वंचित बहुजन आघाडी मुंबई पक्ष कार्यालयात ध्वजारोहण
मुंबई : वंचित बहुजन आघाडी मुंबई पक्ष कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालयात वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्याहस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सदस्य अमित भुईगळ, मुंबई प्रदेश महासचिव आनंद जाधव, महिला आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष सुनीता गायकवाड पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
