एयर इंडियातर्फे १०० एयरबसची ऑर्डर, जागतिक दर्जाची विमानवाहतूक कंपनी बनण्याच्या ध्येयाला बळकटी
गुरुग्राम : एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या विमान वाहतूक कंपनीने आज आणखी १०० एयरबस एयरक्राफ्ट खरेदी करण्यासाठीची ऑर्डर दिली असून त्यात या १० वाइडबॉडी A350s आणि ९० नॅरो बॉडी A320 फॅमिली एयरक्राफ्टचा समावेश आहे. त्याशिवाय गेल्या वर्षी कंपनीने एयरबस आणि बोईंगसह ४७० एयरक्राफ्ट्सची ऑर्डर दिली होती.
या नव्या ऑर्डरमुळे एयर इंडियाने २०२३ मध्ये एयरबसकडे दिलेल्या ऑर्डरमधील एयरक्राफ्ट्सची संख्या तेव्हाच्या २५० वरून ३५० वर गेली आहे व त्यात ४० A350 आणि २१० A320 चा समावेश आहे.
वाढत्या A350 ताफ्याच्या देखभालीसाठी एयर इंडियाने एयरबसच्या फ्लाइट अवर सर्व्हिसेस कंपोनंट्सची (एफएचएस-सी) निवड केल्याचे जाहीर केले आहे. एयरबसतर्फे दिल्ली येथे दिल्या जाणार असलेल्या ऑन- साइट इंजिनियरिंग सेवा आणि सर्वसमावेशक कंपोनंट सेवा तसेच नवीन मटेरियल व देखभाल कंत्राटामुळे एयर इंडियाला A350 ताफ्याची विश्वासार्हता आणि कामगिरी चांगली राखणे शक्य होईल.
टाटा सन्स आणि एयर इंडियाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन म्हणाले, ‘भारतातील प्रवाशांची संख्या इतर जगाला मागे टाकत असून जागतिक स्तरावर प्रवास करू इच्छिणाऱ्या तरुणांचे वाढते प्रमाण पाहाता पायाभूत सुविधांचा दर्जा वेगाने सुधारत आहे. एयर इंडियाने गेल्या वर्षी ४७० एयरक्राफ्ट्सची ऑर्डर दिली होती व यंदा त्यात आणखी भर घालत ताफा विस्तारण्याचे ध्येय आहे. या अतिरिक्त १०० एयरबस एयरक्राफ्टमुळे एयर इंडियाचा विकास लक्षणीय पटींनी वाढेल आणि भारताला जगातील प्रत्येक कोपऱ्याशी जोडत जागतिक दर्जाची वाहतूक कंपनी बनण्याच्या ध्येयाला महत्त्वाचे योगदान मिळेल.’
एयरबसचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिलॉम फौरी म्हणाले, ‘गेल्या काही महिन्यांत भारतीय विमानवाहतूक क्षेत्रात लक्षणीय विकास पाहिल्यानंतर एयर इंडिया आपल्या अतिरिक्त ऑर्डरसाठी A320 फॅमिली आणि A350 वर परत विश्वास ठेवत असल्याचा मला आनंद झाला आहे. या सातत्यपूर्ण भागिदारीच्या माध्यमातून आम्ही एयर इंडियाच्या टाटा यांचे व्हिजन व नेतृत्वाखाली “Vihaan.AI” च्या यशाला पाठिंबा देण्यासाठी बांधील आहोत.’
१०० अतिरिक्त एयरक्राफ्ट्ससह एयर इंडियाच्या ताफ्यात एयरबसकडून एकूण ३४४ नवी एयरक्राफ्ट्स येणार असून आतापर्यंत त्यापैकी सहा A350s मिळाली आहेत. २०२३ मध्ये एयर इंडियाने बोईंगकडे २२० वाइडबॉडी आणि नॅरोबॉडी एयरक्राफ्ट्सची ऑर्डर नोंदवली होती, ज्यापैकी अद्याप १८५ एयरक्राफ्ट्सचे वितरण होणे बाकी आहे.
एयर इंडिया ही रोल्स रॉइस ट्रेंट एक्सडब्ल्यूबी इंजिन्स बसवण्यात आलेले एयरबस A350 ऑपरेट करणारी पहिली भारतीय विमानवाहतूक कंपनी आहे. असामान्य इंधन कार्यक्षमता, प्रवाशांसाठी आरामदायीपणा आणि दीर्घ पल्ल्याची क्षमता असलेले A350s एयर इंडियाच्या प्रवाशांना दिल्ली ते लंडन आणि न्यूयॉर्क प्रवासादरम्यान हवाई वाहतुकीचा अविस्मरणीय अनुभव देईल.
A320 फॅमिली ताफ्यात CFM LEAP 1-A इंजिन बसवण्यात आले असून तो एयर इंडियाच्या देशांतर्गत आणि लहान टप्प्याच्या वाहतुकीचा कणा आहे. या ताफ्याद्वारे कंपनीच्या लाखो ग्राहकांना जागतिक दर्जाती सेवा आणि पुरवली जाते.
