मार्गशीर्ष गुरुवारी होणार सिंहावर आरूढ आई तुळजाभवानीचा जागर !
राज्यातल्या प्रत्येक घराघरात भक्तिभावाने बघितल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानी या मालिकेमध्ये प्रेक्षकांना आतापर्यंत भक्त रक्षणासाठी आईने केलेले अनेक चमत्कार बघायला मिळाले, आतापर्यंत देवीचे अनेक अवतार पाहायला मिळाले आहेत. देवीच्या विविध अवतारांचा हा आध्यात्मिक प्रवास अनुभवायला मिळाला.
‘आई तुळजाभवानी’ या मालिकेचा मार्गशीर्ष महिन्याच्या शुभ मुहूर्तावर विशेष भाग पार पडला ज्यात देवीचा उत्तरेकडून पश्चिमेकडे प्रवास झाला. महाराष्ट्राच्या पावनभूमीवर कुलस्वामिनी ‘आई तुळजाभवानी’चे आगमन झाले. म्हाळसा देवीने आई तुळजाभवानीचे नव्या प्रवासात अनोख्या पद्धतीने स्वागत केले तसेच तुळजा आणि म्हाळसा यांनी मिळून दुर्जनानांचा संहार केला. तर, आई तुळजाभवानी’ आणि महालक्ष्मी या दोन सख्यांची भेट देखील दाखविण्यात आली. या भेटीत मार्गशीष गुरुवार व्रताचीकथा देखील सांगितली. तर दुसरीकडे, कद्दरासुराची आदिशक्तीच्या शक्तींना वश करण्याची दुष्ट योजना देवी तुळजाभवानीने त्रिदेवांच्या साथीने धुळीस मिळवली. आता याच मार्गशीर्ष गुरुवारच्या विशेष भागांच्या शृंखलेत सगळ्या भक्तांसाठी उत्सुकतेचा विषय म्हणजे सिंह या तुळजाभवानीच्या वाहनाची अनोखी गोष्ट पहायला मिळणार आहे. मार्गशीर्ष गुरुवारी होणार सिंहावर आरूढ आई तुळजाभवानीचा जागर नक्की पहा आई तुळजाभवानी दररोज रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर…
कद्दरासुराने बांध घालून कैद केलेल्या नदीच्या सुटकेची रोमांचक गोष्ट या आठवड्यात मालिकेत बघायला मिळणार आहे. तुळजाभवानी देवीने सोनेरी मांजरीचे रूप घेऊन नदीची केलेली सुटका हा कथाभाग असलेली मांजरा नदीची ही प्रसिद्ध गोष्ट प्रेक्षकांना पाहता येईल. आई तुळजाभवानीच्या कृपेने नदीची सुटका होते आणि यामुळेच चिडलेला कद्दरासुर निर्भय झालेल्या लोकांमध्ये पुन्हा दहशत निर्माण करण्यासाठी पुढची योजना आखतो आणि गावात भुकलेला बिबट्या सोडतो. या बिबट्याने कसा धुमाकूळ घातला आणि तुळजाभवानी देवीने तिचे वाहन सिंहामार्फत तिचा निस्सीम भक्त आबाची केलेली थरारक सुटका मार्गशीर्ष गुरुवारी पाहाता येणार आहे. देवीच्या असुरवध कार्याशी आणि शौर्यगुणाशी संबंधित असलेला शौर्याचे, निर्भयतेचे प्रतीक असलेला सिंह, देवीच्या भक्तांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतो याचा दिव्य प्रत्यय या गोष्टीतून मिळतो. येत्या गुरुवार २० आणि शुक्रवार २१ डिसेंबरला हा ‘मार्गशीर्ष गुरुवारी होणार सिंहावर आरूढ आई तुळजाभवांनीचा जागर’ कथाभाग पाहता येईल.
तेव्हा नक्की पहा आई तुळजाभवानीचा जागर, नक्की पहा आई तुळजाभवानी दररोज रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर…
