Friday, April 3, 2026
Latest NewsPUNE

येत्या शनिवारी डॉ. गो. बं. देगलूरकर यांचा ‘गणेश मूर्ति’ विषयावर मास्टर क्लास

 

पुणे : पुण्यातील इंडी हेरीटेज व बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘मास्टर क्लास’ उपक्रमांतर्गत भारतीय मुर्तीशास्त्र या विषयावरील जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे ‘गणेश मूर्ति’ या विषयवार व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. येत्या गणेशोत्सवाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेले हे व्याख्यान येत्या शनिवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथील नवलमल फिरोदिया सभागृहात संपन्न होईल. व्याख्यान सर्वांसाठी खुले असून त्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. प्रवेश प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर प्रवेश दिला जाईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading