Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

 ‘मेकिंग इंडिया डेंग्यू फ्री’ डेंग्यूपासून बचावासाठी जनजागृतीचा उपक्रम

 

पुणे :  मच्छरजन्य आजारांपासून नागरिकांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने, डाबरची सर्वात लोकप्रिय वैयक्तिक वापराची मच्छरप्रतिबंधक ब्रँड ओडोमॉस ने पुण्यात ‘मेकिंग इंडिया डेंग्यू फ्री’ ही भव्य जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांना डेंग्यूबाबत माहिती देणे आणि मच्छरजन्य आजारांपासून स्वतःचे रक्षण कसे करावे हे समजावून सांगणे हे उद्दिष्ट आहे.

या उपक्रमांतर्गत ओडोमॉसची टीम शहरातील विविध भागांत पोहोचून जनजागृती करणार असून, लोकांना विनामूल्य ओडोमॉस मच्छर प्रतिबंधक क्रीमचे वितरण केले जाईल. तसेच, बसस्थानके आणि रेल्वे स्थानकांसारख्या सार्वजनिक ठिकाणी डेंग्यू प्रतिबंधावर विशेष जनजागृती सत्रांचे आयोजन करण्यात येईल.

पुण्यात आयोजित विशेष कार्यक्रमात १०० हून अधिक लोकांना मच्छरजन्य आजारांविषयी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला देश सेवा फाउंडेशनचे नरेंद्र पारखे , किशोर भाळके, सुनील चव्हाण, तसेच डाबर इंडिया लिमिटेडचे दिनेश कुमार उपस्थित होते.

डाबर इंडिया लिमिटेडचे होम केअर विभागाचे मार्केटिंग प्रमुख वैभव राठी म्हणाले, “ब्रँड म्हणून ओडोमॉसचे ध्येय लोकांना डेंग्यू आणि इतर मच्छरजन्य आजारांपासून सुरक्षित ठेवणे आहे. हे ध्येय पुढे नेण्यासाठी आम्ही ही सामाजिक मोहीम सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांत डेंग्यूचे प्रमाण झपाट्याने वाढले असल्याने लोकांना योग्य प्रतिबंधक उपायांची माहिती देणे अत्यावश्यक आहे. या मोहिमेद्वारे आम्ही समाजात डेंग्यूबाबत जागरूकता निर्माण करू इच्छितो.”

डाबर इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ व्यवस्थापक दिनेश कुमार म्हणाले, “डेंग्यूपासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर लक्ष केंद्रित करणे अत्यंत आवश्यक आहे. लोक स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करू शकतील यासाठी आम्ही जनजागृती करु इच्छितो. मेकिंग इंडिया डेंग्यू फ्री’ हा उपक्रम त्या दिशेने एक पाऊल आहे.”

डेंग्यू पसरवणारे मच्छर प्रामुख्याने दिवसा चावतात. त्यामुळे प्रौढांबरोबरच मुलांचेही रक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घरात असो वा बाहेर, ओडोमॉस पूर्ण मच्छरसंरक्षण प्रदान करते आणि जीवघेण्या आजारांपासून बचाव करते.

डॉ. सचिन क्षीरसागर म्हणाले, “दिवस असो वा रात्र, घरात असो वा बाहेर — नेहमी ओडोमॉस लावा आणि स्वतःचे तसेच कुटुंबाचे मच्छरांपासून संरक्षण करा.”

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading