जेएनयू विद्यापाठातील समस्यांबाबत विद्यार्थ्यांनी घेतली खा.संजय दिना पाटील यांची भेट
नवी दिल्ली : जेएनयू ( जवाहरलाल नेहरू ) विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र सदनात खासदार संजय दिना पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यापीठात अलीकडेच घडलेल्या घटनांची माहिती दिली. महापुरुषांचा अवमान करणाऱ्या जेएनयूतील विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या संदर्भात सर्व खासदारांनी शिक्षण मंत्रालय तसेच जेएनयू प्रशासनाकडे तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आली.
सध्या दिल्लीत पावसाळी अधिवेशन चालू असून त्यानिमित्त सर्व खासदार दिल्लीत आहेत. जेएनयू विद्यापीठात मराठी शिक्षण घेणा-या मराठी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र सदनात ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांची सदिच्छ भेट घेतली. विद्यापीठात अलिकडेच घडलेल्या घटनांची माहिती त्यांना देण्यात आली. महापुरुषांचा अवमान करणा-या जेएनयूतील विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. विद्यार्थ्य़ाच्या समस्या आणि त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या केंद्र सरकारपर्यंत पोहचविण्यात येईल असे आश्वासन खासदार संजय दिना पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिले होते. त्यानंतर सर्व खासदारांनी शिक्षण मंत्रालय तसेच जेएनयू प्रशासनाकडे तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आली.
