Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्यातील तुळजा भवानी मातेच्या मंदिरातील मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा संपन्न

 

पुणे : महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव ब्रुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीचा दुसरा टप्प्याचे लोकार्पण येत्या शिवजयंतीच्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार उपस्थित असतील.

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोसले घराण्याचे कुलदैवत असलेल्या तुळजा भवानी मातेचे मंदिर या टप्प्यात साकारण्यात आले आहे व आता शिवसृष्टी पाहण्यासाठी येणाऱ्या शिवप्रेमींना दर्शनासाठी खुले असणार आहे. सदर मंदिर हे प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराची तंतोतंत प्रतिकृती असून अगदी बांधकामात वापरण्यात आलेला दगड देखील सारखा आहे.

आज सकाळी एका भव्य मिरवणुकीच्या माध्यमातून भवानी मातेच्या मूर्तीचे मंदिर परिसरात आगमन झाले. त्यानंतर मूर्तीची मंदिरात विधिवत प्राणप्रतिष्ठा निर्मला व अनिल पवार या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली. अनिल पवार हे शिवसृष्टीचे व्यवस्थापक आहेत. मंदिरात स्थापन करण्यात आलेली मूर्ती मुर्तीशास्त्राचे अभ्यासक व तज्ञ आहेत. येणाऱ्या काळात मंदिर परिसरात महाराष्ट्राचे पारंपारिक खेळ व कला येथे प्रदर्शित करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जातील असे अनिल पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading