ट्रान्सलाईन टेक्नॉलॉजीज लिमिटेडतर्फे सेबीकडे डीआरएचपी सादर
ट्रान्सलाईन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (“कंपनी”) ही इंटिग्रेटेड सिक्युरिटी आणि सर्व्हेलन्स सिस्टिम्स, बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन प्लॅटफॉर्म्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणीत सॉफ्टवेअर उत्पादनांचे डिझाइन, विकास आणि अंमलबजावणी यावर लक्ष केंद्रित करणारी वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञान-उपाय सुविधा पुरवठादार कंपनी आहे. कंपनीने बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (“सेबी”) कडे आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“डीआरएचपी”) सादर केला आहे.
कंपनी प्राथमिक समभाग विक्रीतून (आयपीओ) इक्विटी शेअर कॅपिटलद्वारे निधी उभारण्याची योजना आखत आहे. प्राथमिक समभाग विक्रीच्या एकूण ऑफर साईजमध्ये प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 16,191,500 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ‘ऑफर फॉर सेल’ समाविष्ट आहे.
ट्रान्सलाईन टेक्नॉलॉजीजचे बिझनेस मॉडेल प्रोजेक्ट-आधारित सिस्टीम इंटिग्रेशन कॉन्ट्रॅक्ट्स, सॉफ्टवेअर अॅज अ सर्व्हिस (“SaaS”) सबस्क्रिप्शन्स, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर उत्पादनांची विक्री, तसेच वार्षिक देखभाल आणि मॅनेज्ड सपोर्ट यांसारख्या तांत्रिक सेवांसह एकाधिक स्रोतांमधून उत्पन्न निर्माण करते. कंपनीने स्टोअर पल्स हा एआय प्रणीत व्हिडिओ अॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म, कॅम स्टोअर हा रिअल-टाइम व्हिडिओ कॉम्प्रेशन आणि स्टोरेज ऑप्टिमायझेशन सोल्यूशन आणि चेक कॅम ही सीसीटीव्ही नेटवर्क हेल्थ मॉनिटरिंग यंत्रणा अशा मालकी हक्काच्या सॉफ्टवेअर टूल्सचा एक पोर्टफोलिओ विकसित केला आहे. ते स्वतंत्र क्लाउड-डिप्लॉइड SaaS सोल्यूशन्स म्हणून किंवा इंटिग्रेटेड टर्नकी डिप्लॉयमेंट्सचा भाग म्हणून सादर केले जातात.
मोतिलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स लिमिटेड हे या इश्यूचे एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) आहेत.
