इनव्हेटरस नॉलेज सोल्युशन्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री 12 डिसेंबर पासून सुरू
मुंबई : इनव्हेटरस नॉलेज सोल्युशन्स लिमिटेड (“कंपनी”) ने गुरूवार 12 डिसेंबर 2024 रोजी इक्विटी शेअरची प्राथमिक समभाग विक्री (“ऑफर”) करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख बोलीऑफर खुली होण्याच्या एक कार्यालयीन दिवस आधी म्हणजे बुधवार 11 डिसेंबर 2024 असणार आहे. बोली/ऑफर सोमवार 16 डिसेंबर 2024 रोजी बंद होईल.
प्रति इक्विटी शेअरसाठी 1265 रुपये ते 1329 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 11 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 11 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.
इनव्हेटरस नॉलेज सोल्युशन्स लिमिटेडच्या 1 रु दर्शनी मूल्याच्या प्रती इक्विटी शेअर्ससाठी 18,795,510 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे. या ऑफर फॉर सेल मध्ये आर्यमन झुनझुनवाला डिस्क्रिशनरी ट्रस्टद्वारे 1,119,300 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, आर्यवीर झुनझुनवाला डिस्क्रिशनरी ट्रस्टद्वारे 1,119,300 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, निष्ठा झुनझुनवाला डिस्क्रिशनरी ट्रस्टद्वारे 1,119,300 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (“प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स”), अश्रा फॅमिली ट्रस्टद्वारे 3,376,311 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, राजेशकुमार राधेश्याम झुनझुनवाला यांच्याकडून 26,513 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (“प्रमोटर ग्रुप सेलिंग शेअरहोल्डर्स”), अदीत शरद गोगटे यांच्याद्वारे 98,250 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, अजय माधवन मडतीपरांबिल यांच्याद्वारे 139,042 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, अजित राजगोपाल मेनन यांच्याद्वारे 72,051 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, अॅलन यांच्याद्वारे 104,281 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, अंकुर चुग यांच्याद्वारे 69,521 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, अनुराग श्यामसुंदरलाल शर्मा यांच्याद्वारे 323,572 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, अरिंद्रजित दत्ता यांच्याद्वारे 49,126 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, अशीत कालरा यांच्याद्वारे 83,425 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, बर्जिस मिनू देसाई यांच्याद्वारे 676,549 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, चार्ल्स एडवर्ड ब्राऊन यांच्याद्वारे 5,297 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, ख्रिस्तोफर जे स्क्लाफानी यांच्याद्वारे 101,799 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, क्लेरन्स कार्लटन किंग Ii यांच्याद्वारे 47,035 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, गौरव जैन यांच्याद्वारे 33,406 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, गौतम चार यांच्याद्वारे 1,251,378 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, जेफ्री फिलिप फ्रेमार्क यांच्याद्वारे 1,141,001 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, जॉन बेनार्डेलो यांच्याद्वारे 86,901 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, जोसेफ बेनार्डेलो यांच्याद्वारे 3,041,812 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, के.सी. निशिल कुमार यांच्याद्वारे 232,341 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, करीन रिबेरो मजुमदार यांच्याद्वारे 49,126 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, कॅथरीन निकोल डेव्हिस यांच्याद्वारे 266,781 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, मदथीपरांबिल कृष्णन माधवन यांच्याद्वारे 130,594 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, मनीष गुप्ता यांच्याद्वारे 55,617 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, मनू महमूद पारपीया (लिन मनू पारपीयासह संयुक्त) यांच्याद्वारे 166,850 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, मयूर प्रविणकांत संघवी यांच्याद्वारे 61,290 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, मितुल दीपक ठक्कर यांच्याद्वारे 219,170 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, निखिल शर्मा यांच्याद्वारे 3,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, परमिंदर बोलिना यांच्याद्वारे 1,251,378 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, पॅट्रिक बर्टन क्लाइन यांच्याद्वारे 257,873 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, संजीव भुपेंद्र गांधी यांच्याद्वारे 47,815 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, स्कॉट डी हायवर्थ यांच्याद्वारे 652,008 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, शेन ह्सूईंग पेंग यांच्याद्वारे 994,233 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, श्रीकांत वडाकापूरापू यांच्याद्वारे 15,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, उन्नीकृष्णन पार्थसारथी यांच्याद्वारे 208,563 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, वरधराजन रामसामी यांच्याद्वारे 34,760 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, विक्रम जित सिंग छटवाल यांच्याद्वारे 63,941 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, (“इंडिव्हिज्युअल सेलिंग शेअरहोल्डर्स” हे प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स आणि प्रमोटर ग्रुप सेलिंग शेअरहोल्डर्ससह, “सेलिंग शेअरहोल्डर्स”) आणि (“ऑफर फॉर सेल” किंवा “ऑफर”) समाविष्ट आहे.
या ऑफर मध्ये एकूण किंमतीत [●] दशलक्ष रु. पर्यंतच्या प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या 65,000 पर्यंत इक्विटी शेअर्सचा आरक्षण कोटा आहे. ते पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहेत. हा भाग “कर्मचारी राखीव भाग“ म्हणून ओळखला जातो, जो प्रस्तावानंतरच्या कंपनीच्या एकूण शेअर भांडवलाच्या 5% पेक्षा जास्त नसावा. कर्मचारी राखीव भाग वगळून उर्वरित भाग “नेट ऑफर“ म्हणून ओळखला जातो. ऑफर आणि नेट ऑफर मध्ये अनुक्रमे [●]% आणि [●]% हे आहे. आमच्या कंपनीच्या ऑफर पश्चात पेड अप इक्विटी शेअर कॅपिटल आहे.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) 1957 च्या (“SEBI ICDR Regulations”) नियम 31 च्या 19(2 (ब) सुधारित नियमावलीनुसार ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या 6(2) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डींग प्रक्रीयेद्वारे जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) वाटपासाठी ऑफरच्या 75 % पेक्षा कमी नसलेले समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील 60 टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (“Anchor Investor Portion”) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युचुअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमत“) राखीव करण्यात आलेल्या वाटप किंमतीइतक्या किंवा अधिक किंमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. वाटप कमी झाल्यास किंवा मुख्य गुंतवणूकदार भागात नॉन–अलोकेशन भाग असल्यास शिल्लक इक्विटी शेअर्सची नेट QIB भागात भर पडेल (मुख्य गुंतवणूकदार भाग वगळून). (the “Net QIB Portion”). तसेच, ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा अधिक नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. त्यापैकी बिगर संस्थात्मक विभागाच्या एक तृतीयांश भाग 0.20 दशलक्ष रु. पेक्षा आणि 1.00 दशलक्ष रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि बिगर संस्थात्मक विभागाच्या दोन तृतीयांश भाग 1.00 दशलक्ष रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. ऑफर प्राइस इतक्या किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या बोलीवर हे लागू असेल. पुढे, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या 10 % पेक्षा जास्त नसलेला भाग रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना (“Retail Category”) उपलब्ध होईल. पुढे, कर्मचारी आरक्षण भागांतर्गत अर्ज करणार्या पात्र कर्मचार्यांना त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या वैध बोलींच्या अधीन किंवा ऑफर किमतीच्या वर इक्विटी समभागांचे वाटप प्रमाणानुसार केले जाईल. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही.
कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”, BSE सह मिळून “स्टॉक एक्सचेंजेस”) स्टॉक एक्स्चेंजेसवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, जेफ्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड, जे. पी. मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि नोमुरा फायनान्शीयल अॅडव्हायजरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड हे इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.
