Wednesday, September 16, 2026
BusinessLatest News

टीसीएस इन्क्विझिटिव्ह २०२५ पुणे फेरी सिटी प्राइड स्कूल आणि महावीर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिंकली

पुणे: आयटी सेवा, सल्ला आणि व्यवसाय उपाययोजना प्रदान करण्यात जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस (बीएसई: ५३२५४०, एनएसई: टीसीएस)ची एक प्रमुख प्रश्नमंजुषा स्पर्धा टीसीएस इन्क्विझिटिव्हची पुणे फेरी कॅम्प येथील जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉलमध्ये पार पडली. आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या असलेल्या या उपक्रमात ४८ शाळांमधील ६२४ हून अधिक विद्यार्थ्यांनी त्यांच्या बौद्धिक कौशल्याचे प्रदर्शन केले.

अटीतटीच्या पाच फेऱ्या यशस्वीपणे पार करत, मोशी येथील सिटी प्राइड स्कूलचे अवनीश भरत निकम आणि सिद्धार्थ मंत्री यांनी पुणे फेरीचे विजेतेपद जिंकले. महावीर इंग्लिश मीडियम स्कूलचे जिनांश शाह आणि गीत मंगलमूर्ती हे उपविजेते बनले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अवंतिका विद्यापीठ उज्जैन आणि एमआयटी विद्यापीठ शिलाँगचे कुलगुरू डॉ. संजय गोविंद धांडे आणि टीसीएस पुणेचे उपाध्यक्ष आणि क्षेत्र प्रमुख प्रसाद एम. शास्त्री उपस्थित होते. त्यांनी विजेत्यांना बक्षिसे देऊन त्यांचे अभिनंदन केले. हे विजेते आता भारतातील इतर प्रादेशिक फेऱ्यांमधील विजेत्यांसह राष्ट्रीय अंतिम स्पर्धेत पुण्याचे प्रतिनिधित्व करतील.

पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. धांडे म्हणाले, “टीसीएस इन्क्विझिटिव्हमधील विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्साह पाहून खूप आनंद झाला. ही क्विझ विद्यार्थ्यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रवीणतेची चाचणी घेते, परंतु माझा असा विश्वास आहे की ज्ञान समग्र असले पाहिजे. मानव्यशास्त्र आणि सामाजिक शास्त्रांचे एकत्रीकरण अधिक व्यापक आव्हान समोर ठेवते, या तरुण प्रतिभांना अशा जगासाठी तयार करते जिथे आंतरविद्याशाखीय समज महत्त्वाची आहे. विजेत्यांचे आणि सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन.”

टीसीएस पुणेचे क्षेत्र प्रमुख श्री. प्रसाद एम. शास्त्री म्हणाले, “टीसीएस इन्क्विझिटिव्ह ही केवळ एक प्रश्नमंजुषा नाही. भारताचे भविष्य जे घडवणार आहेत अशा प्रतिभावंतांच्या  जिज्ञासेचा, नवनवीन शिकण्याच्या उत्कट इच्छेचा हा सन्मान आहे. तरुणांना शिकण्यासाठी आणि नवीनतम तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी प्रेरित करण्यात टीसीएस नेहमीच आघाडीवर राहिले आहे. तंत्रज्ञान आणि विज्ञानातील कुतूहलाला प्रोत्साहन देऊन, आम्ही विद्यार्थ्यांना डिजिटल युगात आवश्यक असलेली परिपक्व, गंभीर विचारसरणी आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यांसह सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. पुण्यातील प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचा आम्हाला अभिमान आहे आणि विजेत्यांनी बजावलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो.”

टीसीएस इन्क्विझिटिव्ह हा एक नाविन्यपूर्ण शिक्षण उपक्रम आहे जो गेल्या दोन दशकांपासून तरुण विद्यार्थ्यांना प्रेरणा देत आहे. आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाबद्दल उत्सुकता आणि जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने या स्पर्धेमध्ये माहिती तंत्रज्ञान, विज्ञान, क्रीडा, अभियांत्रिकी आणि कला यांचा समावेश केला जातो. ही स्पर्धा अहमदाबाद, बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, इंदूर, कोची, कोलकाता, मुंबई, नागपूर आणि पुणे या १२ शहरांमध्ये आयोजित केली जाते, प्रत्येक शहर या प्रवासाचा एक अध्याय असतो. स्पर्धेचा समारोप उपांत्य फेरीनंतर भव्य अंतिम फेरीने होईल. अंतिम विजेत्या शाळेला टीसीएस इन्क्विझिटिव्ह नॅशनल चॅम्पियन २०२५ ही पदवी देण्यात येईल.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading