Friday, November 6, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

शरद पवारांचा फडणवीस यांना फोन

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांना बीड जिल्ह्यातील मस्साजोगा गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी जातीने लक्ष घालण्याची विनंती केली. 

शरद पवार यांनी भीमथडी जत्रेला भेट दिली. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी जातीने लक्ष घालण्याची विनंती केली. त्याचप्रमाणे भीमथडी जत्रेला भेट देण्यासाठी निमंत्रणही दिले. 

संतोष देशमुख हत्या प्रकरण अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय देणे गरजेचे आहे. आपण मस्साजोगा गावाला भेट दिली आहे. त्या ठिकाणी परिस्थिती चिंताजनक आहे, असे पवार यांनी सांगितले. 

Leave a Reply