मर्सिडीज-बेंझ इंडियाने 10% वाढ नोंदवत 4238 युनिट्सच्या आजवरच्या सर्वोत्तम विक्रीतून आर्थिक वर्ष 25-26 ची केली दमदार सुरुवात
पुणे: भारतातील सर्वाधिक आकर्षक लक्झरी कार निर्माता मर्सिडीज-बेंझने आज आर्थिक वर्ष 25-26 ची सुरुवात विक्रमी विक्रीसह केली. एप्रिल-जून 2025 कालावधीत 4238 नवीन मर्सिडीज-बेंझ गाड्यांची विक्री करण्यात आली असून त्यात 10% वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 25-26 च्या पहिल्या तिमाहीत ही विक्रमी विक्री मुख्यत्वे Core आणि Top-End Luxury वाहनांसाठी असलेल्या मजबूत मागणीमुळे साध्य झाली. याशिवाय टॉप-एंड लक्झरी BEV पोर्टफोलिओच्या वेगवान वाढीमुळेही या विक्रीला चालना मिळाली असून त्यामुळे मर्सिडीज-बेंझ इंडियाच्या एकूणच विक्रीत वाढ झाली आहे.
या विक्रमी विक्रीचे यश सूक्ष्म आर्थिक अडचणी असूनही साध्य झाले. त्यामध्ये फॉरेक्स (विदेशी चलन) मध्ये अस्थिरता, किमतीतील वाढ आणि लक्झरी एन्ट्री सेगमेंटमधील किमतींशी संबंधित बाजारातील स्पर्धा यांचा समावेश होता. टॉप-एंड लक्झरी क्लासमध्ये मर्सिडीज-बेंझने मिळवलेले यश लक्झरी ग्राहकांचा कल आता अधिक एक्सक्लुझिव्ह, टॉप-एंड वाहनांकडे वाढत आहे हे दर्शवते. हे वाढते आकर्षण हायपर-पर्सनलायझेशन आणि प्रीमियमायझेशनमुळे निर्माण झाले आहे. लक्झरी ग्राहकांच्या वाढत्या आकांक्षा आणि इच्छेचे हे प्रतिबिंब आहे.
टॉप-एंड लक्झरी सेगमेंटसाठी प्रचंड मागणी:
आर्थिक वर्ष 25-26 च्या पहिल्या तिमाहीतील मर्सिडीज-बेंझ इंडियाच्या विक्रीतील मुख्य आकर्षण म्हणजे टॉप-एंड लक्झरी सेगमेंटमधील प्रचंड मागणी. यामध्ये S-Class, Mercedes-Maybach, EQS उत्पादन श्रेणी आणि AMG परफॉर्मन्स वाहने यांचा समावेश आहे. टॉप-एंड लक्झरी सेगमेंटची विक्री 20% नी वाढली असून S-Class, Mercedes-Maybach Night Series, EQ Technology सह G 580, EQS SUV आणि आयकॉनिक AMG G 63 यासाठी चांगली मागणी नोंदवली गेली आहे.
मर्यादित संख्येत सादर करण्यात आलेल्या AMG G 63 ‘Collector’s Edition’ ला G-Class चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे, तर अलीकडेच सादर करण्यात आलेला AMG GT 63 PRO ची उर्वरित वर्षासाठीची विक्री आधीच झाली आहे.
कोअर’ सेगमेंटमध्ये स्थिर मागणीमुळे वाढ कायम:
मर्सिडीज-बेंझचा ‘कोअर’ सेगमेंट हा आर्थिक वर्ष 25-26 च्या पहिल्या तिमाहीतील एक महत्त्वाचा घटक ठरला. या कोअर सेगमेंटमध्ये C-Class, E-Class LWB सेदान्स, GLC आणि GLE SUV यांचा समावेश आहे. यामध्ये आर्थिक वर्ष 25-26 च्या पहिल्या तिमाहीत 10% वाढ नोंदली गेली असून, कंपनीच्या एकूण विक्रीत 60% योगदान देत या सेगमेंटने मजबूत कामगिरी कायम राखली. E-Class LWB ची ही यशस्वी घोडदौड E450 परफॉर्मन्स व्हेरिएंटच्या समावेशामुळे अधिक बळकट झाली असून, ही Long Wheelbase E-Class भारतातील सर्वाधिक विक्री होणारी लक्झरी कार ठरली आहे.
त्याचप्रमाणे C-Class सेदान, GLC SUV आणि GLE SUV यांनी आपापल्या सेगमेंटमध्ये ग्राहकांचा विश्वास जिंकत मजबूत मूल्य प्रस्ताव आणि ग्राहक पसंती टिकवून ठेवली आहे.
एंट्री लक्झरी सेगमेंट:
मर्सिडीज-बेंझचा ‘एंट्री लक्झरी’ पोर्टफोलिओ लक्झरी ग्राहकांसाठी उच्च मूल्य प्रस्तावासह सेगमेंटनिहाय उच्च मूल्य आधार असणारे उत्पादन सादर करतो. आर्थिक वर्ष 25-26 च्या पहिल्या तिमाहीत, ‘एंट्री लक्झरी सेगमेंट’मध्ये किंचित घट झाली आहे. याचे कारण या सेगमेंटमध्ये तुलनेत कमी किमतीच्या आणि सवलतीच्या ऑफर्स असलेली उत्पादने प्रबळ आहेत. मर्सिडीज-बेंझची एंट्री लक्झरी उत्पादने वैशिष्ट्यपूर्ण असून ग्राहकांच्या वाढत्या आकांक्षांना उत्तम प्रतिसाद देतात हे त्यांच्या मूल्य-केंद्रित विक्री दृष्टिकोनातून स्पष्ट होते.
टॉप-एंड BEVs मुळे मर्सिडीज-बेंझच्या BEV वाढीला प्रचंड चालना:
आर्थिक वर्ष 25-26 च्या पहिल्या तिमाहीत मर्सिडीज-बेंझच्या BEV (बॅटरी इलेक्ट्रिक वाहन) पोर्टफोलिओमध्ये 157% च्या उल्लेखनीय वाढीसह एकूण विक्रीत 8% वाढ झाली. विशेषतः डायनॅमिक EQS 450 SUV साठी वाढत्या ग्राहक डिलिव्हरीसह ही BEV विक्री मर्सिडीज-बेंझच्या इलेक्ट्रिक उत्पादनांसाठी मिळालेल्या स्थिर प्रतिसादाचे प्रतीक आहे. BEV वाढीचे मुख्य कारण ‘टॉप-एंड लक्झरी’ श्रेणीतील उत्पादने होती. त्यात EQS SUV, EQS Maybach Night Series आणि EQ Technology सह भव्य G 580 SUV साठी सर्वाधिक मागणी होती. EQS Maybach आणि G 580 with EQ Technology साठी प्रतीक्षा कालावधी 6 महिन्यांपर्यंत आहे.
(मर्सिडीज-बेंझ इंडियाची सर्व विक्री आकडे हे रिटेल विक्रीचे आहेत.)
“मर्सिडीज-बेंझने या आर्थिक वर्षाची सुरुवात आतापर्यंतच्या सर्वोत्तम विक्री कामगिरीसह केली असून 10% वाढ नोंदवली आहे. आमच्या उत्पादन श्रेणीसाठी विशेषतः टॉप-एंड लक्झरी आणि BEV (Battery Electric Vehicles) सेगमेंटसाठी असलेली मजबूत मागणी हे यशाचे प्रमुख कारण आहे. ग्राहक आता अधिकाधिक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजेच एक्सक्लुझिव्ह लक्झरी गाड्यांमध्ये हायपर-पर्सनलायझेशन आणि कस्टमायझेशन निवडत आहेत हे यावरून दिसून येते. आमच्या BEV पोर्टफोलिओच्या शानदार कामगिरीने आम्हाला विशेष आनंद झाला आहे. त्यामध्ये EQS SUV, EQS Maybach आणि EQ टेक्नोलॉजीसह G 580 यांचा विशेष वाटा आहे. टॉप-एंड लक्झरीवर केंद्रित असलेले आमचे धोरण ग्राहकांच्या पसंतीवर प्रभाव टाकण्यात यशस्वी ठरले आहे आणि मर्सिडीज-बेंझला भारतातील सर्वात आकर्षक लक्झरी ब्रँड म्हणून उभं केलं आहे.”
“GLS AMG Line चे सादरीकरण हे मर्सिडीज-बेंझच्या टॉप-एंड लक्झरी पोर्टफोलिओमध्ये नवीन उत्पादने सादर करण्यावर असलेल्या उद्दिष्टाला मजबूत करते. GLS ही मर्सिडीज-बेंझची सर्वाधिक विक्री होणारी ‘लार्ज साईज लक्झरी SUV’ आहे आणि भारतात 16,000 हून अधिक युनिट्स रस्त्यावर धावत आहेत. नवीन GLS AMG Line च्या समावेशामुळे मर्सिडीज-बेंझचा SUV पोर्टफोलिओ अधिक मजबूत होईल. रोड प्रेझेन्स आणि अप्रतिम भव्यता यांसह GLS चा शक्तिशाली DNA अतुलनीय असेल. AMG स्टायलिंगमुळे GLS डिझाईनमध्ये अधिक स्पोर्टी आणि एक्स्प्रेसिव्ह दिसते. जागा, कामगिरी व रायडिंग कम्फर्ट या बाबतीत हा सेगमेंट एकदम अधिकारवाणीने पुर्नव्याख्या करत आहे.”
– मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अय्यर
