Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

कर्नाटकमध्ये महिंद्राचा विस्तार : बेंगळुरूमध्ये नवी अत्याधुनिक ट्रक-बस डीलरशिप

बेंगळुरू  : गेल्या चार वर्षांत विक्रीत मोठी झेप घेतल्यानंतर महिंद्राच्या ट्रक आणि बस व्यवसायाने आज कर्नाटकमधील बेंगळुरूमध्ये अत्याधुनिक ३एस (सेल्ससर्व्हिसस्पेअर्स) डीलरशिपचे उद्घाटन केले. या नवीन केंद्रामुळे महिंद्राची राज्यातील उपस्थिती अधिक बळकट होणार आहे. या डीलरशिपमध्ये एकूण नऊ सर्व्हिस बे असून दररोज आठहून अधिक वाहनांना सेवा देता येणार आहे. चालकांसाठी निवासाची सुविधा, २४ तास ब्रेकडाऊन सहाय्य तसेच अ‍ॅडब्ल्यूची उपलब्धता यांसारख्या आधुनिक सोयीसुविधा येथे देण्यात आल्या आहेत.

उद्घाटनप्रसंगी बोलताना महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष – एसएमएल इसुझू लिमिटेड, अध्यक्ष – एरोस्पेस अँड डिफेन्स, ट्रक्स, बसेस अँड कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट तसेच महिंद्रा ग्रुप एक्झिक्युटिव्ह बोर्डाचे सदस्य श्री. विनोद सहाय म्हणाले की, “बेंगळुरूमधील या अत्याधुनिक डीलरशिपचे उद्घाटन करताना आम्हाला अभिमान वाटतो. नॉर्थस्टार मोटर्स ही महिंद्रा ट्रक्स आणि बसेसची 84वी डीलरशिप ठरत आहे. सध्या महिंद्रा ट्रक्स आणि बसेस व एसएमएल मिळून देशभरात 185 डीलरशिप्स आणि 597 मान्यताप्राप्त वर्कशॉप्स आहेत. आमच्या ग्राहकांना जागतिक दर्जाची सेवा पुरवणे हेच आमचे ध्येय आहे. सध्या महिंद्राचा ट्रक्स आणि बस क्षेत्रातील बाजारहिस्सा जवळपास सात टक्के आहे, तर आय अँड एलसीव्ही बस विभागात हा हिस्सा 24 टक्के इतका आहे. कंपनीने 2031 पर्यंत बाजारहिस्सा 10 ते 12 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे आणि २०३६ पर्यंत तो 20 टक्क्यांहून अधिक करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.”

डॉ. वेंकट श्रीनिवास, कंपनीचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी – एसएमएल इसुझू लिमिटेड तसेच व्यवसायप्रमुख   महिंद्रा ट्रक्स, बसेस आणि कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट यांनी सांगितले, “ग्राहककेंद्री दृष्टिकोन हीच आमची खरी प्रेरणा आहे आणि याच विचारसरणीतून आम्ही आमच्या ग्राहकांसाठी नवनवीन व वेगळ्या प्रकारची मूल्यनिर्मिती केली आहे. आमच्या संपूर्ण उत्पादन श्रेणीतील हमखास जास्त मायलेज असो, अथवा अत्याधुनिक iMAXX टेलिमॅटिक्स सोल्यूशन जे फ्लीट मालकांना त्यांच्या ट्रान्सपोर्ट व्यवसायावर पूर्ण नियंत्रण देते – या सर्व उपक्रमांचा उद्देश ग्राहकांचा अनुभव अधिकाधिक उत्कृष्ट करणे हाच आहे. यासोबतच, देशभरात झपाट्याने वाढणारे डीलरशिप नेटवर्क आणि विक्रीनंतरच्या सेवेच्या विविध सुविधा यांमुळे आम्ही भारतीय व्यावसायिक वाहन उद्योगात सर्वोत्तम ग्राहकसेवा देण्यास कटिबद्ध आहोत.”

महिंद्राचे ब्लाझो एक्स, फ्युरिओ, ऑप्टिमो आणि जायो हे देशातील एकमेव व्यावसायिक ट्रक मॉडेल्स आहेत ज्यांना दुहेरी सेवा हमी मिळते. यामध्ये वाहन ४८ तासांत परत रस्त्यावर आणण्याची हमी देण्यात आली आहे, अन्यथा कंपनी ग्राहकाला प्रतीदिवस १,००० रुपये देईल. याशिवाय डीलर वर्कशॉपमध्ये वाहनाची दुरुस्ती ३६ तासांत पूर्ण करण्याची हमी दिली जाते; जर हे वेळेत झाले नाही तर कंपनी ग्राहकाला प्रतीदिवस ३,००० रुपये अदा करेल.

सततची उत्पादनात्मक नवनिर्मिती आणि ग्राहककेंद्रित धोरण हाच महिंद्रा ट्रक्स अँड बसेस (एमटीबी) चा गाभा आहे, ज्यामुळे या दुहेरी सेवा हमी शक्य झाली आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading