Monday, September 21, 2026
Latest NewsPUNE

बारामतीकरांना मिळणार जुनाट आजारांवर संजीवनी

 

बारामती : डायबेटीस पासून कॅन्सर पर्य़ंत आणि रक्त घटकांच्या आजारांपासून प्रतिकार शक्ती पर्यंत जे दीर्घकालीन आणि जीवनशैलीचे आजार आहेत त्यावर पेशंट बरोबरच अनेक हॉस्पिटल आणि डॉक्टरना मदत करणारा हीलझेन – प्रो थेराप्युटीक प्रोटोकाल रुग्णसेवेसाठी सज्ज झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवत असलेल्या वैद्यकीय सेवा संस्था ‘हीलझेन ग्रुप’ चे ‘हीलझेन क्लिनिक’ आणि ‘रिसर्च सेंटर’ आता वैद्यकीय क्षेत्रात अमूलाग्र क्रांती करण्याच्या उद्देशाने बारामतीकरांच्या सेवेत लवकरच दाखल होत आहे.

यामध्ये जुनाट व दुर्मिळ आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना आधार देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीसाठी ‘हिलझेन’ नावीन्यपूर्ण, एकात्मिक , सर्वसमावेशक तसेच पूरक उपचार पद्धती घेऊन रुग्णांच्या सेवेत दाखल होत असल्याची माहिती ‘हिलझेन रिसर्च सेंटर’ चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. एन. कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ‘हिलझेन क्वांटम क्युयर’ प्रायव्हेट लिमिटेड च्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. अपूर्वा अहिरराव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रकाश कलके, मुख्य ऑपरेटींग ऑफिसर सुजित डोळस यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

हिलझेन क्लिनिक ची संकल्पना आणि उद्देश स्पष्ट करताना डॉ. कदम म्हणाले की, केवळ अनेकविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णानांच नव्हे तर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मदतीसाठी ‘हिलझेन’ ही वेगळ्या धर्तीवर काम करणारी संस्था बारामती मध्ये कार्यरत असणार आहे. त्यासाठी आम्ही रुग्णांसाठी ‘प्रो थेरप्युटीक प्रोटोकॉल’ घेऊन आलो आहोत. आम्ही इतर डॉक्टरांच्या बरोबरीने तसेच त्यांच्या उपाचार पद्धतीला पूरक उपचार पद्धती विकसित केली असल्याचे ते म्हणाले. म्हणजेच कॅन्सरवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना केमोथेरपी, रेडिओथेरपीने जो त्रास होतो किंवा दुष्परिणाम होतात ते दूर करण्यासाठी ही थेरपी काम करेल. या बरोबरच, इतर अनेक जुनाट आजारांचेही व्यवस्थापन केले जाणार आहे.

ते पुढे म्हणाले की, गेल्या पंधरा ते वीस वर्षांत कॅन्सर चे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर डायबेटीस आणि अतिशय कमी वयात हृदय विकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे. या तिन्हीचे मूळ कारण हे चुकीच्या जीवनशैलीत आहे. अशा वाढत्या रुग्णसंख्येची हतबलता लक्षात घेऊन विविध कंपन्या जाहिरातबाजी करतात व रुग्णांना संभ्रमात टाकतात. पण आपण जो आहार घेतो त्याचा रक्तघटकावर होणारा परिणाम आणि या रक्तघटकांचा (ब्लड मार्कर) चा योग्य अभ्यास केल्यास आपल्यावर शास्त्रीय पद्धतीने उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मदत करणारी पूरक उपचार थेरपी आहे. याचा लाभ भारतात आणि परदेशातही अनेक रुग्ण घेत आहेत.

‘हिलझेन’ कडून देण्यात येणाऱ्या सेवेबाबत माहिती देताना डॉ. अपूर्वा अहिरराव म्हणाल्या की हिलझेन हे दीर्घकाळ किंवा जुनाट स्वरूपाच्या आजारांचे व्यवस्थापन करणारी एकात्मिक उपचार पद्धती घेऊन आले आहे. सध्या मधुमेह (डायबेटीस) हा साथरोगासारखा पसरत आहे. डायबेटीस आहे हे कळले की रुग्ण लगेच गोळ्या घ्यायला सुरुवात करतात. तरुणांमध्ये तर अगदी तिसाव्या वर्षी गोळ्या सुरू केल्याने त्याचे दुष्परिणामही दिसून येतात. या डायबेटीस ला प्रतिबंध करता यावा यासाठी हिलझेन ने एक सायंटिफिक ‘प्रो थेरपी प्रोटोकॉल’ तयार केला आहे.

डॉ. अहिरराव पुढे म्हणाल्या की, याबाबत आम्ही जुनाट आजाराबाबत मुंबईतील नामांकित रिसर्च सेंटरबरोबर संशोधन सुरू आहे. कँसर, डायबेटिस, बीपी, पोटाचे विकार, पचनासंबंधीच्या समस्या, लठ्ठपणा, संधिवात, ऑटोइम्युन डिसीज, यकृताचे आजर थायरॉईड, स्त्रियांच्या अरोग्यासंबंधीच्या समस्या, रक्ताचे विकार अशा अनेक जुनाट आजारांपासून आपली सहज सुटका करून घेऊ शकता.

डॉक्टर प्रकाश कलके यांनी यावेळी हिलझेन मध्ये रुग्णांवर कशा पध्दतीने उपचार केले जातात याविषयी संक्षिप्त माहिती दिली. हॉस्पिटल आणि डॉक्टर यांच्या बरोबर संलग्नित होऊन केल्या जाणाऱ्या कामाची माहिती दिली.

श्री सुजित डोळस पुढे म्हणाले की बारामातिकरांच्या सेवेसाठी हीलझेन महिन्यातून एकदा सूर्यनगरी येथील डॉ. जेधे क्लिनिक येथे होणार आहे. त्यासाठी +91 82083 09931 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन हिलझेन तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading