकूण ऑफर साईज). कंपनीला या ऑफरमधून कोणतीही रक्कम प्राप्त होणार नाही (Offer Proceeds).

या ऑफरची उद्दिष्टे अशी आहेत: (i) प्रवर्तक विक्री समभागधारकांकडून प्रत्येकी रु. दर्शनी मूल्य असलेल्या 26,284,500 पर्यतच्या इक्विटी शेअर्सपर्यंत ऑफर फॉर सेल पार पाडणे आणि (ii) इक्विटी शेअर्सना स्टॉक एक्स्चेंजेसवर लिस्टिंग करून त्याचे लाभ मिळवणे.

या ऑफर फॉर सेलमध्ये हरिष नर्शी धरमशी यांच्याकडून 8,983,700 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि कुसुम हरिष धरमशी यांच्याकडून 17,300,800 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे (दोघेही प्रवर्तक विक्री समभागधारक आहेत).

अॅम्बिट प्रायव्हेट लिमिटेडआनंद राठी अॅडव्हायजर्स लिमिटेड आणि आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड हे या ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading