मिआ बाए तनिष्कने स्विगी इंस्टामार्टसोबत हातमिळवणी केली, चांदीचे आकर्षक दागिने मिळणार आता फक्त १० मिनिटांमध्ये
पुणे : भारतातील सर्वात ट्रेंडी प्रेशियस फाईन ज्वेलरी ब्रँड्सपैकी एक, मिआ बाए तनिष्कने स्विगी इंस्टामार्टसोबत हातमिळवणी करून देशात वेगाने वाढत असलेल्या क्विक कॉमर्स क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. या आठवड्यापासून मिआच्या अतिशय सुंदर, अनोख्या चांदीच्या दागिन्यांचे कलेक्शन स्विगी इंस्टामार्टवर ३५ पेक्षा जास्त शहरांमध्ये उपलब्ध होईल – गुरगाव, दिल्ली, कोलकाता, पुणे, बंगलोर, चेन्नई, मुंबई आणि हैदराबाद. ग्राहकांना चांदीचे दागिने फक्त १० मिनिटांमध्ये त्यांच्या घरी पोचते केले जावेत यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे.
स्विगी इंस्टामार्टला अतुलनीय कम्युनिकेशन आणि संचालनामध्ये उत्कृष्टतेसाठी ओळखले जाते, क्विक कॉमर्समध्ये मार्केट लीडर म्हणून त्यांच्या स्थानाचा लाभ या भागीदारीला मिळेल आणि ग्राहकांचा इ–कॉमर्स अनुभव अधिक प्रगत होईल. ही भागीदारी मिआ बाए तनिष्कच्या ओम्नी–चॅनेल उपस्थितीचा विस्तार करण्याच्या धोरणाला अनुकूल आहे. हा ब्रँड अनेक वेगवेगळ्या सेल्स चॅनेल्समार्फत नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचू इच्छितो. क्विक कॉमर्स मार्केटमध्ये प्रेशियस ज्वेलरीची मागणी सातत्याने वाढत आहे, ती पूर्ण करण्यासाठी मिआ ब्रँड आपले अतिशय सुंदर आणि अनोखे सिल्व्हर ज्वेलरी कलेक्शन प्रस्तुत करत आहे. एखादा खास प्रसंग असो किंवा विचारपूर्वक दिले जाणारे गिफ्ट असो, मिआचे चांदीचे दागिने त्याला शानदार बनवतील आणि आता तुम्ही हे आकर्षक दागिने अगदी सहजपणे, अगदी पटकन तुमच्या घरी मिळवू शकाल.
मिआ बाए तनिष्कच्या मार्केटिंग आणि इकॉमर्स हेड श्रीमती सम्पूर्णा रक्षित यांनी या सहयोगाविषयी आपले विचार व्यक्त केले, “आमच्या ग्राहकांच्या सुविधेला प्राध्यान्य देण्याचा आणि युजर्स जिथे आहेत तिथपर्यंत पोहोचण्याचा हा आमचा एक प्रयत्न आहे. मिआची अनोखी डिझाइन्स आणि किफायतशीर किमती यामुळे आम्ही भारतातील सर्वात आवडीचे गिफ्ट ऑफ चॉईस बनलो आहोत. आजच्या काळात क्विक कॉमर्सने भारतामध्ये खरेदी करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत, ग्राहकांना विश्वसनीय ब्रँड्सचे स्टायलिश ज्वेलरी गिफ्टिंग पर्याय हवे आहेत. स्विगी इंस्टामार्टसोबत भागीदारी करून आम्ही खूप खुश आहोत, कारण आता अजून जास्त ग्राहकांना आमच्या ब्रँडचा अनुभव खूप सहजपणे घेता येईल.”
ही धोरणात्मक भागीदारी भारतीय रिटेलमध्ये वाढते ट्रेंड्स दर्शवते, जिथे क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्स ग्राहकांच्या सुविधेला प्राधान्य देणारे प्रमुख टचपॉईंट्स बनत आहेत. ही भागीदारी हे सुनिश्चित करेल की, ग्राहकांना मिआच्या अनोख्या कलेक्शन्सबद्दल व्यवस्थित माहिती मिळेल आणि स्विगी इंस्टामार्टमार्फत ते घरबसल्या, सहजपणे खरेदी देखील करता येतील.
