Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

स्‍वातंत्र्य दिनानिमित्त आदित्‍य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलतर्फे ‘स्‍प्‍लॅश ऑफ कलर्स’ पर्व २ चित्रकला स्‍पर्धेचे आयोजन

 

पुणे : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून चिंचवड येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमधील माता व बाल संगोपन विभागातर्फे लहान मुलांसाठी ‘स्प्लॅश ऑफ कलर्स’ ही विशेष चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा रविवार, दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ : ३० वाजता हॉस्पिटलच्या परिसरात रंगणार असून, यात मुलांना त्यांच्या कल्पना रंगात उतरवता येणार आहेत. यंदा, या स्पर्धेचे दुसरे पर्व असून स्‍वातंत्र्य दिनाच्‍या निमित्ताने ‘इंडिया@७८: आरोग्‍याच्‍या माध्‍यमातून स्‍वातंत्र्याचे साजरीकरण’ या संकल्पनेवर आधारित हि स्पर्धा रंगणार आहे.

गेल्‍या वर्षी मिळालेल्‍या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादानंतर यंदाचे पर्व हे अधिक मोठे असणार आहे. ही स्‍पर्धा ३ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांसाठी खुली आहे. हि स्पर्धा वयोगटानुसार विभागण्‍यात आली असून १,००० हून अधिक लहान आर्टिस्‍ट्स यात सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. ‘स्प्लॅश ऑफ कलर्स’ हा उपक्रम मुलांच्या कल्पनाशक्तीचा, एकत्र येण्याचा आणि आरोग्याचा आनंद साजरा करणारा आहे

या उपक्रमाबाबत माहिती देताना आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या पीडियाट्रिक विभागाच्या सहयोगी संचालक आणि वरिष्ठ सल्लागार डॉ. प्रिया मानकरे म्हणाल्या,”‘स्प्लॅश ऑफ कलर्स’ या उपक्रमाच्या पहिल्या पर्वाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता, यंदा पुन्हा एकदा रंग, आनंद आणि कल्पनाशक्तीचा उत्सव साजरा करताना खूप समाधान वाटत आहे. या उपक्रमातून मुलांना आरोग्याची माहिती मिळते आणि एकत्र येण्याची संधी मिळते. मुलांचं मानसिक स्वास्थ्य आणि त्यांच्या सर्जनशीलतेचा अतूट संबंध आहे. चित्रकलेसारख्या क्रियाकलापांमुळे त्यांना आनंद मिळतो, आत्मविश्वास वाढतो आणि तणाव दूर होतो. ‘स्प्लॅश ऑफ कलर्स’च्या माध्यमातून आम्ही मुलांच्या सर्वांगीण विकासाला एक सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न करत आहोत.”

सदरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी , +९१ ९८८११२३०३१ या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी. या स्पर्धेत सहभागी मुलांना आकर्षक बक्षिसं जिंकण्याची संधी मिळणार आहे.अशा उपक्रमांमधून आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेत आहे. तसेच मुलांना आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा देत आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल ह्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading