Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

गणेशोत्सवादरम्यान लेझर लाईटचा वापर करण्यास कोल्हापूर बंदी

कोल्हापूर:  लेझर लाईटमुळे डोळ्यांवर, विशेषतः बुबुळांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे गणेशोत्सवादरम्यान लेझर लाईटचा वापर करण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. या आदेशानुसार दिनांक 26 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत लेझर लाईटचा वापर करता येणार नाही.

मागील वर्षी गणेश विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी आलेल्या नागरिकांपैकी काही जणांच्या डोळ्यावर लेझर लाईट पडल्यामुळे त्यांच्या डोळ्यांच्या पडद्याला व बुबुळांना इजा झाल्याचे प्रकार उघडकीला आले होते. यावर्षी असे प्रकार टाळण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 ( 1) नुसार लेझर लाईट वापराला बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

डीजेवर बंदी घाला

सातारा शहरातही गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीच्या काळात डीजेच्या वापरावर बंदी घालण्याची आग्रही मागणी करण्यात येत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. सातारा शहर पेन्शनरांचे शहर म्हणून ओळखले जाते. मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक या शहरात राहतात. डीजेच्या दणदणाटाने हृदयविकाराचे रुग्ण, वयस्कर व्यक्ती, लहान मुले, गर्भवती महिला यांना धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे गणेशोत्सवात डीजेचा वापर करण्यास बंदी घातली जावी, अशी मागणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading