Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींगने पटकावला जाधवर करंडक

पुणे : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर आर्टस काॅमर्स अँड सायन्स कॉलेज वतीने ६ वा प्राचार्य डाॅ. सुधाकरराव जाधवर करंडक स्पर्धेत सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग ने जाधवर करंडक पटकाविला.

नऱ्हे येथील संस्थेच्या संकुलात स्पर्धेचे आणि पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळाच्यावतीने ही स्पर्धा झाली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते.

पथनाट्य स्पर्धेत सिंहगड काॅलेज इंजिनिअरींग ने प्रथम, वाडिया काॅलेज द्वितीय, श्रीमती काशीबाई नवले महाविद्यालयाने तृतीय क्रमांक तर एमआयटी आळंदी महाविद्यालयाने चतुर्थ क्रमांक पटकाविला. वादविवाद स्पर्धेत न्यू आर्टस काॅमर्स आणि सायन्स काॅलेज अहमदनगर ने प्रथम, स.प. महाविद्यालयाने द्वितीय, डॉ. डी.वाय, पाटील महाविद्यालय पिंपरी ने तृतीय क्रमांक तर एमआयटी कॉलेज ने चतुर्थ क्रमांक पटकाविला.

भारुड, भजन, पोवाडा स्पर्धेत जगन्नाथ शिंदे याने प्रथम, ऋत्विक चव्हाण द्वितीय, सृष्टी यादव हि तृतीय क्रमांक आणि सिद्धांत लांडे हा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला. वक्तृत्व स्पर्धेत पूर्वा काणे, तजस पाटील, महेश उशीर, सृष्टी शिंदे यांनी अनुक्रमे चार क्रमांक पटकाविले.

९ वी कै. आमदार रमेश भाऊ वांजळे निबंध लेखन स्पर्धा निकाल-

गट पहिला – इयत्ता पहिली ते दुसरी – १) श्रृती गोडसे २) ग्रीशा शिरोडकर ३) पुर्वा शिंदे आणि शिवम मळेकर, गट दुसरा – ३ री ते ४ थी – १) आरोही भोसले २) समृद्धी शिंदे ३) आर्या आघाव आणि अनन्या माळी, गट तिसरा ५ वी ते ७ वी – १) सृष्टी कुंभारकर २) ओम कुऱ्हाडे ३) सृष्टी पांगारे आणि प्रिती राऊत, गट चौथा ८ वी ते १० वी – १) सुहानी मांडवकर २) सुप्रिया चव्हाण ३) अगम ससाणे आणि विठ्ठल जकाकुरे, गट पाचवा ११ वी ते १२ वी – १) अन्मिका विश्वकर्मा २) श्रुतीका नाईकनवरे ३) ओंकार पवार आणि नागेश खंडाळे

कै. उद्धवराव तुळशीराम जाधवर वक्तृत्व स्पर्धा निकाल –

गट पहिला – १) तिशा परदेशी २) पियुशी शर्मा ३) ईशान मांडके आणि सांगवी मस्के, गट दुसरा – १) संयुक्ता राजपूत २) अभुद्या देसाई ३) आरुष सुपाते आणि रेयांश बदक, गट तिसरा- १) शर्वरी भुवड २) श्रेया पवार ३) वेदांत कदम आणि श्रेयस काकडे, गट चौथा – १) अजय दहिया २) सुजाता नरझारी ३) तनुजा मोरे आणि नैना विश्वकर्मा

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading