Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पोलीस भरती नाकारल्याने वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या उमेदवारांनाही पात्र ठरविणार

मुंबई: प्रतिनिधी

विविध कारणांमुळे पोलीस भरती नाकारल्याने वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या उमेदवारांनाही आगामी पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल करण्यास पात्र ठरविणारा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे हजारो उमेदवारांना वय ओलांडूनही पोलीस भरतीसाठी संधी मिळणार आहे.

सरकारने पोलीस दलात रिक्त असलेली सर्व पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लवकरच तब्बल १५ हजार पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. कोरोना महामारी आणि इतर काही कारणांमुळे पोलीस भरती अनेक वर्ष रखडली आहे. या काळात भरतीसाठीची वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्यांची संधी नाकारली जाऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलीस शिपाई पदासाठी १२ हजार ३९९, पोलीस शिपाई चालक २३४,  पोलीस दलाच्या बँडमध्ये वादकांच्या २५, सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या २ हजार ३९३, कारागृह शिपाई ५८० पदे अशी एकूण १५ हजार ६३१ पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading