Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

माझ्या कुटूंबियाना न्याय न मिळाल्यास पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार — संघमित्रा गायकवाड

पुणे :  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रदेश सचिव संघमित्रा गायकवाड यांच्या कुटुंबीयांवर वेळोवेळी अन्याय होत आहे .कुटूंबावर खंडणी, धमकी व शिवीगाळ प्रकरणी पोलीस प्रशासन व सरकार दरबारी पत्र व्यवहार केलेला आहे. या बाबतीत मा. मुख्यमंत्री, मा. गृहमंत्री यांच्या कार्यालयातून या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून मुंढवा पोलीस स्टेशन या ठिकाणी पत्र पाठविले.
परंतु त्या ठिकाणचे चौकशी अधिकारी यांना ३ महिन्यापासून या बाबतीत विचारणा करीत आहे. परतु त्यानी उलट सुलट बोलून स्टेशनच्या बाहेर जाण्यास सांगितले,पण त्यांनी माझा जबाब घेतलेला नाही.. मला व माझ्या कुटूंबियाना काही समाज कटकापासून आमच्या जिवीतास भिती आहे. मला या बाबतीत न्याय मिळावा आणि या संबंधीत प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून मी येत्या १५ दिवसात पोलीस आयुक्त कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कारवाई होण्याबाबत पत्र पाठवून देखील पोलीस प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे .
माझ्या कुंटूबियांना पोलीस संरक्षण मिळावे व मला या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी माननीय पुणे पोलीस आयुक्त तसेच महिला आयोगाकडे केली आहे .
१५ दिवसात न्याय न मिळाल्यास पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रदेश सचिव संघमित्रा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading