Tuesday, September 22, 2026
BusinessLatest News

विनिर इंजिनीयरिंग लिमिटेडने सेबीकडे डीआरएचपी दाखल केले

अनेक वेगवेगळे उद्योग आणि ऍप्लिकेशन्ससाठी स्पेशलाइज्ड, महत्त्वपूर्ण आणि अवजड, प्रिसिजन फोर्ज्ड आणि मशीन्ड कम्पोनंट्स बनवणाऱ्या विनिर इंजिनीयरिंग लिमिटेड या एकीकृत इंजिनीयरिंग सोल्युशन्स कंपनीने सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केले आहे.

या आयपीओमध्ये प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्य असलेले 53,300,000 पर्यंत इक्विटी समभागांच्या विक्रीच्या ऑफरचा समावेश असेल. विक्रीसाठीच्या ऑफरमध्ये नितेश गुप्ता यांच्याकडून प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 53,300,000 पर्यंत इक्विटी शेयर्सचा समावेश आहे. विनिर इंजिनीयरिंग लिमिटेड ही अनेक वेगवेगळे उद्योग आणि ऍप्लिकेशन्ससाठी स्पेशलाइज्ड, महत्त्वपूर्ण आणि अवजड, प्रिसिजन-फोर्ज्ड आणि मशीन्ड कम्पोनंट्स बनवणारी एकीकृत इंजिनीयरिंग सोल्युशन्स कंपनी आहे. ऊर्जा, संरक्षण, एरोस्पेस, रेल्वे, एनर्जी टर्बाइन्स, हायड्राउलिक्स, जमिनीचे खोदकाम, हाय एन्ड इंजिनीयरिंग अशा अनेक उद्योगांना ही कंपनी सेवा पुरवते. चिलखती वाहने, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा, लढाऊ उपकरणे, लष्करी हार्डवेअर, अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम तेल आणि वायू प्रणाली, क्रायोजेनिक्स प्रणाली, एअरक्राफ्ट प्रॉपल्शन सिस्टिम्स, पॉवर टर्बाइन, गॅस टर्बाइन, रेल्वे लोकोमोटिव्ह आणि ब्रेकिंग सिस्टम, अणुऊर्जा पायाभूत सुविधा उपकरणे, हेवी ड्युटी उत्खनन यंत्रणा, स्पेसफ्रेम, हायड्रॉलिक घटक, विंड टर्बाइन जनरेटर आणि उच्च-दाब बॉयलर अशा विविध सिस्टिम्स आणि ऍप्लिकेशन्समध्ये हे सुटे भाग खूप महत्त्वाचे असतात. महत्त्वपूर्ण आणि अवजड, प्रिसिजन-फोर्ज्ड आणि मशीन्ड कम्पोनंट्समध्ये स्पेशलायझेशन असलेली ही कंपनी अनेक वेगवेगळे धातू, अलॉय स्टील, टायटॅनियम, हेस्टअलॉय, कार्बन स्टील्स, स्टेनलेस स्टील्स, ड्युप्लेक्स स्टील्स, स्पेशल स्टील्स, इन्कॉनेल, मॉनेल आणि ऍल्युमिनियम इत्यादींचा वापर करते. या प्रक्रिया आणि प्रिसिजन मशिनिंगचा वापर करून 20 किलो ते 6000 किलो वजनाचे सुटे भाग बनवण्याची क्षमता या कंपनीमध्ये आहे.

या कंपनीची तीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स असून त्यांची एकूण संस्थापित क्षमता 38000 एमटीपीए आहे. युनिट 1 कर्नाटकातील बंगलोरमध्ये आहे, युनिट 2 आणि 3 तामिळनाडूतील होसूर आणि कळूकोंडनापल्लीमध्ये आहेत. या तीनही युनिट्सची मिळून एकूण जागा 38,160 चौरस मीटर आहे. कंपनीच्या ग्राहकांमध्ये ऊर्जा, संरक्षण, एरोस्पेस, रेल्वे, एनर्जी टर्बाइन्स, हायड्राउलिक्स, जमिनीचे खोदकाम, हाय-एन्ड इंजिनीयरिंग इत्यादी विविध क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे, या कंपन्या युनायटेड स्टेट्स, मेक्सिको, स्पेन, मलेशिया, युनायटेड अरब एमिरेट्स, सौदी अरेबिया, ट्युनिशिया, कॅनडा आणि इतर देशांमध्ये आहेत. गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये आणि 30 सप्टेंबर 2024 रोजी समाप्त झालेल्या सहा वर्षांमध्ये त्यांनी 150 पेक्षा जास्त ग्राहकांना, म्हणजे दरवर्षी सरासरी 60 ते 70 ग्राहकांना सेवा पुरवल्या आहेत. त्याच कालावधीत त्यांनी 39 नवीन ग्राहक जोडले.

आर्थिक वृद्धी आणि पायाभूत सोयीसुविधा, तेल वायू क्षेत्रांमधील खूप मोठी गुंतवणूक, संपूर्ण जगभरात एरोस्पेस व संरक्षण क्षेत्रांवर दिला जाणारा भर हे प्रिसिजन-फोर्ज्ड व मशीन्ड कम्पोनंट्सच्या मागणीला चालना देणारे प्रमुख घटक आहेत. जागतिक नॉन-ऑटोमोटिव्ह फोर्जिंग बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल 2023 मध्ये 33.16 बिलियन यूएस डॉलर्स होती, म्हणजेच एकूण फोर्जिंग्स मागणीचा 35% भाग आणि 2030 पर्यंत ही बाजारपेठ 2023 ते 2030 मध्ये 7.4% सीएजीआरने 54.54 बिलियन यूएस डॉलर्सपर्यंत वाढेल असे अनुमान आहे. तेल आणि वायू, एरोस्पेस आणि संरक्षण, जमिनीचे खोदकाम, हायड्राउलिक्स आणि खाणकाम, रेल्वे आणि ऊर्जा यासारख्या नॉन-ऑटोमोटिव्ह एन्ड यूज क्षेत्रांकडून मागणीमध्ये होणारी वाढ या वृद्धीला चालना देईल. जागतिक पातळीवर नॉन-ऑटोमोटिव्ह प्रिसिजन मशीन्ड फोर्जिंग बाजारपेठेचे मूल्यांकन 2023 मध्ये 23.88 बिलियन यूएस डॉलर्स होते, म्हणजे एकूण संपूर्ण फोर्जिंग मागणीचा 72% हिस्सा आणि अनुमान आहे की 2030 पर्यंत 2023 ते 2030 या कालावधीत 6.5% सीएजीआरने वाढून 2030 पर्यंत 37.11 बिलियन यूएस डॉलर्सपर्यंत वाढेल. ऊर्जा (तेल आणि वायू), एरोस्पेस आणि संरक्षण, जमिनीचे खोदकाम, हायड्राउलिक्स, खाणकाम व रेल्वे यासारख्या नॉन-ऑटोमोटिव्ह एन्ड यूज क्षेत्रांकडून मागणीमध्ये वाढ या वृद्धीला चालना देईल.

भारतामध्ये नॉनऑटोमोटिव्ह प्रिसिजन मशीन्ड फोर्जिंग बाजारपेठेचे मूल्यांकन आर्थिक वर्ष 2024 मध्ये 13,117 कोटी रुपये होते, म्हणजे एकूण संपूर्ण फोर्जिंग मागणीचा 70% हिस्सा आणि अनुमान आहे की 2030 पर्यंत 2024 ते 2030 या कालावधीत 8% सीएजीआरने वाढून 2030 पर्यंत 20814 कोटी रुपयांपर्यंत वाढेल. ऊर्जा (तेल आणि वायू), एनर्जी टर्बाइन्स, एरोस्पेस आणि संरक्षण, जमिनीचे खोदकाम, हायड्राउलिक्स, खाणकाम व रेल्वे यासारख्या नॉन-ऑटोमोटिव्ह एन्ड यूज क्षेत्रांकडून मागणीमध्ये वाढ या वृद्धीला चालना देईल. विनिर इंजिनीयरिंग लिमिटेडसारख्या कंपन्यांसाठी ही चांगली बाब ठरेल. भारतामध्ये नॉन-ऑटोमोटिव्ह प्रिसिजन मशीन्ड फोर्जिंग बाजारपेठेचे मूल्यांकन आर्थिक वर्ष 2024 मध्ये 13,117 कोटी रुपये होते, म्हणजे एकूण संपूर्ण फोर्जिंग मागणीचा 70% हिस्सा आणि अनुमान आहे की 2030 पर्यंत 2024 ते 2030 या कालावधीत 8% सीएजीआरने वाढून 2030 पर्यंत 20,814 कोटी रुपयांपर्यंत वाढेल. ऊर्जा (तेल आणि वायू), एनर्जी टर्बाइन्स, एरोस्पेस आणि संरक्षण, जमिनीचे खोदकाम, हायड्राउलिक्स, खाणकाम व रेल्वे यासारख्या नॉन-ऑटोमोटिव्ह एन्ड यूज क्षेत्रांकडून मागणीमध्ये वाढ या वृद्धीला चालना देईल. विनिर इंजिनीयरिंग लिमिटेडसारख्या कंपन्यांसाठी ही चांगली बाब ठरेल.

या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स पँटोमॅथ कॅपिटल अड्वायजर्स प्रायव्हेट लिमिटेड हे आहेत तर ऑफरचे रजिस्ट्रार केएफआयएन टेक्नॉलॉजीज लिमिटेड हे आहेत.

लिंकhttps://www.bseindia.com/markets/PublicIssues/IPODRHP.aspx

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading