Friday, May 15, 2026
Latest NewsMAHARASHTRA

दिल्ली साहित्य संमेलन नगरीला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी नाव


दिल्ली.. दिल्ली येथे तालकटोरा स्टेडियम येथे २१/२२/२३ फेब्रुवारी २०२५ या काळात होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या सरहद पुणे आयोजित ९८ व्या.अखिल भारतीय साहित्य संमेलन परिसरास छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी नाव देण्याचे महामंडळ तसेच सरहद या संयोजक संस्थेने ठरविले असल्याचे आज महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे तसेच सरहद संस्थेचे संजय नहार यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच साहित्य संमेलनाला येणाऱ्या रसिकांसाठी पुणे – दिल्ली रेल्वे देण्याबाबत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन विनंती केली आहे आणि माननीय रेल्वे मंत्री यांनी त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे . मात्र एका रेल्वेत मर्यादित साहित्य रसिकांना समाविष्ट करणे शक्य असल्याने या रेल्वेवर अवलंबून न राहता महाराष्ट्रातील साहित्य रसिकांनी आपापल्या भागातून आपले दिल्लीसाठी आरक्षण करावे म्हणजे ऐनवेळी गडबड होणार नाही असेही आवाहन संयोजकांनी केले आहे. संमेलनाला येणाऱ्यांची सोय करणे शक्य व्हावे यासाठी आपल्या जवळच्या साहित्य संघात अथवा ऑनलाईन प्रतिनिधी शुल्क भरून १५ जानेवारी २०२५ पुर्वी नोंदणी करावी काही अडचण आल्यास ८४८४०५५२५२ या क्रमांकावर संपर्क साधावा. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा देण्याचा प्रयत्न राहील.  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठीचे प्रतिनिधी आवेदन पत्र  नोंदणी लिंक  https://forms.gle/oH6WxDrXuvUTn7fG6

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading