Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

क्वालिटी पॉवर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स लिमिटेडचा आयपीओ १४ फेब्रुवारी रोजी खुला होणार

 

 

पुणे :  क्वालिटी पॉवर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स लिमिटेडचा आयपीओ शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2025 रोजी खुला होणार आहे.

अँकर गुंतवणूकदारांना गुरुवारी, 13 फेब्रुवारी 2025 रोजी बोली लावता येईल. ही बोली मंगळवार, 18 फेब्रुवारी 2025 रोजी बंद होणार आहे.

या आयपीओमध्ये (प्रत्येकी रुपये दर्शनी मूल्य असलेले) एकूण 2,250.00 मिलियन रुपयांचे नव्याने जारी केलेले इक्विटी समभाग आणि चित्रा पंड्यान या समभाग विक्री करू इच्छिणाऱ्या प्रमोटरकडून विक्रीसाठी प्रस्तुत केले जाणार असलेल्या 14,910,500 इक्विटी समभागांचा समावेश आहे.

प्रत्येक इक्विटी समभागासाठी प्राईस बँड ४०१ ते ४२५ रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आले आहे. कमीत कमी २६ इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त समभाग हवे असल्यास २६ च्या पटीत बोली लावावी लागेल.

या आयपीओमधून जे भांडवल उभे राहील त्याचा उपयोग कंपनीने पुढील कारणांसाठी करण्याचे ठरवले आहे – (1) मेहरू इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनीयर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिग्रहणासाठी अनुमान 1,170.00 मिलियन रुपये (2) प्लान्ट आणि मशिनरी खरेदीसाठी आमच्या कंपनीच्या भांडवली खर्च गरजा पूर्ण करण्यासाठी अनुमान 272.17 मिलियन रुपये; आणि उरलेली रक्कम इनऑरगॅनिक वृद्धीसाठी, अधिग्रहणांसाठी व इतर धोरणात्मक उपक्रमांसाठी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट कामांसाठी वापरली जाईल.

विक्रीसाठीच्या ऑफरमध्ये समभाग विक्री करू इच्छिणाऱ्या प्रमोटरकडून विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात आलेल्या 14,910,500 पर्यंत इक्विटी समभागांचा समावेश आहे.

ही कंपनी महत्त्वाच्या एनर्जी ट्रान्झिशन इक्विपमेंट आणि पॉवर तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये जागतिक ग्राहकांना सेवा पुरवणारी भारतीय कंपनी आहे. इलेक्ट्रिकल ग्रिड कनेक्टिविटी आणि एनर्जी ट्रान्झिशनसाठी हाय व्होल्टेज इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आणि सोल्युशन्स पुरवते. ऊर्जा निर्मिती, ट्रान्समिशन, वितरण आणि ऑटोमेशन क्षेत्रांमध्ये ऊर्जा उत्पादने व सुविधा पुरवण्यात विशेषज्ञ असलेली ही तंत्रज्ञानावर आधारित कंपनी आहे. मोठ्या स्तरावरील रिन्यूएबल्ससारख्या नवीन ऍप्लिकेशन्ससाठी तयार करण्यात आलेली उपकरणे आणि सोल्युशन्स देखील ही कंपनी पुरवते. (स्रोत: केयर रिपोर्ट)

केयर रिपोर्टनुसार, क्वालिटी पॉवर ही हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट आणि फ्लेक्सिबल एसी  ट्रान्समिशन सिस्टिम्स नेटवर्क्ससाठी  व्होल्टेज इक्विपमेंट्स तयार करणाऱ्या मोजक्या जागतिक कंपन्यांपैकी एक आहे. नूतनीकरणीय स्रोतांपासून पारंपरिक पॉवर ग्रिड्सना ऊर्जा परिवर्तनासाठी ही उपकरणे आणि नेटवर्क्स महत्त्वाची आहेत.

केयर रिपोर्टनुसार, एचव्हीडीसी तंत्रज्ञान ऊर्जा ट्रान्झिशन उपकरणे आणि ऊर्जा तंत्रज्ञान यांच्या क्षेत्रामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणत आहे, त्यासाठी कार्यक्षम, लांब अंतरावर ऊर्जा ट्रान्सफर करणे सक्षम बनवत आहे, ज्यामध्ये ऊर्जा नुकसान लक्षणीय प्रमाणात कमी आहे. ही प्रगती दूरवरील स्थानांवरील नूतनीकरणीय ऊर्जा स्रोतांना एकत्रित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, जसे की, ऑफशोर विंड फार्म्स आणि दूरवरील प्रदेशांमधील सोलर प्लान्ट्स.

भारतामध्ये या कंपनीची विविध उत्पादन कामे दोन ठिकाणी चालतात – महाराष्ट्रामध्ये सांगली आणि केरळमधील अलुवा. जागतिक विस्ताराचा एक भाग म्हणून या कंपनीने टर्कीमधील एंडोक्स एनर्जी अनॉनिम शिर्केतीमध्ये २०११ साली ५१% शेयर भांडवलाचे अधिग्रहण केले. ही कंपनी स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञान व पॉवर क्वालिटी व्यवस्थापनामध्ये लागणारी ऊर्जा सोल्युशन्स पुरवते.

क्वालिटी पॉवरच्या सहयोगी कंपन्यांमध्ये हिताची एनर्जी इंडिया लिमिटेड, जीई व्हरनोवा टीअँडडी इंडिया लिमिटेड आणि ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स (इंडिया) लिमिटेड यांचा समावेश आहे. 31 मार्च 2024 रोजीच्या आकडेवारीनुसार या कंपनीचे 210 ग्राहक होते. या कंपनीची उत्पादने प्रत्यक्ष वापरणाऱ्या ग्राहकांमध्ये ऊर्जा कंपन्या, पॉवर इंडस्ट्रीज आणि नूतनीकरणीय ऊर्जा कंपन्यांचा समावेश आहे. 31 मार्च 2024 रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षासाठी या कंपनीने संचालनामधून 3,005.97 मिलियन रुपये रेव्हेन्यू आणि करपश्चात नफा मार्जिन 16.74% आणि आरओई 29.15% नोंदवले होते. कंपनीचा बहुतांश म्हणजे कंपनीला ऑपरेशन्समधून मिळणाऱ्या एकूण रेव्हेन्यूचा 75% पेक्षा जास्त भाग रेव्हेन्यू आंतरराष्ट्रीय कामांमधून येतो.

कंपनीच्या प्रोफेर्मा कन्सॉलिडिटेड फायनान्शियल इन्फॉर्मेशननुसार 20242024 आर्थिक वर्षांमध्ये आणि 30 सप्टेंबर २०२४ रोजी समाप्त झालेल्या सहा महिन्यांमध्ये ऑपरेशन्समधून मिळालेला कन्सॉलिडिटेड रेव्हेन्यू अनुक्रमे 5,190.49 मिलियन रुपये आणि 2,672.24 मिलियन रुपये होता. त्याच कालावधीत कन्सॉलिडिटेड करपश्चात नफा अनुक्रमे 656.96 मिलियन रुपये आणि 537.88 मिलियन रुपये होता.

30 सप्टेंबर 2024 रोजी समाप्त झालेल्या सहा महिन्यांमध्ये क्वालिटी पॉवर ग्रुप आणि अधिग्रहण करण्यात आलेल्या मेहरू (स्टॅन्डअलोन) कंपनीमध्ये ऑपरेशन्समधून मिळालेला कन्सॉलिडिटेड रेव्हेन्यू अनुक्रमे 1,557.38 मिलियन रुपये आणि 1,116.80 मिलियन रुपये होता. त्याच कालावधीत करपश्चात नफा अनुक्रमे 500.78 मिलियन रुपये आणि 49.03 मिलियन रुपये होता.

ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम, 1957 च्या नियम 19 (2) (बी) अनुसार, संशोधित (“एससीआरआर”), सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (भांडवल व प्रकटीकरण आवश्यकता जारी करणे) नियम 31 नुसार (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) सेबी आयसीडीआर नियम 6(2) ला अनुसरून बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत देण्यात येत आहे. या ऑफरमधील कमीत कमी 75% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील.  यासाठी लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी 60% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील.

या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर पँटोमॅथ कॅपिटल अड्वायजर्स प्रायव्हेट लिमिटेड हे आहेत.

या वृत्तामध्ये वापरण्यात आलेल्या परंतु ज्यांची व्याख्या देण्यात आलेली नाही अशा सर्व कॅपिटलाईज्ड टर्म्सचा अर्थ जसा आरएचपीमध्ये अभिप्रेत आहे तसाच राहील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading