Monday, June 22, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये उघड होणार अवंतीचं धक्कादायक सत्य.

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेमध्ये येत्या आठवडयात उघड होणार अवंतीचं धक्कादायक सत्य. अवंती दगडधोंड्यांची पर्वा न करता बेभान पावलं टाकत दुष्यंत पासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे. तिचा पाठलाग दुष्यंत करत आहे कारण त्याला त्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे, त्याचे म्हणणे आहे तू माझ्याशी विवाह करण्यास नकार का देत आहेस. “अवंती, का नाही म्हणतेयस तू माझ्यासोबत विवाह करायला?” असा प्रश्न दुष्यंत विचारतो. मात्र अवंती मौन बाळगते. तेवढ्यात स्वामी स्थानावर प्रकट होतात आणि म्हणतात, “किती पळशील? आज नाही उद्या सत्याचा सामना तुला करायचाच आहे,” असं म्हणत ते हातातील काडी मोडतात. अवंतीच्या पायात मोठा काटा टोचतो. दुष्यंत तिचा सांभाळ करताच ती ठामपणे सांगते, “नाही होऊ शकत आपला विवाह… कारण मी बालविधवा आहे.” या विधानाने दुष्यंत हादरतो. स्वामी प्रकट होऊन त्यालाही सत्याचा सामना करण्याचा इशारा देतात. ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये अवश्य पाहा – एक सत्य, एक स्वीकार आणि एक नवा अध्याय! पहा जय जय स्वामी समर्थ सोम ते शनि रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठीवर.

अत्यंत महत्वाचा विषय दाखविण्याचा प्रयत्न या मालिकेद्वारे केला जाणार आहे. बालविधवा आणि तिचा पुन्हाविवाह हे त्या काळात मान्य नव्हते. पण स्वामी समर्थ यामध्ये अवंतीची साथ देऊन कसा तिला आणि दुष्यंतला मार्ग दाखवणार ? कसं या समाजात अवंतीला मानाचे स्थान मिळणार ? हे बघणे रंजक असणार आहे. यातले अनेक संदर्भ आजच्या काळालाही लागू होणारे असून त्यातून स्वामी समर्थांनी दिलेला संदेश चिरंतन आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading