गानसरस्वती किशोरी आमोणकर युवा पुरस्कार प्रदान
पुणे : गानसरस्वती महोत्सवाच्या पहिल्या दिवशी अजित बेलवलकर यांच्या स्मृत्यर्थ गानसरस्वती किशोरी आमोणकर युवा पुरस्कार यावर्षी युवा सरोदवादक अनुपम जोशी यांना त्यांचे गुरू पं. तेजेंद्र मजुमदार यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. संपदा बेलवलकर आणि नील बेलवलकर यांच्या हस्ते तसेच पं. रघुनंदन पणशीकर आणि अपर्णा पणशीकर यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण झाले.
उद्योजक अजित बेलवलकर यांचे काही महिन्यांपूर्वी दु:खद निधन झाले, अजित बेलवलकर हे महोत्सवाशी गेली अनेक वर्षे जोडले असल्याने त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ यावर्षीपासून गानसरस्वती महोत्सवात हा पुरस्कार दिला जाणार आहे. रोख रुपये २५ हजार आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अनुपम जोशी म्हणाले,’ मला आज भरून आले आहे. माझ्या गुरुजींच्या उपस्थितीत हा पुरस्कार मला मिळाला. माझ्या सांगीतिक वाटचालीसाठी आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावेत,’.
