Sunday, May 31, 2026
BusinessLatest News

उत्कृष्टतेची लय : नवीन ब्रँड मोहिमेअंतर्गत स्टार अलायन्स इंटरलाइन प्रवासात सुसंवाद ठेवते

  • 25 सदस्य एअरलाइन्समधील सहकार्यात सातत्य ठेवणे

गुरुग्राम : जगातील सर्वात मोठ्या एअरलाइन अलायन्स, स्टार अलायन्सने “रिदम ऑफ एक्सलन्स” नावाची त्यांची नवीनतम ब्रँड मोहीम सुरू केली, जी जागतिक दर्जाच्या 25 सदस्य एअरलाइन्सच्या नेटवर्कला मजबुती देणारे सातत्यपूर्ण समन्वयन अधोरेखित करते.

ही अनोखी मोहीम स्टार अलायन्सच्या खास प्रवासाचे वैशिष्ट्य सांगते – जिथे एक प्रवासी एकाच बुकिंगवर स्टार अलायन्सच्या अनेक सदस्य एअरलाइन्समधून उड्डाण करू शकतो. चेक-इन आणि बॅगेजपासून ते लाउंज ऍक्सेस आणि लॉयल्टी बेनिफिट्सपर्यंत, ही मोहीम पडद्यामागे सुसंवाद ठेवते, ज्यामुळे प्रवासाचा आनंद लुटता येतो.

27 वर्षांहून अधिक काळ स्टार अलायन्स हा एक जागतिक मान्यता असलेला ब्रँड आहे जो सदस्य एअरलाइन्सचा प्रवास आनंदात पार पडावा यासाठी प्रयत्नशील असतो. यासाठी जो परस्परांमध्ये सुसंवाद लागतो, तो हा उपक्रम प्रकाशझोतात आणते. सहकार्याचे महत्त्व तसेच त्यांच्या सर्व वाहकांना एकत्र आणणारा सामायिक उद्देश देखील समोर आणतो.

“अखंड इंटरलाइन प्रवास शक्य करणारी आमची भूमिका आणि आमचा उद्देश हा उपक्रम सांगत असल्याचे, स्टार अलायन्स कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीचे उपाध्यक्ष रेनाटो रामोस म्हणाले. “ग्राहक बहुतेकदा आमच्या सदस्यांशी थेट संवाद साधतात. त्यांच्यामुळेच आमच्या उपक्रमांना पाठबळ मिळते – चेक-इन आणि बॅगेज हाताळणीपासून ते लाउंज ऍक्सेस ते लॉयल्टी रिवॉर्ड्सपर्यंत. या सगळ्यात ही सुसंगती अलायन्सचा अनुभवच सांगते.”

जाझ-प्रेरित मूळ कल्पनेवर आधारित, या मोहिमेचा मुख्य भर स्टार अलायन्स नेटवर्कमधील इंटरलाइन प्रवासाचा अनुभव देणे हा आहे. ग्राहकांच्या प्रवासातील महत्त्वाच्या क्षणांमध्ये – बुकिंग, विमानतळ, कनेक्शनपासून ते निष्ठेपर्यंत – प्रत्येक दृश्य सहजतेने बदलते. टोकियो नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सिंगापूर चांगी विमानतळावर चित्रित केलेल्या, “रिदम ऑफ एक्सलन्स” ची संकल्पना द सीक्रेट लिटिल एजन्सी (TSLA) या क्रिएटिव्ह पार्टनर्सची आहे, ज्यांच्या सर्जनशील दृष्टिकोनामुळे प्रवाशांना एक सिनेमॅटिक अनुभव दे

 

“रिदम ऑफ एक्सलन्स” द्वारे, स्टार अलायन्स 25 एअरलाइन्स एकत्र येऊन काम केल्याने निर्माण होणाऱ्या सामूहिक लयीचा आनंद साजरा करते.

“रिदम ऑफ एक्सलन्स” हा उपक्रम चित्ररुपाने पाहता येईल

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading