Sunday, May 31, 2026
Latest NewsPUNE

विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचे ‘बदला घ्या आंदोलन’

पुणे : ‘उठ हिंदू जागा हो, हिंदुत्वाचा धागा हो’… पश्चिम बंगाल की दंगाईओ से हम लढेंगे हम लढेंगे..पुरा भारत क्या चाहता है, बदला..बदला.. बदला अशा घोषणा देत विश्व हिंदू परिषद बजरंग दल पुणे महानगर यांच्यावतीने ‘बदला घ्या आंदोलन’ करण्यात आले. डेक्कन गुडलक चौक येथे काश्मीरध्ये हिंदूंवर झालेल्या क्रूर हल्ल्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी विश्व हिंदू परिषद केंद्रीय मंत्री दादा वेदक, प्रांतमंत्री किशोर चव्हाण, प्रांत संयोजक नितीन महाजन, प्रांत संयोजिका प्रिया रसाळ, सोनाली नाथ, विभाग मंत्री धनंजय गायकवाड, केतन घोडके, जिल्हा मंत्री शुभम मुळूक, विजय कांबळे, साईनाथ कदम, नाना क्षीरसागर, शार्दुल ठाकूर, दीपक पटेलिया, महेंद्रसिंह चौहान, जिल्हा संयोजक विक्रम घुंगरूवाले, दत्ता तोंडे, राजू कुडले, विनायक देसाई, आकाश दुबे, आशिष दुसाणे, आशा टेकवडे, ईशानी खिरे, सुरेखा कवडे, शोभा श्रीगोंदेकर, आरती भारती, मुस्कान वर्मा, समृद्धी सराफ यावेळी उपस्थित होते.

किशोर चव्हाण म्हणाले, आपल्या देशाला पाकिस्तान बरोबरच देशाच्या आतील गद्दारांकडून सुद्धा धोका आहे. सीमेवरील शत्रूंशी भारतीय जवान लढतील आणि देशाच्या आतील शत्रूंशी बजरंग दलाचे कार्यकर्ते सामना करतील. त्याचबरोबर कोंढवा भागात वास्तव्य असणारे बांगलादेशी नागरिक अनधिकृत व्यवसाय याविषयी प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा विश्व हिंदू परिषद बजरंग दल या संदर्भात मोठे आंदोलन करेल. तसेच फर्ग्युसन कॉलेज रस्ता या परिसरात रात्री नऊ नंतर चालणारे अनधिकृत व्यवसाय पोलीस प्रशासनाने त्वरित बंद करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading