Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

पुणे भाजपा मंडल अध्यक्षांचा दिल्लीत ‘सशक्त’ ठसा!

पुणे : पुण्यातील भाजपा मंडल अध्यक्षांनी दिल्लीत थेट केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत आगामी महापालिका निवडणुकांसाठी ‘रणनिती’ सादर करत प्रभावी उपस्थिती लावली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर झालेल्या या बैठकीत कार्यकर्त्यांच्या अनुभवातून तयार झालेला ‘ग्राउंड रोडमॅप’ मांडण्यात आला. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या भेटीचा मुख्य सूत्रधार ठरले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुणे मंडल अध्यक्षांना उद्देशून स्पष्ट संदेश दिला की, “मतदारयादीतील प्रत्येक पानावर असलेला कार्यकर्ता म्हणजे भाजपाची मूलभूत ताकद आहे.” त्यांनी या बैठकीत ‘पन्ना प्रमुख’ रचनेवर भर देत थेट संवाद साधण्याचे महत्त्व अधोरेखित केले.”विजय ही केवळ रणनीती नव्हे, तर कार्यकर्त्यांच्या अथक श्रमांची फलश्रुती आहे,” अशा शब्दांत अमित शहा यांनी कौतूक केले आहे.

पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले. आकडेवारी आणि पारदर्शक संघटना हीच खरी ताकद आहे. भाजपाचे यश गेली अनेक वर्षे निवडणुकीच्या सतत चालू असलेल्या ‘‘इलेक्शन मोड’’मध्ये आहे. “आम्ही हार-जीत न पाहता आकडेवारी, फीडबॅक आणि कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित रणनिती आखतो,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, मतदारयादीतील प्रत्येक पानावर (पन्ना) नियुक्त असलेल्या कार्यकर्त्यांशी थेट संपर्कात राहा, अशी सूचना दिली.

संवाद आणि कार्यकर्ता सन्मान…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे मंडल अध्यक्षांचे स्वागत करत भाजपाची संघटनशक्ती आणि तळागाळातील कार्यकर्त्यांचा आवाज याचे विशेष कौतुक केले. “मोठा नेता आणि गल्लीतील कार्यकर्ता दोघांनाही सारखे महत्त्व देणारा पक्ष म्हणजे भाजप,” असा सल्ला त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिला.

मुरलीधर मोहोळ यांची भूमिका ठळक…
या दौऱ्याच्या आयोजनामागे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भूमिका ठळक होती. केवळ भेटच नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरून पुणे भाजपाच्या संघटनेवर असलेला विश्वास आणि ‘गल्लीतून संसद’ पर्यंतचा संवाद’ याचे प्रतिबिंब या बैठकीतून स्पष्ट दिसले. “महापालिका निवडणुका जवळ असल्याने यंत्रणा सज्ज ठेवणे आणि थेट संवादातून दिशा मिळवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे, अशी भावना मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केली.

‘सडक से संसद तक’ भाजपा…
या महत्त्वपूर्ण दौऱ्यात पुण्यातील मंडल अध्यक्षांनी दिल्लीत थेट राष्ट्रीय नेतृत्वासमोर आपले विचार मांडत भाजपाची कार्यपद्धती, संवादशैली आणि संघटन बांधणी या बाबतीत आदर्श घालून दिला. या संवादातून महापालिकेतील विजयाचा नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपा संघटना अधिक शिस्तबद्ध आणि सज्ज असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येते. अमित शहा, नड्डा, गडकरी यांच्यासारख्या राष्ट्रीय नेतृत्वापर्यंत थेट पोहोचणारे मंडल कार्यकर्ते आणि मोहोळ यांसारखे समन्वयक यांचे हे यश भाजपाच्या यशाचे ‘की-पॉईंट्स’ ठरणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading