Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

‘संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी प्रत्येकाचा पुढाकार हवा’ – डॉ. गीताली टिळक

पुणे : विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयाचा केवळ गुण मिळविण्याकरीता अभ्यास करु नये. संस्कृत भाषेत अनेक संधी उपलब्ध आहेत. यात संशोधनासाठी मोठा वाव आहे. त्यामुळे संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. गीताली टिळक यांनी केले.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीयविद्या अध्ययन केंद्रातर्फे ५६ वा संस्कृत दिन समारंभ शुक्रवारी सदाशिव पेठेतील टिमवित मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. टिळक होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्याप्रसंगी यंदाचा ‘लोकमान्य टिळक संस्कृत’ पुरस्कार संस्कृत तज्ज्ञ प्रा. डॉ. नी. एम्. नीलकंठन् यांना कुलगुरु डॉ. गीताली टिळक यांच्या हस्ते देऊन
गौरविण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. सुवर्णा साठे, अधिष्ठाता प्रा. मंजूषा गोखले, डॉ. मंजिरी भालेराव आदी उपस्थित होते.
डॉ. गीताली टिळक म्हणाल्या, संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार व संवर्धन करण्यासाठी ‘लोकमान्य टिळक संस्कृत पुरस्कार दिला जातो. लोकमान्य टिळक हे संस्कृत तज्ज्ञ होते. त्यांनी दिलेला राष्ट्रीय शिक्षणाच्या विचारांचा आजच्या नवीन शैक्षणिक धोरणात समावेश करण्यात आला आहे. आपली संस्कृती जतन करण्यासाठी संस्कृत भाषेचा सखोल अभ्यास आपण केला पाहिजे. शालेय शिक्षणापासून संस्कृत भाषा आपण शिकू शकतो. कला, गणित, विज्ञान यासह अनेक विषयाबरोबर संस्कृत भाषा शिकण्याची संधी आपल्याला घेता येणार आहे. संस्कृत भाषेचा इतिहास, माहिती आपण समजून घेतली पाहिजे, असेही यावेळी त्यांनी नमूद केले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीयविद्या अध्ययन केंद्रातर्फे यंदाचा ‘लोकमान्य टिळक संस्कृत’ पुरस्कार संस्कृत तज्ज्ञ प्रा. डॉ. सी. एम्. नीलकंठन् यांना टिमविच्या कुलगुरु डॉ. गीताली टिळक यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. सुवर्णा साठे, अधिष्ठाता प्रा. मंजूषा गोखले, डॉ. मंजिरी भालेराव उपस्थित होत्या.
पुरस्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. नीलकंठन् म्हणाले, लोकमान्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. हा पुरस्कार सतत ऊर्जा देणारा राहिल. भारत हा ज्ञानाचा भंडार आहे. भारतातील विज्ञान-तंत्रज्ञान विषयातील शाखांच्या अभ्यासासाठी संस्कृतची मदत होऊ शकते. मात्र, हा अभ्यास करताना केवळ तर्कशुद्ध आणि पुराव्यासह सिद्ध झालेल्याच गोष्टी मान्य केल्या पाहिजेत. आपण आत्मविश्वासाने संस्कृत भाषेचा अभ्यास केला पाहिजे. कोणतेही शिक्षण घ्या, पण संस्कृतचा अभ्यास करणे सोडू नका, असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.
संस्कृत भाषेत ‘मूर्ती’ या विषयावर तीन मिनिटांची लघुपट स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक अमृता करंबेळकर, द्वितीय शर्वरी एरंडे, तृतीय प्राजक्ता साहनी, तर उत्तेजनार्थ वेदिका काण्णव यांनी पारितोषिक पटकाविले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र, पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेच्या प्रायोजिका सुषमा चोपडा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच शालांत परीक्षेत संस्कृत विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना करण्यात आला.
प्रास्ताविक श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीयविद्या अध्ययन केंद्राच्या विभाग प्रमुख डॉ. मंजिरी भालेराव यांनी केले. यावेळी त्यांनी विभागाच्या कार्याचा आढावा घेतला. प्रा. डॉ. नीलकंठन् यांच्या मानपत्राचे वाचन प्रा. डॉ. अंबरीष खरे यांनी केले. प्रा. डॉ. ज्योत्स्ना खरे यांनी ओळख करुन दिली. तर प्रा. ग. उ. थिटे यांनी परिचय करून दिला. प्रथमेश बिवलकर यांनी संस्कृतमधून सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. मंजूषा गोखले यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading