भारताची पहिली अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड तर्फे आयपीओ साठी सेबी कडे डीआरएचपी सादर
अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड ही भारतातील पहिली स्थापन झालेली अॅसेट रिकन्स्ट्रक्शन क्षेत्रातील अग्रणी कंपनी आहे. कंपनीने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) बाजार नियामक भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (सेबी) कडे दाखल केला आहे.
या आयपीओ मध्ये प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 105,463,892 इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल आहे. या ऑफर फॉर सेल मध्ये प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 68,739,034 पर्यंतचे इक्विटी शेअर्स अॅव्हेन्यू इंडिया रिसर्जन्स पीटीई लिमिटेड कडून, प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 19,445,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स स्टेट बँक ऑफ इंडिया कडून, प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 16,244,858 पर्यंतचे इक्विटी शेअर्स लेथ इन्व्हेस्टमेंट पीटीई लिमिटेड कडून आणि प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 1,035,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स द फेडरल बँक लिमिटेड कडून समाविष्ट आहेत.
2002 मध्ये स्थापन झालेली अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड ही अॅसेट रिकन्स्ट्रक्शन उद्योगातील भारतातील पहिली स्थापन झालेली अग्रेसर कंपनी आहे. दोन दशकांहून अधिक कार्यकाळानंतर कंपनी 15230.031 कोटी रु. च्या व्यवस्थापना अंतर्गत मालमत्ता म्हणजेच अॅसेट्स अंडर मॅनेजमेंट (AUM) संदर्भात या क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची ARC होती आणि 2462.511 कोटी रु. च्या नेटवर्थसह भारतातील खाजगी ARC मध्ये दुसऱ्या क्रमांकावर होती. अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड तीन व्यवसाय शाखांमध्ये कार्य करते – कॉर्पोरेट कर्ज, SME आणि इतर कर्जे आणि रिटेल कर्जे. अंतर्गतरित्या ठरवलेल्या उपाय सुविधा यंत्रणेनुसार खरेदी केलेल्या मालमत्तांचे वर्गीकरण करते. कंपनी आपले उत्पन्न प्रामुख्याने मॅनेजमेंट फी/ ट्रस्टीशिप फी, पोर्टफोलिओ रिकव्हरी फी, गुंतवणुकीमधून मिळणारे उत्पन्न यातून मिळवते.
अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेडचे प्रवर्तक अॅव्हेन्यू इंडिया रिसर्जन्स पीटीई लि. (अॅव्हेन्यू कॅपिटल ग्रुप शी संलग्न आहे) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया आहेत. हे दोघेही SARFAESI कायद्यानुसार कंपनीचे प्रायोजक (sponsors) म्हणून ओळखले जातात. ही कंपनी एक व्यावसायिक व अनुभवी व्यवस्थापन टीमद्वारे चालवली जाते. त्यांना या उद्योगाचा व्यापक अनुभव आहे आणि व्यवसाय वाढीचा स्पष्ट दृष्टीकोन आहे. या टीममध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. पल्लव मोहपात्रा, अध्यक्ष श्री. फणिंद्रनाथ काकरला, चीफ फायनान्शियल ऑफिसर श्री. प्रमोद गुप्ता, कॉर्पोरेट, SME आणि इतर कर्जांसाठी अधिग्रहण प्रमुख श्री. रजत अग्रवाल आणि रिटेल कर्जांसाठी अधिग्रहण प्रमुख श्री. अनुप सतीश मित्तल या प्रमुख सदस्यांचा समावेश आहे.
कंपनी देशातील 12 राज्यांमध्ये कार्यरत आहे आणि बँका व वित्तीय संस्थांकडून स्ट्रेस्ड मालमत्ता खरेदी करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी पुनर्रचना, संबंधित संपत्तीवर हक्कांची प्रस्थापना आणि सेटलमेंट करून उपाययोजना धोरणे राबवते. यामुळे या स्ट्रेस्ड मालमत्तांमधून कमाल वसुली आणि मूल्यनिर्धारण होत उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होतात.
अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड ने डिसेंबर 2003 मध्ये आपली पहिली स्ट्रेस्ड मालमत्ता अधिग्रहण केले आणि 2022 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नियमावली लागू केल्यानंतर, ज्यांच्या नेट ओन्ड फंड्स (Net Owned Funds) नियामक गरजांपेक्षा जास्त होते, अशा मोजक्या ARC पैकी ही एक कंपनी होती. 31 मार्च 2024 पर्यंत केवळ 4 ARCs ने हे निकष पूर्ण केले होते.
ही कंपनी 201 नोंदणीकृत व्हॅल्युअर्स, 163 कलेक्शन एजंट्स आणि 950 पॅनल वकिलांसोबत काम करते आणि 30 खाजगी क्षेत्रातील बँका, 2 सहकारी बँका आणि 28 सार्वजनिक क्षेत्रातील बँका, तसेच 41 नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपन्या, 17 हाऊसिंग फायनान्स कंपन्या आणि 7 इतर विक्री संस्था यांच्याशी कंपनीचा सहयोग आहे.
31 मार्च 2025 पर्यंत, त्यांनी एकूण 652 ट्रस्ट्स स्थापन केले होते, त्यापैकी 199 ट्रस्ट्स बंद करण्यात आले होते कारण त्या ट्रस्ट्समधील सर्व आर्थिक मालमत्ता निकाली काढण्यात आल्या होत्या आणि 453 ट्रस्ट्स सध्या चालू आहेत. याच कालावधीत, त्यांनी 38,155.632 कोटी रु. किंमतीला एकूण 72,657.307 कोटी रु. एकूण प्रिन्सिपल डेब्ट अधिग्रहित केला. (म्हणजे एकूण प्रिन्सिपल डेब्टच्या 52.51%) आणि 28,459.7 कोटी रु. ची वसुली करण्यात आली होती.
आर्थिक वर्ष 24 मध्ये, कामकाजामधून मिळणाऱ्या महसुलानुसार (unrealized fair value changes वगळता), ही कंपनी भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ARC होती आणि तिचा महसूल 570.141 कोटी रु. होता. अग्रणी 7 ARCs मध्ये कंपनीचा खर्च सरासरी एकूण AUM च्या 0.57% एवढा सर्वात कमी होता. कंपनीचा सरासरी AUM वर नफा (कर पश्चात नफा) 1.94% एवढा सर्वाधिक होता, मालमत्ता वरील परतावा 11.48% होता आणि कॅपिटल अॅडिक्वसी रेशो 99.03% होता. पुढच्या खाजगी ARC पेक्षा सुमारे 40% अधिक होता. 31 मार्च 2024 पर्यंत कंपनीचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक क्युम्युलेटिव्ह एसआर रिडेम्प्शन रेट 51.31% होता आणि डेब्ट टू इक्विटी रेशो 0.06 एवढा अग्रणी 6 खाजगी ARCs मध्ये सर्वात कमी होता. 31 मार्च 2025 पर्यंत, कंपनीची स्टँडअलोन स्वरूपात नेटवर्थ 2767.798 कोटी रु. आणि एकत्रित स्वरूपात 2663.141 कोटी रु. होती. यावरून कंपनीची मजबूत आर्थिक स्थिती दिसून येते.
2025, 2024 आणि 2023 या आर्थिक वर्षांमध्ये, कंपनीने अनुक्रमे 3975.871 कोटी रु., 2068.982 कोटी रु. आणि 4288.962 कोटी रु. मूल्याच्या स्ट्रेस्ड मालमत्ता अधिग्रहित केल्या होत्या आणि AUM 31 मार्च 2025 पर्यंत 16852.570 कोटी रु., 31 मार्च 2024 पर्यंत 15230.031 कोटी रु. आणि 31 मार्च 2023 पर्यंत 16223.483 कोटी रु. इतकी होती.
CRISIL रिपोर्टनुसार, स्ट्रेस्ड मालमत्तेची (म्हणजे बँक किंवा वित्तीय संस्थांच्या अशा मालमत्ता (मुख्यतः कर्जे), ज्या वेळेत परतफेड न झाल्यामुळे बँकेसाठी समस्या निर्माण करतात.) संधी कॉर्पोरेट कर्जातून नॉन कॉर्पोरेट कर्जाकडे वळताना दिसत आहेत. विशेषतः रिटेल सेगमेंटमध्ये हे प्रमाण वाढत आहे. रिटेल सेगमेंटअंतर्गत (जसे की गृहनिर्माण कर्जे, वाहन कर्जे, ग्राहक कर्जे, क्रेडिट कार्ड्स, शैक्षणिक कर्जे आणि वैयक्तिक कर्जे) एकूण थकीत रक्कम गेल्या पाच वर्षांत 15.7% CAGR ने वाढून अंदाजे 32 ट्रिलियन रु. (31 मार्च 2020) वरून अंदाजे 67 ट्रिलियन रु. (31 मार्च 2025) झाली आहे. बँका आणि NBFCs मध्ये रिटेल सेगमेंटमधील एकूण स्ट्रेस 14.8% CAGR ने आर्थिक वर्ष 2020 मधील 3,46,950 कोटी रु. आर्थिक वर्ष 2025 मध्ये 6,92,450 कोटी रु. वर पोहोचला आहे. कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये रिटेल कर्जाचा वाटा वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. रिटेल कर्जांचे AUM 31 मार्च 2023 रोजी 1559.107 कोटी रु. होते. ते 31 मार्च 2025 रोजी 2747.88 कोटी रु. झाले असून 20.79% CAGR ने वाढले आहे.
31 मार्च 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कामकाजामधून मिळणारा कंपनीचा महसूल 596.423 कोटी रु. होता, एकूण उत्पन्न 623.399 कोटी रु. होते, PAT (करपश्चात नफा) 355.319 कोटी रु. होता आणि PAT मार्जिन 57% होते. आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड, आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड आणि जेएम फायनान्शियल लिमिटेड हे या आयपीओ इश्यूचे बँकर्स आहेत
