Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विशेष कार्यक्रमाचे आयोजन

पुणे :- वारकरी भक्तीयोग कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यभरातील सर्व समाज घटकांपर्यंत योगसाधनेचे महत्त्व पोहोचविण्याची विशेष कामगिरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यंदा यशस्वीरित्या करून दाखविली. विद्यापीठाचे हे कार्य उल्लेखनीय तसेच कौतुकास्पद असल्याचे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शनिवारी सांगितले.

‘भक्तीयोग: २०२५’ हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल विद्यार्थी विकास मंडळ व रासयो यांच्या वतीने विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या सभागृहात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महोदय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्याबदल संकल्पक व संयोजक आणि विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे यांचे व विद्यापीठाचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील यांनी विशेष कौतुक केले. तसेच महाविद्यालयांचे प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम समन्वयक, विद्यार्थी यांचेही त्यांनी यावेळी विशेष कौतुक केले.

यावेळी त्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे संकल्पक व संयोजक राजेशजी पांडे, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचे मनोगत आणि अनुभवकथन झालंय. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र- कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो चे संचालक प्रा. डॉ. सदानंद भोसले यांनी केले तर सूत्रसंचालन प्राचार्य संजय चाकणे यांनी केले. बीओडी चे संचालक प्रा. डॉ. अभिजित कुलकर्णी यांनी आभार मानले. या विशेष कार्यक्रमासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य, विद्यापीठाच्या प्रशासकीय व शैक्षणिक विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading