Thursday, May 14, 2026
BusinessLatest News

महिंद्राने दिल्लीतील BAUMA CONEXPO मध्ये लाँच केली अत्याधुनिक CEV-V श्रेणीतील बांधकाम उपकरणे

दिल्ली : महिंद्रा समूहाचा एक भाग असलेल्या महिंद्रा कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट विभागाने (MCE)  BAUMA CONEXPO 2024 मध्ये त्यांची नवीन उत्पादने लाँच केली. ही उत्पादने नावीन्यता आणि विश्वासार्हतेची प्रतीक आहेत. नवीन CEV5 श्रेणीतील बांधकाम उपकरणे त्यांच्या श्रेणीतील नवीन मानके स्थापित करतील, प्रगत वैशिष्ट्ये आणि उद्योगातील नवीन मानकांचे पालन करतात. इंडिया एक्स्पो सेंटर येथील महिंद्रा पॅव्हेलियनमध्ये महिंद्राच्या BSV श्रेणीतील बांधकाम उपकरणे रोडमास्टर आणि अर्थमास्टर मांडल्या, तसेच बांधकाम क्षेत्रासाठीचा विस्तृत ट्रक श्रेणी – BLAZO X 48 CLS 10×4 टिपर, BLAZO X m-DURA 35 8×4 टिपर, BLAZO X 28 ट्रांझिट मिक्सर 7.5 घनमीटर ड्रमसह, FURIO 10 फ्युल बाउझर 6KL क्षमतेसह आणि बोलेरो कॅम्पर व मॅक्स पिकअप प्रदर्शित केली आहेत.

कार्यक्रमाच्या वेळी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड ट्रक आणि बस व कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट विभागाचे व्यवसाय प्रमुख – डॉ.वेंकट श्रीनिवास म्हणाले, “अत्याधुनिक उत्पादने आणि तंत्रज्ञान विकसित करण्याचे आमचे सातत्यपूर्ण प्रयत्न व स्थानिक उत्पादनावर दिलेला भर हे ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी आमच्या दृढ पाठिंब्याचे उदाहरण आहे. BAUMA CONEXPO मध्ये सादर केलेली नवीन CEV5 श्रेणी, भारत सरकारच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी महिंद्राच्या वचनबद्धतेला बळकटी देते. ही नवीन CEV5 श्रेणी आमच्या अभियंत्यांच्या कौशल्याची साक्ष देते, कारण त्यांनी उच्च कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करून ही उत्पादने विकसित केली आहेत. यामध्ये मोठ्या आणि अधिक आरामदायक केबिनचा समावेश असून, ती ऑपरेटरची उत्पादकता वाढविण्यासाठी डिझाइन केली गेली आहेत.”

याशिवाय, ही उपकरणे महिंद्रा IMAXX प्रगत टेलिमॅटिक्स प्रणालीसह सुसज्ज आहेत, जी खर्च कमी ठेवण्यासाठी आणि फ्लीटच्या सुरक्षिततेसाठी उत्कृष्ट नियंत्रण प्रदान करते. नवीन CEV5 श्रेणीतील बांधकाम उपकरणे म्हणजे विद्यमान अर्थमास्टर – बॅकहो लोडर आणि रोडमास्टर – मोटर ग्रेडर यांची उच्च श्रेणीतील सुधारणा असून, यामध्ये 74 HP आणि 102 HP इंजिन आहे, जे CEV 5 उत्सर्जन मानकांचे पालन करते.

खाली प्रदर्शनामध्ये सादर केलेल्या प्रमुख उत्पादनांचे तपशील दिले आहेत:

MCE CEV5 श्रेणी: कार्यक्षमतेचा आणि नियमांचे पालन यांचा नवीन मानदंड

MCE CEV5 श्रेणी दोन प्रमुख उत्पादनांसह सादर करण्यात आली आहे. रोडमास्टर G100: हा उच्च-शक्तीचा मोटर ग्रेडर आगामी CEV5 उत्सर्जन मानकांचे पालन करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. त्याचे 102 HP इंजिन आणि 440 NM टॉर्क राज्य व राष्ट्रीय महामार्ग बांधकामासाठी तो अतिशय उपयुक्त बनवितात. अर्थमास्टर SX आणि SXe: CEV5 उत्सर्जन नियमांचे पालन करणारा हा बहुपयोगी बॅकहो लोडर 74 HP इंजिन, अधिक मोठे आणि आरामदायक कॅबिन आणि iMAXX टेलिमॅटिक्स तंत्रज्ञान यांसह सुसज्ज आहे, जे कार्यक्षमता आणि उत्पादकता लक्षणीयरीत्या वाढवते.

BLAZO X 48 CLS 10×4 टिपर (29 घनमीटर आणि 18 घनमीटर BS6 OBD2): ब्लू मेटल, कोळसा, M-सँड, माती वाहतूक आणि विशेषतः लोखंड खनिज वाहतुकीसाठी डिझाइन केलेला 18 घनमीटरचा मॉडेल, लांब अंतराच्या विविध टिपर अनुप्रयोगांसाठी आदर्श व्यवसाय समाधान प्रदान करतो. डबल सर्व्हिस गॅरंटीमध्ये 36 तासांत सेवा पुन्हा सुरू (TAT) आणि 48 तासांत अपटाइम, वापरकर्त्यांसाठी कमाल उत्पादकता सुनिश्चित करण्यासाठी. महिंद्रा IMAXX प्रगत टेलिमॅटिक्समुळे BLAZO X 48 10×4 टिपर हा फक्त एक ट्रक न राहता आधुनिक वाहतूकदारांसाठी एक व्यापक समाधान बनते. अधिक अपटाइम, अधिक नफा हमीशीर!

