Wednesday, June 17, 2026
BusinessLatest News

कोपात ‘आइस्क्रीम लँड’ – उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी गारवा, गोडवा आणि धमाल!

पुणे, :  पुण्यातील अल्टीमेट लाइफस्टाइल डेस्टिनेशन कोपा मॉल पुणेकरांना आइस्क्रीम लँडसह फ्रोझन फन आणि इमॅजिनेशनचा धमाल अनुभव देण्यासाठी आमंत्रित करत आहे. अशाप्रकारचा पहिला, इमर्सिव्ह पॉप- अप अनुभव लहान मुलांसाठी खास तयार करण्यात आला आहे. ११ एप्रिल २०२५ पासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात कडक उन्हाळ्यापासून दिलासा देण्यासाठी, इंटरअक्टिव्ह, आइस्क्रीम या संकल्पनेसह झोन्स तयार करण्यात आले आहेत, जे आनंद, ज्ञान आणि कुल ट्रीट्स सगळं एकाच ठिकाणी देतील.

जेलाटोसह भागिदारीत तयार करण्यात आलेल्या आइस्क्रिम लँडने मॉलचे आकर्षकएसी वंडरलँडमध्ये रुपांतर केले असून या ठिकाणी मुलांचे मनोरंजन करण्यासाठीत्यांची उत्सुकता वाढवण्यासाठी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांना ताजंतवानं ठेवण्यासाठी सुसज्ज तयारी करण्यात आली आहे. आकर्षक सजावटरंगीत इन्स्टॉलेशन्ससह सर्व जागा लहान मुलांना आवडेल आणि त्यांना खूप मजा करता येईल अशा प्रकारे सजवण्यात आली आहे.

हा अनुभव लहान मुलांना आवडतीलत्यांची उत्सुकता वाढवतील आणि त्यांना मजा करता येईल अशा गोष्टींसह तयार करण्यात आला आहे. त्यात पिक युवर फ्लेवरचा समावेश आहेजिथे त्यांना त्यांची आवडती आइसी ट्रीट निवडता येईल. द फ्रोजन लॅबमध्ये त्यांना विज्ञानाची गंमत अनुभवता येईल आणि फन फॅक्ट्स कॉर्नरवर मजेदार माहिती मिळेल. कॉन्फेटी कुपन मशिनमध्ये सरप्राइज बक्षिसं मिळवता येईलतर लाइव्हली स्पिन द व्हील गेम आणि खेळकर स्पिंकल पूल आणि मिनी गोल्फ – पुट पुट संडे यांसह क्लासिक पटिंग गेमचा आनंद घेता येईल.

मुलांना इनसाइड स्कूप वॉलला भेट देऊन मजेदार माहिती गोळा करता येईल, खास फोटो बुथमध्ये फोटो काढता येतील आणि व्हिम्सिकल रिंगमध्ये आइस्क्रिम स्टेशनची बेल वाजवून सरप्राइज ट्रीट मिळवता येईल. डीआयवाय स्टेशनवर मुलांना त्यांचे स्वतःचे वॅफल रंगीत टॉपिंग्जनी सजवून प्रत्येक भेट अविस्मरणीय आणि रूचकर असेल याची काळजी घेता येईल.

आइस्क्रीम लँडवरप मनोरंजन, शिक्षण आणि रिफ्रेशमेंट्सची रेलचेल असेल. हे ठिकाण प्रत्येक कुटुंबाला कडक उन्हाळ्यात थंडावा देईल आणि आपल्या मुलांना अविस्मरणीय अनुभव देण्याची करण्याची संधी देईल.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading