अहिल्यनगर मध्ये स्टडी स्मार्ट च्या ” परदेशात उच्च शिक्षण आणि करिअरच्या संधी” सेमिनारला उत्तम प्रतिसाद
अहिल्यानगर –स्टडी स्मार्ट, एक अग्रगण्य परदेशी अध्ययन सल्लागार संस्था, आहे. त्यांनी “परदेशात उच्च शिक्षण आणि करिअरच्या संधी” या विषयावर अहिल्यानगर येथे आयोजित केलेल्या विशेष सेमिनारला १५० हून अधिक विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
या सेमिनार मध्ये स्टडी स्मार्ट चे व्यवस्थापकीय संचालक चेतन जैन यांनी मार्गदर्शन केले. त्यांंनी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रिया, जगभरातील सर्वोत्तम विश्वविद्यालये, उपलब्ध कोर्सेस, शिष्यवृत्ती संधी यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा सखोल विचार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सेमिनारमध्ये सक्रियपणे सहभाग घेतला आणि प्रवेश प्रक्रिया, करिअर मार्गदर्शन, आणि विविध संधींबाबत अनेक प्रश्न विचारले.
त्याचबरोबर, Study Smart ने एक IELTS मास्टरक्लास सुद्धा आयोजित केला होता, ज्यामध्ये ब्रिटिश काऊन्सिल आणि केम्ब्रिज प्रमाणित प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना IELTS परीक्षेत उत्कृष्ट परिणाम मिळवण्यासाठी आवश्यक टिप्स, रणनीती आणि मॉक टेस्टच्या थेट प्रदर्शनाद्वारे मार्गदर्शन केले. या सत्रामुळे विद्यार्थ्यांना तयारीमध्ये मोठा फायदा झाला.
सेमिनारनंतर, विद्यार्थ्यांना स्टडी स्मार्ट च्या सल्लागारांसोबत वेळी वैयक्तिक सल्लामसलत करण्याची संधी मिळाली. या सल्लामसलतीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमी आणि भविष्यातील करिअरच्या उद्दिष्टानुसार मार्गदर्शन केले गेले.
स्टडी स्मार्ट च्या भागीदार असलेली क्रेडिला ही संस्था भारतातील अग्रगण्य शैक्षणिक कर्ज प्रदाता आहे, त्यांनी विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी कर्ज घेण्याच्या विविध पर्यायांबद्दल सखोल माहिती दिली. यामुळे विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना शैक्षणिक खर्चाचा नियोजन करताना योग्य मार्गदर्शन मिळाले.
श्री. चेतन जैन यांनी सेमिनारच्या यशावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले, “अहिल्यानगरमधील विद्यार्थ्यांनी जो उत्साह आणि रुचि दाखवली, ते पाहून आम्ही खूप आनंदित आहोत. आमचा उद्देश विद्यार्थ्यांना परदेशी अध्ययनासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती आणि मार्गदर्शन एकाच ठिकाणी पुरवणे आहे, ज्यामुळे त्यांचे शिक्षण आणि करिअर यांचे स्वप्न साकार होईल. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्हाला त्यांचे प्रश्न सोडवण्याचा आणि त्यांना योग्य दिशा दाखवण्याचा एक आदर्श मंच मिळतो.”
स्टडी स्मार्ट हा एक विश्वासार्ह सल्लागार म्हणून परदेशी अध्ययन सल्लागार क्षेत्रात नावारूपाला आलेला आहे. विद्यार्थींसाठी प्रवेश मार्गदर्शन, IELTS प्रशिक्षण, व्हिसा सहाय्य, आणि प्री-डिपार्चर सपोर्ट यासारख्या संपूर्ण सेवांचा पुरवठा करणारी Study Smart हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण आणि करिअरच्या ध्येयाची प्राप्ती करण्यात मदत करत आहे.
