Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

पतित पावन संघटनेच्या दिनदर्शिकेचे अनावरण

पुणे : पतित पावन संघटनेच्या २०२५ च्या दिनदर्शिकेचे अनावरण गुरुवार पेठेतील हिंदू तरुण मंडळ या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कसबा भागाचे कार्यवाह राहुल पुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी नरेश आडेप, पतित पावनचे माजी ज्येष्ठ मार्गदर्शक आप्पा मनेरे, हिंदू तरुण मंडळाचे महेश पांडे, स्वकुळ समाज नारायण पेठकर समाजाचे विश्वस्त नरेश गायकवाड, संघटनेचे अध्यक्ष स्वप्निल नाईक, उपाध्यक्ष यादव पुजारी, सरचिटणीस ललित खंडाळे, कसबा विभाग प्रमुख योगेश वाडेकर, राजाभाऊ रजपूत, स्वप्निल आंग्रे, हरी जगधने, तेजस नाईक, बालाजी बोरबंडे व अन्य सहकारी उपस्थित होते.

राहुल पुंडे म्हणाले, संघटना नागरिकांसाठी, युवक युवतींसाठी स्किल डेव्हलपमेंट, दहावी बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी पुणे मनपाकडून मिळणारी अर्थसाह्य योजना तसेच आपल्या कलेला वाव मिळावा यासाठी मोफत स्कीलिंग कोर्स आयोजित करीत आहे. तसेच समाजातील विविध घटकांसाठी वर्षभर आग्रहीपणे कार्य करत असते. भारताची एकजुटीची विचारसरणी, सामाजिक बांधिलकी हीच खरी भाऊबंदकी, अन्याया विरोधात लढा म्हणजे हक्कासाठी लढा, एकात्मतेचा संदेश हीच युवाशक्ती अशा विचारसरणीवर संघटना कार्यरत असते, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading