४५०,०००+ च्या दमदार परिवारासह टीव्हीएस आयक्यूबने सुरू केले ‘मिडनाइट कार्निवल’
बेंगळुरू – ४५०,०००+ टीव्हीएस आयक्यूब रस्त्यावर धावत असल्याचा विक्रमी टप्पा साजरा करण्यासाठी, भारताच्या आवडत्या कौटुंबिक ईव्हीने आपल्या नव्या, सर्वसमावेशक मार्केटिंग कॅम्पेनचे – टीव्हीएस आयक्यूब मिडनाइट कार्निवलचे अनावरण केले आहे. या कार्निवलअंतर्गंत देशभरातील ग्राहकांना आकर्षक आणि बक्षिसांची लयलूट असलेला अनुभव मिळणार आहे. हा दहा दिवसांचा महोत्सव १२ डिसेंबर रोजी पहाटे १२ वाजता सुरू होईल आणि २२ डिसेंबर रोजी रात्री ११.५९ वाजता संपेल. या अंतर्गत ग्राहकांना टीव्हीएस आयक्यूबच्या खरेदीवर १०० टक्के कॅशबॅक मिळवण्याची अभूतपूर्व संधी प्राप्त होणार आहे.
या कॅम्पेनचा एक भाग म्हणून या कालावधीदरम्यान टीव्हीएस आयक्यूब खरेदी करणाऱ्या ग्राहकांपैकी कोणताही एक विजेता दररोज निवडला जाईल व त्यांची खरेदी पूर्णपणे मोफत होईल. हा धमाल उपक्रम टीव्हीएस आयक्यूबची अधिकृत वेबसाइट आणि वितरकांच्या माध्यमातून उपलब्ध असेल व पर्यायाने सर्वांना सहज त्यात सहभागी होता येईल. सहभागी वितरकही या कॅम्पेनदरम्यान मध्यरात्रीपर्यंत खुले राहातील व ग्राहकांना सोयीस्कर सुविधा देतील.
टीव्हीएस आयक्यूब मिडनाइट कार्निवल उत्सवपूर्ण वातावरण तयार करत ब्रँडची शाश्वतता व नाविन्याप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करणार आहे. हा अनुभव आणखी मजेदार बनवण्यासाठी पूर्वी बुकिंग केलेले ग्राहकही मिडनाइट कार्निवल ऑफरसाठी पात्र ठरतील, मात्र या ग्राहकांना कॅम्पेनच्या कालावधीत खरेदीचा व्यवहार पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. यामुळे हरित वाहतुकीच्या दिशेने त्यांचा प्रवास आणखी आकर्षक होणार आहे. त्याशिवाय ग्राहकांना ३०,००० रुपयांपर्यंतचे खात्रीशीर लाभ तसेच टीव्हीएस आयक्यूब 3.4 kWh & वर पाच वर्ष/७०,००० किमीची विस्तारित वॉरंटी आणि टीव्हीएस आयक्यूब 2.2kWh पाच वर्ष/५०,००० किमीची विस्तारित वॉरंटी मिळणार आहे.
ग्राहकांना जवळच्या टीव्हीएस आयक्यूब वितरकांना भेट देऊन किंवा अधिकृत वेबसाइटवरून इलेक्ट्रिक स्कूटरची खरेदी करून या कॅम्पेनमध्ये सहभागी होता येईल. या कॅम्पेनमध्ये ग्राहकांना सद्य मासिक ऑफर्सचा आनंद घेता येत अधिक मूल्य मिळवता येईल.
टीव्हेस आयक्यूब तीन मूलभूत तत्वांपासून प्रेरित आहे. ग्राहकांना रेंज, कनेक्टेड तंत्रज्ञान, चार्जिंग सुविधा आणि किंमतीच्या बाबतीत पॉवर ऑफ चॉइस देणे, वाहन सुरक्षा व मालकीच्या एकंदर अनुभवाद्वारे वाहन कंपलीट अश्युरन्स देणे आणि वापरण्यास सोप्या वैशिष्ट्यांच्या माध्यमातून सिम्पलिसिटी ऑफ युसेज देत ग्राहकांचा रायडिंगचा अनुभव उंचावणे.