BLAZO X m-DURA टिपर (22 घनमीटर बॉडी 35T टिपरमध्ये, 16 घनमीटर बॉडी 28T टिपरमध्ये आणि 14 घनमीटर रॉक बॉडी 28T टिपर प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध): टिपर तंत्रज्ञानातील नवीन मानदंड निश्चित करतेBLAZO X m-DURA भारतातील टिपर तंत्रज्ञानाच्या नव्या युगाची सुरुवात आहे. 28T आणि 35T GVW श्रेणींमध्ये उपलब्ध असलेले हे उत्पादन सिद्ध, मजबूत आणि विश्वासार्ह तंत्रज्ञानासह कामगिरी व टिकाऊपणाचे नवीन मापदंड स्थापित करते. 36 तासांत सेवा पुन्हा सुरू (TAT) आणि 48 तासांत अपटाइम, वापरकर्त्यांसाठी जास्तीतजास्त उत्पादकता सुनिश्चित करण्यासाठी डबल सर्व्हिस गॅरंटी आहे. 10 टिपर फ्लीटपर्यंत 24×7 ऑनसाइट समर्थन उपलब्ध, ग्राहकांना अतुलनीय मानसिक समाधान प्रदान करते. महिंद्रा IMAXX प्रगत टेलिमॅटिक्समुळे BLAZO X m-DURA ला फक्त एक टिपर न राहता आधुनिक वाहतूकदारांसाठी एक व्यापक समाधान बनविते.

BLAZO X 28 (7.5 घनमीटर) ट्रान्झिट मिक्सर: बांधकाम क्षेत्रातील ग्राहकांसाठी हे एक अत्याधुनिक उत्पादन आहे. यात सर्वोत्तम श्रेणीतील सस्पेन्शनसह स्टेट-ऑफ-दी-आर्ट कॅबिन आहे, जे आरामदायकता उत्पादकतेत सुधारणा करते. यामध्ये 7 घनमीटर ड्रम क्षमता आहे, जो किर्लोस्कर विश्वसनीय स्लेव्ह इंजिनद्वारे चालविला जातो आणि फ्युलस्मार्ट तंत्रज्ञान वापरल्यामुळे उत्कृष्ट कार्यक्षमता व चांगली क्लच लाइफ मिळविता येते, ज्यामुळे अधिक अपटाइम मिळतो. यात डबल सर्व्हिस गॅरंटी आहे. कमी सेवा असल्याने (12 महिन्यांहून 7 महिन्यांपर्यंत) ग्राहकांना TCO (टोटल कास्ट ऑफ ओनरशिप) फायदा मिळतो.

फुरिओ 10 6KL फ्युएल बाउझर – व्यावसायिक वाहन (CV) ग्राहकांसाठी अद्वितीय ऑन-डोअर डिझेल वितरण व्यवसाय सोल्युशन असून, इंधन बचतीला चालना देणाऱ्या आणि व्यवसाय सुलभतेकडे वाटचाल करणाऱ्या भारत सरकारच्या उपक्रमांसाठी पूरक आहे. डोअरस्टेप फ्युल डिलिव्हरीची मागणी फ्युरिओ ट्रक्सच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी महिंद्राने रिपॉस एनर्जीसोबत भागीदारी केली आहे. फुरिओ मालिका लाइट आणि इंटरमीडिएट कमर्शियल व्हेइकल्सवर आधारित हा दुहेरी डिस्पेंसिंग अल्फा मोबाइल फ्युल पंप आहे. डोअरस्टेप डिझेल वितरणामुळे ऊर्जा वितरणाची मजबूत आणि कार्यक्षम व्यवस्था निर्माण होईल, तसेच मोठ्या प्रमाणावर इंधन लागणाऱ्या उद्योगांना आणि ग्राहकांना थेट डिझेल पुरवठा करणे शक्य होईल.

टिपरच्या MTB रेंजमध्ये ट्रान्झिट मिक्सर आणि फ्युल बाउझर यांचा समावेश असून, या वाहनांसोबत दुहेरी सेवा हमी दिली जाते: “48 तासांत परत रस्त्यावर न आल्यास रु. 1,000 प्रति दिवस” आणि “डीलरशिप वर्कशॉपमधून 36 तासांत काम पूर्ण न झाल्यास रु. 3,000 प्रति दिवस”

ग्राहक कल्याण कार्यक्रम, जसे की, महिंद्रा सारथी अभियान, दरवर्षी ट्रक चालकांच्या मुलींना 1,000+ शिष्यवृत्ती देण्याचे उद्दिष्ट ठेवते. या शिष्यवृत्तीसाठी थेट बँक खात्यात ₹10,000 जमा केले जातात आणि त्यांच्या यशाचा सन्मान म्हणून प्रमाणपत्र दिले जाते. आजपर्यंत महिंद्रा सारथी अभियान अंतर्गत ट्रक चालकांच्या 10,000+ मुलींना या उपक्रमाचा लाभ मिळाला आहे.

MTBD चे सेवा नेटवर्क 80 3S डीलरशिप आणि 2,900 हून अधिक रोडसाइड असिस्टन्स सर्व्हिस पॉइंट्स आणि संपूर्ण भारतातील प्रमुख ट्रकिंग मार्गांवर 1,600 पेक्षा जास्त रिटेल आउटलेट्सच्या स्पेअर्स नेटवर्कसह 400 प्लस टच पॉइंट्सपर्यंत विस्तारले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading