बजाज आलियान्झ लाईफने सादर केली एक सुपर फ्लेक्सिबल मार्केट-लिंक्ड पेन्शन योजना
पुणे : भारतातील आघाडीच्या खाजगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज आलियान्झ लाईफ इन्शुरन्सने ग्राहकांना त्यांच्या निवृत्ती नियोजनावर अधिक नियंत्रण मिळवून देणारी बजाज आलियान्झ लाईफ स्मार्ट पेन्शन ही एक युनिट-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक पेन्शन योजना सादर केली आहे. ही योजना निवृत्तीनंतरच्या आयुष्यातील ध्येयांना पाठबळ देत, आजीवन खात्रीशीर उत्पन्न मिळत राहावे यासाठी वापरता येणारा निवृत्ती निधी उभारण्यास मदत करते. ही योजना नव्याने सुरू झालेल्या बजाज आलियान्झ लाईफ निफ्टी 200 अल्फा 30 इंडेक्स पेन्शन फंडशी संलग्न आहे. यातून आर्थिकदृष्ट्या सुरक्षित निवृत्तीच्या दृष्टीने उच्च वाढीची क्षमता मिळते. ग्राहक त्यांच्या जोखीम आणि परताव्याच्या प्राधान्यानुसार या उत्पादनात उपलब्ध असलेल्या पाच इतर फंड पर्यायांपैकी देखील निवड करू शकतात.
फक्त 10 वर्षांपासून सुरू होणाऱ्या पॉलिसी कालावधीसह आणि वेस्टींग वय 45 वर्षांपासून असल्यामुळे, या योजनेमध्ये अनेक मजबूत वैशिष्ट्यांचा समावेश आहे. काही मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:
- ग्राहकांना वेस्टींगच्या वेळी एकूण संचित निधीपैकी60% रक्कम करमुक्त स्वरूपात काढण्याची अनुमती मिळते, दीर्घकालीन गुंतवणूकदारांना लॉयल्टी अॅडिशन्स आणि 15व्या पॉलिसी वर्षाच्या शेवटी वेस्टींग बूस्टर दिला जातो.
- ग्राहक त्यांच्या निवृत्ती ध्येयांनुसार वेस्टींगची तारीख बदलण्याची लवचिकताही मिळवू शकतात.
ही योजना नव्याने सुरू झालेल्या बजाज आलियान्झ लाईफ निफ्टी 200 अल्फा 30 इंडेक्स पेन्शन फंडसोबत येते. हा फंड Nifty 200 युनिव्हर्समधील हाय-अल्फा स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतो. हा फंड अधिक परताव्याची क्षमता असलेले 30 स्टॉक्स निवडण्यासाठी बाजाराच्या अपेक्षेपेक्षा अधिक कामगिरी मोजण्याची पद्धत Jensen’s Alpha वापरतो. या धोरणामुळे गुंतवणूकदारांना विविधीकरणाचा लाभ घेणे शक्य होते आणि एकाच निवृत्ती-केंद्रित सोल्यूशनमध्ये मार्केट-लिंक्ड संपत्ती निर्मिती करता येते. या व्यतिरिक्त पाच इतर फंड पर्याय देखील उपलब्ध आहेत. ते ग्राहकांना त्यांच्या जोखीम-परतावा प्राधान्यानुसार जुळवून घेता येतात.
या सादरीकरणाबाबत बोलताना बजाज आलियान्झ लाईफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तरुण चुघ म्हणाले, “जागतिक स्तरावर निवृत्त व्यक्तींना दुसरा उत्पन्न स्त्रोत म्हणून सोशल सिक्युरिटी उपलब्ध असते, पण बहुतांश भारतीयांकडे केवळ पीएफच्या बचतीच असतात. तरीही, निवृत्ती नियोजन अनेक लोकांसाठी अजूनही प्राधान्यक्रमात नाही. आमची लवचिक मार्केट-लिंक्ड पेन्शन योजना निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेवर अधिक नियंत्रण ठेवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना मदत करेल. ही योजना त्यांना दीर्घकालीन गुंतवणुकीद्वारे मजबूत निवृत्ती निधी उभारण्यास आणि त्यांच्या सुवर्ण काळात स्थिर अॅन्युईटी सुनिश्चित करण्यास सक्षम करते. बजाज आलियान्झ लाईफमध्ये, आम्ही आमचा निवृत्ती सोल्यूशन्स पोर्टफोलिओ अधिक बळकट करत आहोत आणि हे उत्पादन त्याच दिशेने एक पाऊल आहे. आमच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे तयार करण्यात आले असून त्याआधारे ते निवृत्तीनंतरही आत्मविश्वासाने त्यांच्या आयुष्यातील ध्येयांचा पाठपुरावा करू शकतील.”
- मार्केट-लिंक्ड ग्रोथमधून जास्त परताव्याची संधी – निवृत्ती निधी उभारण्यासाठी मार्केट-लिंक्ड रिटर्न्सद्वारे वाढीच्या संधी प्रदान करतो.
- वेस्टींग वय – वय 45 पासून सुरू होते.
- पॉलिसी कालावधी – 10 वर्षांपासून ते कमाल वेस्टींग वयापर्यंत.
- फंड्सची विस्तृत श्रेणी – आपल्या जोखीम-परतावा प्राधान्यानुसार निवडण्यासाठी अनेक फंड पर्याय उपलब्ध.
- वेस्टींग डेट पुढे ढकलण्याची लवचिकता – ग्राहक त्यांच्या निवृत्ती ध्येयांनुसार वेस्टींगची तारीख पुढे ढकलू शकतात.
- तरलता – आयुष्यातील महत्वपूर्ण प्रसंग किंवा गंभीर आजाराच्या वेळी निवृत्ती निधीमधून अंशतः रक्कम काढण्याची लवचिकता.
- मृत्यू लाभ – मृत्यूच्या वेळी फंड व्हॅल्यू, जी एकूण भरलेल्या प्रीमियमच्या किमान 105% इतकी असेल.
- अमर्यादित मोफत स्विचेस – बाजार परिस्थितीनुसार आपल्या गुंतवणूक धोरणात बदल करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता फंड्समध्ये स्विच करण्याची लवचिकता.
- कर लाभ – भरलेल्या प्रीमियमवर आणि प्राप्त होणाऱ्या लाभांवर सध्याच्या कर कायद्यानुसार कर सवलती लागू होऊ शकतात.
अधिक माहितीसाठी https://www.bajajallianzlife.com/about-us.html येथे भेट द्या.
कृपया लक्षात घ्या की हा फंड बेंचमार्क इंडेक्स फंडच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करतो. हे tracking errorच्या अधीन आहे.
