Monday, May 25, 2026
ENTERTAINMENTLatest News

गणपतीची सगळ्यांना सुट्टी मिळावी म्हणून आम्ही डे-नाईट शूट करतोय

गणपती बाप्पा मोरया! असं म्हणत संपूर्ण महाराष्ट्र भक्तिभावाने आणि उत्साहात गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे घरात आनंद, शुभशकुन आणि सकारात्मकतेचा वास. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण बाप्पाच्या स्वागतासाठी तयारीला लागलेले असतात. घर सजवणं, मूर्तीची निवड करण, आरत्या आणि प्रसादाचं नियोजन अशा अनेक गोष्टींमध्ये सगळे व्यग्र असतात. यात आपला कलाकार वर्ग काही वेगळा नाही. शूटिंग सांभाळून बाप्पाच्या आगमनासाठी  तयारी करणं हे त्यांच्यासाठी ही रोमांचक आहे. ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील सिद्धीराज गाडेपाटील (सिद्धू) उर्फ अभिनेता कुणाल शुक्लने आपल्या घरच्या बाप्पासाठी काय आणि कशी खास तयारी केली या बद्दल सांगितले- ” गणपती म्हणजे माझ्यासाठी तो सण आहे ज्यात सगळेजण आपली कामं, टेंशन बाजूला ठेऊन एकत्र येतात. मित्र-परिवारासोबत वेळ  घालवतात . सगळीकडे सकारात्मक वातावरण असतं, ज्यामुळे आपणही मानसिकदृष्ट्या ताजेतवाने होतो. आमच्या घरी  दीड दिवसाचा  गणपती  असतो. या वर्षी खास  म्हणजे  माझ्या  नवीन  घरातला  हा  पहिला  गणपती  आहे, तेव्हा हे वर्ष  माझ्यासाठी खूप खास आहे. ह्यावर्षीच्या सजावटीसाठी मी खूप उत्साही आहे. मी  सेटवरून  सगळं  मॉनिटर करतोय. एका ठिकाणी घरच्या बाप्पाची तयारी तर सेटवर ही  आमचं  गणपती  शूट चालू  आहे  आणि  गणपतीची  सगळ्यांना  सुट्टी  मिळावी  म्हणून आम्ही डे-नाईट गणपती  सीन  शूट  करतोय. माझ्यासाठी शूटमुळे आधीच गणेशोत्सव सुरु झाला आहे आणि  त्यामुळे उत्साह  अजून  वाढला आहे.”

तेव्हा बघायला विसरू नका ‘लक्ष्मी निवास’ दररोज रात्री ८:०० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading