टाटा एआयएच्या टॅक्स बोनान्झा कन्झम्पशन फंडमधून मिळवा जास्तीत जास्त कर सूट
मुंबई : केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या बजेट घोषणेने खर्च करण्याजोग्या उत्पन्नामध्ये वाढीला भरपूर वाव मिळवून दिला आहे, त्यामुळे भारतात कन्झम्पशनमध्ये वाढीसाठी एक प्रभावी प्रेरक निर्माण झाला आहे. नव्या कर व्यवस्थेमध्ये (आर्थिक वर्ष २६ पासून लागू होणार आहे) १२.७५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न किंवा पगारदार व्यक्तींवर शून्य कर लागू असल्याने भारतीय ग्राहकांची खर्च करण्याची शक्ती वाढेल, त्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये मागणी वाढेल. आमच्या अर्थव्यवस्थेमध्ये कन्झम्पशनमुळे होत असलेल्या विकासाचा वेग वाढेल, त्यामुळे अनोख्या गुंतवणूक संधी उपलब्ध होतील.
भारतातील आघाडीच्या जीवन विमा कंपन्यांपैकी एक, टाटा एआयए लाईफ इन्शुरन्सने (टाटा एआयए) हा बदल समजून घेत, विविध ग्राहक क्षेत्रांना टार्गेट करत दोन कॉन्टेक्स्च्यूअल फंड प्रस्तुत केले आहेत.
अ. टाटा एआयए लाईफ टॅक्स बोनान्झा कन्झम्पशन फंड: खास तयार करण्यात आलेल्या फंडच्या माध्यमातून, ग्राहक वाढत्या कन्झम्पशन ट्रेंड्सचा लाभ घेऊ शकतील, इतकेच नव्हे तर, आपल्या प्रियजनांसाठी आर्थिक सुरक्षा देखील सुनिश्चित करू शकतील. अशाप्रकारे हा फंड धन निर्माण करण्याचे आणि आर्थिक सुरक्षा असे दुहेरी लाभ प्रदान करतो.
ब. टाटा एआयए लाईफ टॅक्स बोनान्झा कन्झम्पशन पेन्शन फंड: टाटा एआयएच्या युनिट-लिंक्ड पेन्शन योजनेच्या माध्यमातून उपलब्ध, हा फंड अशा लोकांसाठी योग्य आहे ज्यांना रिटायरमेंटनंतर आपली बचत वाढवायची असते. दीर्घकालीन विकास मिळवून देण्यासाठी डिझाईन करण्यात आलेला हा फंड तुम्हाला एक मजबूत रिटायरमेंट फंड तयार करण्यात मदत करतो, जो तुम्हाला येणाऱ्या पुढील वर्षांसाठी आर्थिक स्थिरता आणि मनःशांती प्रदान करू शकतो.
दोन्ही नवीन फंड ऑफर २४ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत उपलब्ध राहतील. प्रत्येक युनिटची किंमत १० रुपये असेल.
योग्य वेळ आताच का आहे
भारतामध्ये कन्झम्पशनमध्ये वाढ कायम राहील – भारतात कन्झम्पशन क्षेत्रात मोठे बदल घडून येत आहेत. वाढते उत्पन्न, शहरीकरण आणि ग्राहकांच्या प्राथमिकतांमध्ये होत असलेले बदल ही यामागची प्रमुख कारणे आहेत. नुकत्याच करण्यात आलेल्या कर सुधारणांनी याला प्रोत्साहन दिले आहे, त्यामुळे ग्राहकांच्या हातात अधिक पैसे राहू लागले आहेत आणि एफएमसीजी, रिटेल, ईकॉमर्स आणि ऑटोमोबाईल यासारख्या क्षेत्रांमध्ये मागणी वाढत आहे.
भारतामध्ये कन्झम्पशनमध्ये वाढीमागील काही कारणे
- खर्च करण्याजोग्या उत्पन्नामध्ये वाढ – मध्यमवर्गाची लोकसंख्या वाढत आहे, एफएमसीजी, रिटेल, ईकॉमर्स, ऑटोमोबाईल इत्यादी क्षेत्रांमध्ये ग्राहकांकडून केला जाणारा खर्च वाढत आहे. ही वाढ भारताची आर्थिक मजबुती स्पष्टपणे दर्शवते.
- डेमोग्राफिक लाभ: भारतात ५०% पेक्षा जास्त लोकसंख्या २५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. भारताला युवा मनुष्यबळाचे लाभ मिळत आहेत, त्यामुळे देशात कन्झम्पशनमध्ये वाढीला चालना मिळत आहे. काम करणाऱ्यांची लोकसंख्या वाढत असल्याने खर्च करण्याजोगे उत्पन्न वाढत आहे, परिणामी उत्पादने, सेवा यांच्या मागणीत वाढ होत आहे.
- करांमध्ये अनुकूल सुधार: केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये देण्यात आलेली कर सूट शहरी आणि निम-शहरी क्षेत्रांमध्ये क्रय शक्ती वाढवेल, त्यामुळे आपल्या इच्छेनुसार केले जाणारे खर्च आणि प्रीमियमायजेशन ट्रेंड्सना चालना मिळेल.
- ग्राहकांच्या वर्तनामध्ये बदल: आजचे ग्राहक बचतीपेक्षा जास्त प्राधान्य अनुभवांना देत आहेत. विशेषता, ऑनलाईन खरेदी, डिजिटल सेवा इत्यादींना स्वीकारत आहेत. हा बदल भारतामध्ये कन्झम्पशनला नवे रूप देत आहे.
- वेगाने वाढते क्षेत्र: ईकॉमर्स, क्विक कॉमर्स आणि प्रीमियम किंवा लक्झरी गुड्स क्षेत्रात वेगाने वाढ होत आहे. उदाहरणार्थ, रेडसीर कन्सल्टिंगनुसार, भारतीय क्विक कॉमर्स मार्केट, ज्याचे मूल्य २०२१ मध्ये जवळपास १.१ बिलियन डॉलर्स होते ते २०२८ पर्यंत १२ बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल असे अनुमान आहे. या काळात जवळपास ३०-३५% सीएजीआर दर्शवला गेला आहे.
टाटा एआयए लाईफ टॅक्स बोनान्झा कन्झम्पशन फंड आणि टाटा एआयए लाईफ टॅक्स बोनान्झा कन्झम्पशन पेन्शन फंड या ट्रेंड्सचे लाभ मिळवण्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या डिझाईन करण्यात आले आहेत. हे फंड भारताच्या विकसित होत असलेल्या कन्झम्पशन पॅटर्न्सचे लाभ मिळवण्यासाठी सज्ज कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
टाटा एआयएचे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर हर्षद पाटील यांनी सांगितले, “शहरीकरण, वाढते उत्पन्न आणि प्रीमियम उत्पादने आणि सेवांकडे कल वाढत असल्याने भारतातील कन्झम्पशन पॅटर्न्स वेगाने विकसित होत आहेत. टाटा एआयए लाईफ टॅक्स बोनान्झा कन्झम्पशन फंड आणि टाटा एआयए लाईफ टॅक्स बोनान्झा कन्झम्पशन पेन्शन फंडला युवक आणि मध्यमवयीन गुंतवणूकदारांना या गतिशील विकासाचे लाभ मिळवण्यात मदत करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला कर लाभांबरोबरीनेच धन वाढवण्याच्या संधी मिळतात.”
टाटा एआयएचे मॅनेजिंग पार्टनर बिझनेस असोसिएट सिद्धार्थ श्याम छाबडिया यांनी सांगितले, “टाटा एआयए लाईफ टॅक्स बोनान्झा कन्झम्पशन फंड आणि टाटा एआयए लाईफ टॅक्स बोनान्झा कन्झम्पशन पेन्शन फंड लॉन्च झाल्याचा मला खूप आनंद होत आहे. हे फंड तुम्हाला जास्तीत जास्त कर बचत करण्याची एक शानदार संधी उपलब्ध करवून देतात. करामध्ये होणारी बचत गुंतवून तुम्ही तुमची संपत्ती उत्तरोत्तर वाढवू शकता आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित भविष्य सुनिश्चित करू शकता. टाटा ब्रँडच्या विश्वासाचे पाठबळ असलेले हे फंड आजपासूनच उद्याची योजना तयार करण्याचा एक स्मार्ट आणि विश्वसनीय मार्ग मिळवून देतात.”
फंडांची प्रमुख वैशिष्ट्ये
या दोन्ही फंडांचे उद्दिष्ट भारतामध्ये वाढत्या कन्झम्पशनपासून लाभ मिळवणाऱ्या कंपन्यांच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओच्या माध्यमातून दीर्घकालीन भांडवल वृद्धी करणे हे आहे.
- गुंतवणूक फोकस: भारतामध्ये देशांतर्गत कन्झम्पशनमध्ये वाढीपासून लाभ मिळवणाऱ्या कंपन्या.
- संपत्ती वाटप: इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित योजनांमध्ये ६० ते १००% कॅश आणि मनी मार्केट सिक्युरिटीजमध्ये ० ते ४०%
- जोखिम प्रोफाइल: कॅल्क्युलेटेड रिस्क दृष्टिकोनासह दीर्घकालीन भांडवल वाढीसाठी डिझाईन करण्यात आलेले आहेत.
- जीवन विमा सुरक्षा: केवळ धन बनवण्यापुरते मर्यादित नाही, ग्राहक जीवन विम्याबरोबरीनेच आपल्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य देखील सुरक्षित करू शकतात.
यांवर सर्वात जास्त लक्ष केंद्रित केले जाईल
- एफएमसीजी: आवश्यक आणि ग्राहकांच्या इच्छेनुसार खरेदी केल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या माध्यमातून विकासाला चालना देण्याऱ्या कंपन्या.
- रिटेल आणि ईकॉमर्स: ऑनलाईन शॉपिंग आणि डिजिटल देवाणघेवाणीमध्ये तेजीमधून वाढीचे लाभ घेणे.
- ऑटोमोबाईल आणि प्रीमियम उत्पादने: खर्च करण्याजोग्या उत्पन्नामध्ये वाढ होत असल्याने ग्राहक प्रीमियम उत्पादनांकडे वळत आहेत.
नवीन फंड्स गेम चेंजर का आहेत?
टाटा एआयए लाईफ टॅक्स बोनान्झा कन्झम्पशन फंड आणि टाटा एआयए लाईफ टॅक्स बोनान्झा कन्झम्पशन फंड भारतामध्ये कन्झम्पशनमध्ये होत असलेल्या वाढीमधून लाभ घेणारे स्मार्ट गुंतवणूक पर्याय आहेत. केंद्रित थिमॅटिक फंडांच्या विरुद्ध, हे सक्रिय मल्टी-कॅप फंड अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करतात, जे आर्थिक स्थितीची पर्वा न करता स्थिरता सुनिश्चित करतात. चक्रीय आणि सुरक्षात्मक अशा दोन्ही उद्योगांना सामील करून हा फंड व्यवसाय चक्रापासून वेगळा होतो, त्यामुळे बाजारपेठेतील उतारचढावांमध्ये देखील त्याची लवचिकता कायम आहे.
ग्राहक या अपेक्षा करू शकतात:
- भारतातील कन्झम्पशनमधील वाढीचा फायदा: खर्च करण्याजोग्या उत्पन्नामध्ये वाढ आणि आर्थिक विस्ताराचा लाभ घेणाऱ्या क्षेत्रांमध्ये प्रवेश.
- कन्झम्पशनची मानसिकता बदलणे: खर्च करण्याच्या सवयींचा लाभ घेणे, यामध्ये डिजिटल वापरामध्ये आणि अनुभवांमधील वाढीचा देखील समावेश आहे.
- धोरणात्मक वैविध्य: स्थिरता आणि वाढीची क्षमता संतुलित करताना लार्ज-कॅप, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक. दीर्घकालीन संपत्ती बनवणे: भारताच्या ग्राहक अर्थव्यवस्थेतील वाढत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून भांडवल वाढीचे लक्ष्य.
- कर-ऑप्टिमाइज्ड-गुंतवणूक: चांगल्या परताव्यासाठी भारताच्या सुधारित आयकर पद्धतीच्या फायद्यांचा लाभ घेतला जाईल.
टॅक्स बोनान्झा कन्झम्पशन फंडमध्ये गुंतवणूक:
फंडामध्ये गुंतवणूक करून ग्राहक भारताच्या कन्झम्पशन चालित यशोगाथेचा एक भाग बनू शकतात. हा फंड खालील टाटा एआयए सोल्यूशन्ससह उपलब्ध आहे: टाटा एआयए शुभ मुहूर्त, टाटा एआयए शुभ फॉर्च्यून, टाटा एआयए परम रक्षा लाइफ प्रो, टाटा एआयए परम रक्षा लाइफ ग्रोथ+, टाटा एआयए परम रक्षा लाइफ ॲडव्हान्टेज+, टाटा एआयए परम रक्षा लाईफ मॅक्सिमा+, टाटा एआयए प्रो-फिट आणि टाटा एआयए प्रीमियर एसआयपी.
टॅक्स बोनान्झा कन्झम्पशन पेन्शन फंडमध्ये गुंतवणूक:
इक्विटी फंडांमध्ये दीर्घ मुदतीसाठी उच्च परतावा निर्माण करण्याची क्षमता असते ज्यामुळे पेन्शन पॉलिसीधारकांना त्यांच्या दीर्घकालीन जबाबदाऱ्यांसाठी योजना आखण्यात आणि त्यांची क्रयशक्ती सुधारण्यास मदत होते. हा फंड केवळ टाटा एआयएच्या युनिट-लिंक्ड पेन्शन सोल्यूशन, स्मार्ट पेन्शन सिक्युअर प्लॅनसह उपलब्ध आहे, जो ग्राहकांना दीर्घकालीन वाढीच्या क्षमतेसह एक मजबूत सेवानिवृत्ती फंड तयार करण्यास सक्षम बनवतो.
टाटा एआयए फंडाची कामगिरी सिद्ध झाली आहे
टाटा एआयएच्या फंडांनी सातत्याने मजबूत, दीर्घकालीन परतावा दिला आहे. वाढ, स्थिरता आणि सुरक्षितता हवी असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी टाटा एआयए फंड हा पसंतीचा पर्याय बनला आहे. तज्ञ फंड व्यवस्थापन आणि शिस्तबद्ध गुंतवणूक धोरणाद्वारे, टाटा एआयए फंडाने पॉलिसीधारकांसाठी जास्तीत जास्त संपत्ती निर्माण करताना बाजारपेठेचे चक्र यशस्वीपणे नेव्हिगेट केले आहे.
मजबूत कामगिरीचा हा ट्रॅक रेकॉर्ड टाटा एआयएची भारताच्या विकसित आर्थिक वातावरणास अनुकूल गुंतवणूक उपाय ऑफर करण्याची वचनबद्धता अधोरेखित करतो, जेणेकरून गुंतवणूकदार आत्मविश्वासाने उदयोन्मुख संधींचा लाभ घेऊ शकतील.
| Last 5 Years Returns* (CAGR) | ||
| Tata AIA Funds | Fund Return (%) * | Benchmark Return (%) * |
| Multi Cap Fund | 23.87% | 15.98% |
| Top 200 Fund | 24.31% | 15.98% |
| India Consumption Fund | 22.47% | 15.98% |
* २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंतचा डेटा. मागील कामगिरी भविष्यातील कामगिरीचे सूचक नाही.
फंड बेंचमार्क: मल्टी कॅप फंड, इंडिया कन्झम्पशन फंड, टॉप २०० फंड: एस अँड पी बीएसई २००.
सुरुवात झाल्याच्या तारखा: टॉप २०० फंड: १२ जानेवारी २००९, मल्टी कॅप फंड: ०५ ऑक्टोबर २०१५, इंडिया कन्झम्पशन फंड: ०५ ऑक्टोबर २०१५.
