अत्याधुनिक विक्री आणि सेवा अनुभवाच्या सादरीकरणासह महिंद्राने केले ग्राहकप्रवासात परिवर्तन
मुंबई, : एसयूव्ही विक्री आणि सेवेसाठी प्रभावी आणि अनुभवसंपन्न नवीन दृष्टीकोन स्वीकारत महिंद्रा ग्राहकांच्या प्रवासात परिवर्तन घडवून आणत आहे. हार्टकोर डिझाईन तत्त्वज्ञानाने प्रेरित, महिंद्राच्या अत्याधुनिक डीलरशिप इलेक्ट्रिक ओरिजिन आणि ICE एसयूव्ही साठी अत्याधुनिक, इंटरॅक्टिव्ह आणि तंत्रज्ञान-सक्षम अनुभव सादर करण्यासाठी सज्ज आहेत.
समग्र, संवेदनात्मक एसयूव्ही शोरूम अनुभव
आधुनिक रंगसंगती, नाट्यमय प्रकाशयोजना, सहज समजणारे तंत्रज्ञान आणि अखंड संवाद यासह, नवीन शोरूममधील प्रत्येक घटक प्रगत डिझाईन, कुशल नाविन्यपूर्णता आणि सुसंस्कृततेची अनुभूती देतो.
महिंद्राच्या नव्याने साकारलेल्या डीलरशिप फक्त कार विकण्यासाठीच्या जागा नसून, त्या एक संपूर्ण अनुभव देतील. ग्राहक येथे प्रवेश करताच त्यांना पुढील गोष्टींचा संपूर्ण अनुभव मिळेल:
- महिंद्राच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे सादरीकरण – INGLO इलेक्ट्रिक ओरिजिन आर्किटेक्चरपासून MAIA, हीरो फीचर्ससह जगातील सर्वात वेगवान ऑटोमोटिव्ह माइंड
- सोनिक स्टुडिओ अनुभव – 1,400-वॅट, डॉल्बी अॅटमॉससह 16-स्पीकर हार्मन कार्डन प्रणाली यांसह भारतातील सर्वाधिक गुंगवून टाकणारा इन-कार ऑडिओ अनुभव
- ग्राहकांना त्यांच्या महिंद्रा एसयूव्हीज मधून सर्वोत्तम गोष्टी मिळतील हे सुनिश्चित करत त्यांना हवा असलेला परिपूर्ण सल्ला देण्यासाठी लक्झरी आणि प्रीमियम ब्रँड्सचे 500 तज्ज्ञ
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि रिमोट डायग्नोस्टिक्ससह विक्री पश्चात सेवेमध्ये क्रांती
शोरूमच्या पलीकडे जाऊन, महिंद्रा विक्री पश्चात सेवेमध्ये नवीन मापदंड निर्माण करत आहे:
- ई-एसयूव्ही साठी समर्पित सेवा बे, ईव्ही हाताळण्यासाठी प्रशिक्षित कुशल तंत्रज्ञ आणि प्रगत साधने, जागतिक दर्जाच्या एसयूव्हीची सेवा देणारी उपकरणे आणि तंत्रज्ञान.
- ग्राहकांना सक्रिय देखभाल आणि अखंड सेवा मिळेल हे सुनिश्चित करत प्रथमच रिमोट वाहन डायग्नोस्टिक्स (RVD) समाविष्ट करत सॉफ्टवेअर-प्रणीत वाहनांसाठी प्रेडिक्टिव्ह डायग्नोस्टिक्स
- बॅटरी दुरुस्ती केंद्रे – अखंड, विनाअडथळा ईव्ही बॅटरी देखभालीसाठी राष्ट्रीय स्तरावर महत्वपूर्ण ठिकाणी उभारलेले नेटवर्क
- अचूक सेवा सुनिश्चित करण्यासाठी महिंद्रा रिसर्च व्हॅली (MRV) च्या अभियंत्यांच्या पाठिंब्यासह महिंद्रा टेक तज्ञांची ४०० जणांची टीम
CHARGE.IN सह अतुलनीय ईव्ही मालकी पाठबळ
महिंद्रा CHARGE.IN हा एक समर्पित ईव्ही चार्जिंग विभाग सादर करत असून त्यामध्ये ३५० हून अधिक तज्ज्ञ आहेत. ते सानुकूल चार्जिंग सोल्यूशन्स पुरवितात. घरगुती चार्जर जोडणीपासून भारताच्या वेगाने वाढणाऱ्या DC चार्जिंग नेटवर्कशी अखंड जोडून घेण्यासाठी CHARGE.IN ग्राहकांसाठी विनाअडथळा, सहज इलेक्ट्रिक मोबिलिटी सुनिश्चित करेल.
Me4U अॅप: एक कनेक्टेड ओनरशिप इकोसिस्टम
महिंद्राचे Me4U अॅप विक्री पूर्व सेवेपासून विक्री पश्चात सेवेपर्यंत संपूर्ण मालकीचा अनुभव अधिक सुलभ आणि प्रभावी बनवते:
- रिअल-टाइम ऑर्डर ट्रॅकिंग, टेस्ट ड्राइव्ह साठीची नोंदणी आणि डिलिव्हरीपूर्वी वाहनाविषयी माहिती. डिलिव्हरीनंतर थेट वाहन स्थिती, रिमोट कंट्रोल आणि ऊर्जा व्यवस्थापन.
- मार्च 2025 पर्यंत भारतातील 50% वेगवान DC चार्जर्सशी अखंड जोडणी. केवळ वॉल बॉक्स चार्जरसाठी नाही तर भारताच्या DC फास्ट चार्जिंग नेटवर्कसाठी पेमेंट गेटवे सह संपूर्ण इंटीग्रेशनसाठी समग्र चार्जिंग सुविधा
अमर्याद प्रेम, अमर्याद भारत: संपूर्ण देशभरात एका नव्या युगाचा उत्सव साजरा होणार
परिवर्तनाचा हा महत्वपूर्ण टप्पा साजरा करण्यासाठी महिंद्रा डीलरशिप आणि सेवा केंद्रे संपूर्ण देशभर विशेष कार्यक्रम आयोजित करतील. येथे वैयक्तिकृत शोरूम वॉकथ्रू, गुंगवून ठेवणारे टेस्ट-ड्राइव्ह अनुभव आणि संवादात्मक तांत्रिक सादरीकरण असेल.
यात ग्राहकांना तज्ज्ञ विक्री सल्लागारांशी संवाद साधण्याची विशेष संधी मिळेल, थीम आधारित गिफ्ट्स मिळतील, तसेच ‘थ्री फॉर मी’ प्रोग्रामसारख्या नाविन्यपूर्ण वित्तीय पर्यायांचा लाभ घेता येईल.
या उत्सवी ऐतिहासिक क्षणांचा कळस 14 फेब्रुवारी रोजी गाठला जाईल. त्या दिवशी सकाळी 9:00 वाजता BE 6 आणि XEV 9e साठीच्या सर्व नऊ व्हेरिएंट्ससाठीची नोंदणी सुरू होईल.
महिंद्राच्या Unlimit Love दृष्टीकोनामधला हा महत्त्वाचा टप्पा असून हे सादरीकरण म्हणजे केवळ खरेदीचा अनुभव नसून ग्राहक आणि त्यांच्या भविष्यातील एसयूव्हीमधील खोल, भावनिक आणि तंत्रज्ञानप्रणीत अतूट बंधनाची सुरुवात आहे.
