टीव्हीएस मोटर कंपनीने टीव्हीएस रेडर सुपर स्क्वॉड लाइन-अपचा विस्तार केला
बेंगळुरू : दुचाकी तसेच तीन चाकी वाहनांच्या निर्मितीमध्ये जागतिक पातळीवरील आघाडीवर असलेल्या टीव्हीएस मोटर कंपनीने आज टीव्हीएस रेडर सुपर स्क्वॉड एडिशनच्या विस्ताराची घोषणा केली. मार्वलच्या डेडपूल आणि वोल्व्हरिन या दोन सुप्रसिद्ध पात्रांकडून प्रेरणा घेऊन ही नवीन आवृत्ती टीव्हीएस रेडरच्या डिझाइनमध्ये अनोखे बदल करते. यामुळे सुपर स्क्वॉड श्रेणी वेगळ्याच उंचीवर पोहोचते.
या अनोखे बदल केलेल्या ताज्यातवान्या आवृत्तीत डायनॅमिक डेकल्स आहेत. मार्वलचे डेडपूल आणि वोल्व्हरिन हे यासाठी प्रेरणा ठरले आहेत. यामुळे 125 सीसी सेगमेंटमध्ये मोटरसायकलचे स्थान अधिक भक्कम करतात. नवीन टीव्हीएस रेडर एसएसई वेग आणि उद्देशाने परिपूर्ण आहे ज्यामध्ये शक्तिशाली 3-व्हॉल्व्ह इंजिन, 6,000 आरपीएमवर 11.75 एनएमचा सर्वोत्तम टॉर्क आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वैशिष्ट्यांचा संच आहे. सुपर स्क्वॉड एडिशनमध्ये आता वाढीव प्रवेगासाठी बूस्ट मोडसह आयजीओ असिस्ट आणि सीमलेस लो-स्पीड मॅन्युव्हरेबिलिटी तसेच वाढीव इंधन कार्यक्षमतेसाठी जीटीटी (ग्लाइड थ्रू टेक्नॉलॉजी) देखील मिळेल. यात 85+ वैशिष्ट्यांसह पूर्णपणे कनेक्टेड रिव्हर्स एलसीडी क्लस्टर देखील आहे, जो अत्याधुनिक नवोपक्रम आणि रोमांचक राइड अनुभव एकत्र करतो.
आयर्न मॅन आणि ब्लॅक पँथरसह ऑगस्ट 2023 मध्ये पदार्पण करणारी टीव्हीएस रेडर ही मार्वल-थीम असलेली आवृत्ती लाँच करणारी भारतातील पहिली मोटरसायकल ठरली. सुपरहिरो स्टाईल आणि वेगामुळे ही बाइक तरुण रायडर्सची आवडती ठरली. मार्वलसोबतच्या या यशस्वी सहकार्याला अधिक भक्कम करत जनरेशन झेडसाठी अनोखी डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने टीव्हीएस मोटर कंपनी सुप्रसिद्ध कॅरॅक्टर्सना संजीवनी देत आहे. आपल्या बाइक्समधून आपले व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित व्हावे अशा रायडर्ससाठी ही बाइक आहे. यासोबतच त्याला प्रगत तंत्रज्ञान आणि अनोख्या डिझाइनचा लूक मिळाला आहे.
नवीन टीव्हीएस रेडर सुपर स्क्वॉड एडिशनची किंमत ₹99,465 (एक्स-शोरूम दिल्ली) आहे आणि या महिन्यापासून सर्व टीव्हीएस मोटर कंपनी डीलरशिपवर उपलब्ध असेल.
