Monday, September 21, 2026
ENTERTAINMENTLatest News

अक्षराच्या जुन्या मित्राची एण्ट्री अधिपतीच्या आयुष्यात काय वादळ घेऊन येणार ?

 

तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत भुवनेश्वरी, अक्षरा घराबाहेर राहत असल्याचं पुरेपूर फायदा घेत आहे. भुवनेश्वरी, अधिपती समोर स्वतःची चांगली छवी बनवून ठेवण्यासाठी अक्षरासोबत बोलायला जाते आणि तिथून आल्यावर ती अक्षरांनी न बोललेल्या गोष्टी अधिपतीला सांगून भडकावते . दुसरीकडे अक्षराला आई-बाबा समजावतात की तिने लवकरात लवकर अधिपतीला भेटून प्रेग्नंसीची बातमी द्यावी. त्यावर अक्षरा ठरवते की संक्रांतीच्या दिवशी स्वत: जाऊन अधिपतीला भेटायचं. ती अधिपतीसाठी छान गिफ्ट तयार करते. अधिपतीने पण तिच्यासाठी छान साडी आणि हलव्याचे दागिने घेतले आहेत. दुर्गेश्वरी हे सर्व पाहून अधिपतीच्या साडीची पिशवी बदलते.  मकरसंक्रांतीच्या निमित्ताने अक्षराला घरी घेऊन जायचं म्हणून अधिपती अक्षराच्या घरी येतो. पण घरात नेमकी इरा आहे. हीच संधी साधून इरा अक्षराविरुद्ध अधपतीला सगळी चुकीची माहिती देते. दुसरीकडे भुवनेश्वरीही अक्षराला दारातच अडवते. घर सोडलं तसं नातं पण विसरा असं जेव्हा अक्षराला सांगते तेव्हा अक्षरा तिला चांगलाच पलटवार देते.  पलटवार बघून भुवनेश्वरी अक्षरावर हात उचलते. ह्याच आठवड्यात अक्षराच्या जुन्या मित्राचीही एण्ट्री होणार आहे आणि ही व्यक्ती आल्यानंतर अक्षरा-अधिपतीमधला गैरसमजम आणखी वाढत जाणार आहे.

कोण आहे हा अक्षराचा नवीन मित्र? अधिपतीला कळेल का की तो बाबा बनणार आहे? या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी बघायला विसरू नका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ रोज रात्री १०:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading